वास्तविक जीवनातील महिला वन अधिकाऱ्यांच्या देखील पसंतीस उतरतोय विद्या बालनच्या ‘शेरनी’चा धमाकेदार ट्रेलर

अमेझॉन प्राईम व्हिडीओने नुकतेच विद्या बालन अभिनीत चित्रपट ‘शेरनी’च्या बहुप्रतीक्षित ट्रेलरचे अनावरण केले. ट्रेलरला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळत असून प्रदर्शित झाल्याच्या काही तासातच अनेक महिला वन अधिकाऱ्यांनीदेखील सोशल मीडियावर आपले विचार व्यक्त केले. विद्या बालन यात एका प्रामाणिक महिला वन अधिकारी- विद्याची भूमिका साकारत आहे.
या चित्रपटासाठी आणि या रोमांचक ट्रेलरसाठी विद्याला जे प्रेम मिळते आहे ते अलौकिक आहे. काही वन अधिकाऱ्यांनी या ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना विद्या बालनच्या अनोख्या भूमिकेमुळे आणि असामान्य कथेमुळे  खूप प्रभावित झाल्याचे म्हटले आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया नेहमीच एका अभिनेत्यासाठी महत्त्वपूर्ण असतात मात्र, वास्तविक आयुष्यातील वन अधिकाऱ्यांनी केलेले कौतुक, ज्या लोकांवर हा चित्रपट चित्रित आहे, विद्या बालनसाठी हा अवर्णनीय क्षण आहे.
ट्रेलरने काही खऱ्याखुऱ्या वन अधिकाऱ्यांच्या मनात घर केले आहे त्यांच्या प्रतिक्रिया खालीलप्रमाणे:
Jayoti Banerjee shares, "#Sherni
Film of a fiesty Forest Officer working in a tough terrain with Human Wildlife Interface.
Amidst a maze of folks with vested interests,Naysayers & Doers.
@vidya_balan & #AmitMasurkar combo promises an uncommon story
@CentralIfs
@LadyIFSOfficers"
https://twitter.com/jayotibanerjee/status/1400099386651136007?s=1005
Sulekha Jagarwar shares, "Watch the trailer of #Sherni
https://t.co/fi75d2TCws
A movie revolving around the life of a forest officer."
https://twitter.com/JagarwarSulekha/status/1400014902786285569?s=1005
Nikhitha Boga shares, "#Man_animal_conflict revolves around the struggle over territory and battles of survival.
This is the story is of a #ForestOfficer who strives for balance.
#sherni #vidyabalan #ReelGreenQueen"
https://twitter.com/NikhithaBoga/status/1399998575036178432?s=1005
Swetha Boddu shares, "Want to see a lady IFS in action on screen?
Acclaimed #vidyabalan plays Forest Officer in #sherni. Trailer is here and can't wait for the release! 😀"
https://twitter.com/swethaboddu/status/1399996077843968001?s=1005
Lavanya shares, "Trailer looks promising in giving due credits to forest officers for their unseen&unspoken efforts to deal with human animal conflict situations
#Sherni #VidyaBalan"
https://twitter.com/iambLavanya/status/1399994801827635201?s=1005
Revti Raman shares, "Commendable work by @vidya_balan  ma'am...This story says a lot about many real life #Sherni in Uniform.. 🙏"
https://twitter.com/Revti_Raman_IFS/status/1399987322163122177?s=1005
https://twitter.com/Revti_Raman_IFS/status/1399985374844403713?s=1005
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10219230398404770&id=1053069188&post_id=1053069188_10219230398404770&notif_id=1622625070740955&notif_t=nf_share_story&ref=notif
आपल्या पितृसत्ताक पद्धतीत सामाजिक अडथळे निर्माण करणारी मानवी श्वापदे वावरत असतात, विद्या ज्या विभागात कार्यरत असते, तिथली उदासीनताच तिला जोशाने स्वत:ची धमक सिद्ध करण्याची ऊर्जा देते. सिनेमाचा ट्रेलर रोमांचक असून विद्याच्या प्रवासावर भाष्य करतो. हे जग चमत्कारी, आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले आहे. आपली चाकोरी बाहेरची नोकरी सांभाळून विद्या विवाहित आयुष्य जगत असते. हे करत असताना मानव नावाच्या पशूचा सामना तिला करावा लागतो. या सिनेमात शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी यांच्या मुख्य भूमिका असतील.
टी-सिरीज आणि अबंडनतिया एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या मस्ट वॉच प्रकारातील नाट्याचे दिग्दर्शन समीक्षकांच्या कौतुकास प्राप्त ठरलेल्या न्यूटन’फेम, पारितोषिक विजेता फिल्ममेकर अमित मसुरकर याने केले आहे. व्यंगावर बोट ठेवणाऱ्या आपल्या शैलीसाठी अमित प्रसिद्ध आहे. प्राईम सदस्य ‘शेरनी’ 18 जून पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम करू शकतील.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..