फेडेक्स एक्सप्रेस
फेडेक्स एक्सप्रेसतर्फे टीम सदस्यांनी निवडलेल्या, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला दान स्वरूप मदत
सोलर सिस्टर्स आणि युनायटेड वे मुंबई यांना फेडेक्स प्रायॉरिटी अर्थ ग्रांट डे प्रोग्रामअंतर्गत प्रत्येकी ५०,००० डॉलर्सचे दान
शहर, देश, ३ जून, २०२१: फेडेक्स कॉर्प.ची (एनवायएसई: FDX) उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक सेवा पुरवठादार फेडेक्स एक्सप्रेसने भारत आणि आफ्रिकेतील पर्यावरण संरक्षण व संवर्धन क्षेत्रातील कार्यरत प्रकल्पांना प्रत्येकी $५०,००० यूएस डॉलर्स दान करणार असल्याची घोषणा केली आहे.
फेडेक्स प्रायॉरिटी अर्थ ग्लोबल ग्रांट प्रोग्रामअंतर्गत हजारो फेडेक्स टीम सदस्यांनी विना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या १२ संस्थांची निवड केली आहे. फेडेक्स ज्या सहा आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे तेथील या संघटना असून, पर्यावरणपूरक उपाययोजनांसाठीच्या एकूण $६००,००० यूएस डॉलर्सच्या फेडेक्स गुंतवणुकीतून त्या प्रत्येक संघटनेला $५०,००० यूएस डॉलर्सचे अनुदान देण्यात येणार आहे.मध्य पूर्व, भारतीय उपखंड आणि आफ्रिकेचे क्षेत्रीय अध्यक्ष जॅक मूस यांनी सांगितले, "पर्यावरणावर सर्वात जास्त प्रभाव होत असलेल्या ठिकाणी त्यामध्ये घट करण्यासाठी फेडेक्सने महत्त्वाकांक्षी उद्धीष्ट्ये आखली आहेत. विना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संघटनांसोबत काम करणे आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये गुंतवणूक करणे हा आपल्या जगात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती आणि नवनवीन उपाययोजनांना वेग देण्याच्या कंपनीच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे."
युनायटेड वे मुंबई ही संघटना पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या विविध प्रकल्पांमध्ये मदत करते. यामध्ये शहरी वनीकरण, खारफुटींना संरक्षण आणि पाणलोट क्षेत्राचा विकास अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. या उपक्रमांमधून स्थानिक नागरी समित्यांच्या प्रयत्नांना साथ दिली जाते तसेच पर्यावरण संरक्षणामध्ये नागरिकांना देखील सामावून घेतले जाते.
युनायटेड वे मुंबईचे सीईओ श्री जॉर्ज ऐकारा यांनी सांगितले, "फेडेक्सकडुन दिल्या जाणार असलेल्या सहयोगामुळे मुंबईच्या पाणथळ भागांमध्ये खारफुटीची रोपे लावून त्यांची देखरेख करण्याच्या कामी युनायटेड वे मुंबईला मदत होईल. शहरातील समुद्रकिनारे स्वच्छ करून समुद्रातील प्रदूषण कमी करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये देखील मोलाची साथ मिळेल. आम्ही त्यांच्या या सहयोगाबद्दल आभारी आहोत आणि आम्हाला खात्री आहे की, समाजात दीर्घकालीन परिवर्तन घडवून आणण्याच्या प्रयत्नांमध्ये हे खूप मोठे योगदान ठरेल."
ज्या भागांमध्ये आजही वीज नाही तिथे वीज पोहोचवण्यासाठी, महिलांकडून चालवल्या जात असलेल्या उद्योगांमार्फत हरित ऊर्जा उत्पादन करून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम सोलर सिस्टर करत आहे. त्यांना आर्थिक मदत पुरवली गेल्याने महिलांचे अधिक मोठे नेटवर्क निर्माण करण्यासाठी साहाय्य, प्रशिक्षण आणि सेवा यांचे सर्वसमावेशक पॅकेज तयार करता येईल आणि आफ्रिकेतील ग्रामीण भागांमध्ये दुर्गम ठिकाणी राहणाऱ्या समुदायांना शुद्ध ऊर्जा तंत्रज्ञान पुरवता येईल.
सोलर सिस्टर, आयएनसीच्या संस्थापिका व सीईओ कॅथरीन ल्युसी यांनी सांगितले, "शाश्वत भविष्यासाठी दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्यासाठी आमच्या मूल्यांना आणि आमच्या उद्धिष्टांना साथ दिल्याबद्दल आम्ही फेडेक्सचे आभारी आहोत. दुर्गम भागांतील महिला उद्यमींच्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणे हा शुद्ध ऊर्जा क्षेत्रासमोरील आव्हानांवरील उपाययोजनांचा एक महत्त्वाचा भाग आहे. फेडेक्सच्या मदतीमुळे आम्हाला आफ्रिकेतील उप-सहारा क्षेत्रातील अधिक समुदायांपर्यंत आमच्या मॉडेलचा विस्तार करण्यात, महिला उद्योजक, त्यांची कुटुंबे आणि त्यांच्या समुदायांवरील आमचा प्रभाव अधिक पटींनी वाढवण्यात आम्हाला मोठी साथ मिळेल."
प्रायॉरिटी अर्थ ग्लोबल ग्रांट प्रोग्रामचा एक भाग म्हणून करण्यात येत असलेली ही नवी गुंतवणूक सध्या सुरु असलेल्या फेडेक्स आणि या संघटनांमधील समन्वयाचा एक भाग आहे, ज्यामार्फत वातावरणातील बदलांच्या समस्येच्या निवारणासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना केल्या जात आहेत. २०४० पर्यंत संपूर्ण जगभरातील आपले संचालन कार्बन-न्यूट्रल करण्यासाठी फेडेक्सने घेतलेल्या संकल्पाला अनुसरून हे पाऊल उचलले जात आहे.
फेडेक्स केयर्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे भेट द्या - fedexcares.com
Comments
Post a Comment