जागतिक पर्यावरण दिनानिमित्त टीव्‍ही कलाकार नेहा पेंडसे आणि आकांशा शर्मा यांनी सांगितले सस्टेनेबल राहणीमानाबाबत मत

निसर्ग आपल्‍यासाठी घरासारखाच आहे. आपण निसर्गाची काळजी घेतो, तेव्‍हा निसर्ग देखील आपले संरक्षण करतो. पण स्‍वयंपाक, साफसफाई, प्रवास अशा आपल्‍या दैनंदिन कृतींचा पर्यावरणावर अनेक पद्धतीने परिणाम होतो. आपले जीवन काहीसे मंदावलेले असताना निसर्ग बहरले आहे. या काळाने आपल्‍याला महत्त्वपूर्ण शिकवण दिली आहे, ती म्‍हणजे नैसर्गिक विश्‍वाचे जतन करा. आपण गतकाळात परत जाऊ शकत नाही आणि म्‍हणूनच सस्टेनेबल राहणीमान अवलंबणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. सस्टेनेबल राहणीमान म्‍हणजे नैसर्गिक संसाधनांचा वापर मर्यादित स्‍वरूपात करणे आणि हरित पद्धतींचा सर्वोत्तम पद्धतीने अवलंब करण्‍यासाठी योग्‍य निवड करणे. यंदाच्‍या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे 'इकोसिस्टिम रिस्‍टोरेशन' आणि एण्ड टीव्‍हीवरील कलाकार मालिका 'भाबीजी घर पर है'मधील महाराष्‍ट्रीयन मुलगी नेहा पेंडसे ऊर्फ अनिता भाभी आणि मालिका 'और भई क्‍या चल रहा है?'मधील आकांशा शर्मा ऊर्फ सकिना मिर्झा सस्टेनेबल राहणीमान अवलंबण्‍याप्रती त्‍यांच्‍या लहानशा प्रयत्‍नांबाबत सांगत आहेत.

मालिका 'भाबीजी घर पर है'मधील नेहा पेंडसे ऊर्फ अनिता भाभी म्‍हणाली, ''सोप्‍या भाषेत सस्टेनेबल राहणीमान म्‍हणजे आपल्‍या जीवनशैली निवडींचा आसपासच्‍या विश्‍वावर होणारा परिणाम जाणून घेणे आणि सर्वांनी उत्तमपणे व जबाबदारपूर्वक जगण्‍यासाठी मार्ग शोधून काढणे. हरित पद्धतींचा अवलंब हा आपल्‍या भूमातेचे संवर्धन व संरक्षण करण्‍याचा उत्तम मार्ग आहे. यासंदर्भात मी प्‍लास्टिकचा वापर कमी केला आहे आणि त्‍याऐवजी माझ्या किराणा माल व इतर आवश्‍यकतांसाठी प्‍लास्टिक-मुक्‍त पर्यायांचा वापर करते. मी सोबत सुती किंवा तागाच्‍या पिशव्‍या घेऊन जाण्‍याची काळजी घेते. ऊर्जेसंदर्भात मी इन्‍कॅन्‍डेसण्‍ट लायटिंगऐवजी एलईडी लायटिंग किंवा सीएफएल बल्‍ब्सचा वापर करते, कारण हे दीर्घकाळापर्यंत टिकतात आणि ऊर्जेची बचत करतात. याव्‍यतिरिक्‍त मी नैसर्गिक प्रकाशाला देखील प्राधान्‍य देते, ज्‍यामुळे ऊर्जासंवर्धनामध्‍ये मदत होण्‍यासोबत काहीशा अधिक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळण्‍यामध्‍ये देखील मदत होते. आपल्‍या रोजच्‍या सवयींमधील हे लहानसे बदल आपल्‍याला पर्यावरणदृष्‍ट्या जागरूक बनवू शकतात आणि मोठे परिवर्तन घडून येऊ शकते.'' मालिका 'और भई क्‍या चल रहा है?'मधील आकांशा शर्मा ऊर्फ सकिना मिर्झा म्‍हणाली, ''पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि पर्यावरणाचा -हास कमी करणे महत्त्वाचे आहे. या भूमातेच्‍या अधिवासामध्‍ये आपले नैतिक कर्तव्‍य पर्यावरणाचे प्रदूषणापासून, तसेच पर्यावरणाचा-हास करणा-या इतर कृतींपासून संरक्षण करण्‍याचे असले पाहिजे. आपले पर्यावरण आपल्‍याला शुद्ध हवा, पाणी, अन्‍न अशी अनेक नैसर्गिक संसाधने देते आणि आपण पर्यावरणाचे संरक्षण करत ऋण फेडले पाहिजे. वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण विशेषत: मेट्रो शहरांमध्‍ये मोठी समस्‍या बनली आहे. म्‍हणून मी माझ्या वाहनाचा वापर न करता शक्‍यतो लहान अंतरासाठी पायीच चालत जाते. तसेच मी प्‍लास्टिकचा वापर आणि पाणी व इतर नैसर्गिक संसाधनांचा अपव्‍यय टाळते. आपल्‍या भूमातेची परतफेड आणि भेट म्‍हणून आम्ही दर सहा महिन्‍यांनी एक रोपटे लावण्‍याचे ठरवले आहे. आपण हरित व शुद्ध पर्यावरणासाठी अनेक गोष्‍टी करू शकतो. चला तर मग संघटित होऊन असे सोपे मार्ग शोधून काढूया, जे आपल्‍याला पर्यावरणाप्रती आपले योगदान देण्‍यामध्‍ये मदत करू शकतात.''

पाहा आकांशा शर्माला सकिना मिर्झाच्‍या भूमिकेत 'और भई क्‍या चल रहा है?'मध्‍ये रात्री ९.३० वाजता आणि नेहा पेंडसेला अनिता भाभीच्‍या भूमिकेत 'भाबीजी घर पर है'मध्‍ये रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..