गिरीश कुबेरांना ‘शिवपुत्र संभाजी’चे दिग्दर्शक अजित शिरोळेंचं जाहीर आव्हान –

पुरावा द्या नाहीतर माफी मागा
संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या वादग्रस्त पुस्तकावर बरीच टीका होते आहे.
या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री सोयराबाई यांना न केलेली शिक्षा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांना केलेली शिक्षा तसेच  बुऱ्हानपूरच्या लुटीबद्दल आक्षेपार्ह मजकुर लिहील्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये आता दिग्दर्शक अजित शिरोळे यांनी देखील आपला संताप व्यक्त केला आहे.
मराठीतले नामवंत दिग्दर्शक अजित शिरोळे , मराठीमध्ये 13 सिनेमा दिग्दर्शीत केल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहेत. लवकरच ते ‘शिवपुत्र संभाजी’ हा बिग बजेट सिनेमा घेऊन येत आहेत. . छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज यांच्यावर हा सिनेमा आधारीत आहे.
'रेनिसन्स स्टेट' बद्दल अजित शिरोळे म्हणतात, “हल्ली लोकप्रियता आणि प्रसिद्धीमुळे लोकं आंधळी झाली आहेत आणि कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. आपल्या इतिहासातील महत्वाच्या व्यक्तींबद्दल चुकीची माहिती पसरवण्यातही ते मागे पुढे पाहत नाहीत.”
 संभाजी महाराजांबद्दल अशा वादग्रस्त मजकुरामुळे संतापलेले अजित शिरोळे, महाराजांबद्दल अतिशय आदराने पुढे म्हणाले,
“छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत बुद्धिमान शक्तिमान चारित्र्यसंपन्न असे कार्यकुशल राजे होते. युद्धात तर त्यांचा हातखंडा होता. अवघ्या 14 व्या वर्षी त्यांनी बुधभूषण नामक संस्कृत ग्रंथ लिहिला ज्यामध्ये राज्यकारभार चालविण्यासाठी एका राजाकडे आवश्यक असणारे गुण याचा उल्लेख केला आहे.  स्वराज्यासाठी ते मुघल, ब्रिटीश आणि पोर्तुगीजांशी लढले. त्यांचे हेच शौर्य देशातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही ‘शिवपुत्र संभाजी’ हा सिनेमा घेऊन येत आहोत. गेल्या बऱ्याच वर्षांपासून मी आणि लेखक प्रताप गंगावणे यासाठी संशोधन करत आहोत.’’
“ मी लेखक गिरीश कुबेर यांना आव्हान देत आहे, की त्यांना त्यांच्या लिखाणाबद्दल आत्मविश्वास असेल. तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या वढू बुद्रुक येथे मला भेटावे आणि त्यांनी जे काही लिहीले आहे त्याबद्दल पुरावे द्यावेत, अन्यथा त्यांनी माफी मागावी. “छत्रपती संभाजी महाराजांसारख्या कर्तृत्ववान आणि चारित्र्यशील मराठा योद्धाबद्दल केलेल्या या निराधार वक्तव्याबद्दल अजित शिरोळे यांनी पुन्हा पुन्हा संताप व्यक्त केला आहे आणि लवकरच हा विषय निकाली काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..