प्रतापगडाची पराक्रमी गाथा 'शेर शिवराज' मध्ये

रसिकांच्या भेटीला चित्रपटाची पहिली आकर्षक झलक सादर

आजवर शिवचरित्र अभ्यासकांनीइतिहासकारांनी आपापल्या परीनं शिवचरित्राचं यथार्थ वर्णन केलं आहे. अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडेही अभिमानानं गायले आहेत. शिवचरित्रातील अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय २२ एप्रिलला रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे. नुकतीच या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आणि पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

त्या काळी विजापूरच्या दरबारात 'मै लाऊंगा शिवाजी को...! जिंदा या मुर्दा!', अशी वल्गना करत अफझलखानाने शिवरायांना जिवंत वा मृत घेऊन येण्याचा विडा उचलला होता. निर्माते नितीन केणीप्रद्योत प्रशांत पेंढरकरअनिल नारायणराव वरखडे आणि चिन्मय मांडलेकर यांच्या साथीनं लेखकदिग्दर्शकनिर्माता दिग्पाल लांजेकर यांनी अफझलखान वधाचा चित्तथरारक अनुभव 'शेर शिवराज' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आणण्याचा विडा उचलला आहे.‘पावनखिंड’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर 'शेर शिवराज' चित्रपटाचं काम अंतिम टप्प्यात असूनयेत्या २२ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्याvसामाजिकराजकीय वातावरणराजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदाशत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्तीअफझलखानाची स्वारीखानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण 'शेर शिवराज' मध्ये दिग्पालनं केलं आहे. याची झलक नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या 'शेर शिवराज'च्या पोस्टर व टीझरवर ही पहायला मिळते. प्रतापगडावर डौलानं फडकणारा हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडामहाराजांचा रक्तानं माखलेला हातखानाचा कोथळा काढणारी वाघनखं आणि त्या काळापासून आजच्या युगापर्यंत घडणाऱ्या सर्व घटनांचा मूक साक्षीदार असणाऱ्या तळपत्या सूर्याचं दर्शन पोस्टरवर घडतं आणि टीझरमधूनही तो थरार आपल्याला पहायला मिळतोय.

'शेर शिवराज' चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणीराजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडेतसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांनी केली आहे.

याविषयी बोलताना मुंबई मुवी स्टुडियोजचे निर्माते नितीन केणी सांगतात, ‘गेली २ वर्ष चित्रपटगृहांपासून प्रेक्षक दूर राहिलाय व त्यानंतर आलेल्या पावनखिंड’ चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. आणि आता २२ एप्रिलला प्रदर्शित होणारा 'शेर शिवराज' हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी होईलयात आम्हाला शंका वाटत नाही’. राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर म्हणाले, "आजची पिढी डिजिटल आहे. इतिहासाच्या अभ्यासासाठी संदर्भ ग्रंथबखरीपुस्तके यांची नितांत आवश्यकता आहेच पण त्याची आवड निर्माण होण्यासाठी चित्रपटाइतके दुसरे प्रभावी माध्यम नाही त्यामुळे 'शेर शिवराज' सारख्या चित्रपटांची आजच्या पिढीला गरज आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight