बिज्जो

असली भारत एसएमबी डिजिटायझेशन साध्य करण्याकरिता टेक स्टार्ट-अप बिज्जो (बीआईझेडझेडओ) च्या रुपात आता येणार ऑनलाइन 

या मंचाचा उद्देश्य लघु आणि मध्यम उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटायझ करुन त्यांना आपल्या  ग्राहकांशी  थेट संपर्क साधण्यासाठी मदत करित गो-डायरेक्ट क्रांतीला सबल करणे आहे

मुंबई 14th March 2022: बिज्जो कोविडकाळात अवतरलले स्टार्टअप आहे ज्याचे उद्दिष्ट भारतातील प्रवास-पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी व्हॅल्यू चेनमधील लहान आणि मध्यम सेवा प्रदात्यांना सक्षम करणे असे आहे. कंपनीचे ध्येय एसएमबी लँडस्केपमध्ये येणार्या सेवा प्रदात्यांना आपले व्यवसाय डिजिटल पद्धतीने तयार करण्यात, स्केल करण्यात आणि व्यवस्थापित करण्यात मदत करित त्यांच्या करिता परिवर्तनवादी शक्ती बनने आहे. भारतातील सर्वात मोठ्या खाजगी बँक आईसीआईसीआई, व्हीसी फर्म आणि प्रतिष्ठित ऐंजल गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याने कंपनी आता लघु आणि मध्यम सेवा प्रदात्यांना मदत करण्याच्या प्रवासात वाटचाल सुरु करित संबंधित डिजिटल इकोसिस्टम भागीदारांच्या गटांशी प्रगत चर्चा करित आहे.

येत्या काही महिन्यांत बिज्जो महत्त्वाच्या अनेक भागीदारांसह थेट जाण्याचा विचार करित आहे, सध्यातरी महाबळेश्वर, अलिबाग, लोणावळा, पुणे-मुंबई, गोवा, उदयपूर, डेहराडून-हृषिकेश-हरिद्वार, वाराणसी, दिल्ली एनसीआर आणि बेंगळुरू यासारख्या पर्यटन क्षेत्रातील लोकांपर्यंत हॉस्पिटॅलिटी, वाहतूक, निवास आणि प्रेक्षणीय स्थळे दाखविण्याची व्हॅल्यू सर्विस सेवांच्या कवडसे ओलांडून विस्तार करण्याचे बघत आहे.

बिज्जोने सर्वांसाठी तंत्रज्ञानाला अजून लोकशाहीचे रूप देण्याच्या उद्देशाने कल्पक यूएसपी- मोफत मूलभूत योजना ऑफर तयार केली आहे. बिज्जोची फ्री बेसिक प्लॅन अंतर्गत सेवांचा ध्येय सर्व भारतप्रेन्युअरला कोणत्याही अडथळ्याशिवाय डिजिटल होण्यात प्रोत्साहित करण्यासाठी पहिली पायरी प्रदान करणे आहे. ही योजना सेवा प्रदात्यांना कस्टमाइज़्ड बुकिंग पोर्टल बनवण्यात, सेवांचा डिजिटल कॅटलॉग तयार करण्यासाठी, किंमत आणि उपलब्धता लिंक करण्यासाठी मदत करेल, जेणेकरून त्यांच्या ग्राहकांना 24x7 अखंड ऑनलाइन बुकिंगचा अनुभव मिळेल. बिज्जोचे ॲप सर्व सेवा प्रदात्यांना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे व्हाट्स ॲप , फेसबुक, इंस्टाग्राम, जस्ट डायल आणि गूगल वरून बुकिंग एकत्रित करण्यास सक्षम बनवेल.

बिज्जो लाँच करण्या बाबत, सीईओ आणि सह-संस्थापक विनीत तोष्णीवाल म्हणाले “बराच काळ लोटला भारतातील लघु आणि मध्यम सेवा प्रदात्यांचा विशाल समुदाय तंत्रज्ञान-जाणकार कौशल्ये आणि संसाधनांची कमतरतेत अडकलेला होता आणि यामुळे ते एग्रीगेटर्स संस्कृतीकडे ढकलले गेले होते. पण आता त्यांना पूर्णपणे जाणवले आहे की त्यांना परत सत्ता आपल्या हातात घ्यायला पाहिजे आणि स्वतंत्रपणे डिजिटल कौशल तयार करायला पाहिजे जेणेकरुन ते आपल्या ग्राहकांशी थेट संपर्क साधू शकतील. नेमके हेच करण्यात बिज्जो त्यांना मदत करेल. देशातील मोठ्या भारतप्रीन्युअर्सच्या समुदायाला डिजिटल होण्यात मदद करण्याकरिता आणि कोणत्याही एग्रीगेटर्सच्या हस्तक्षेपाविना आपल्या ग्राहकांशी थेट संबंध निर्माण करण्यासाठी आम्ही आहोत. बिज्जोचा ध्येय लघु आणि मध्यम सेवा प्रदात्यांच्या किमती वेळ आणि ऊर्जा वाया न घालविता उत्पादकता वाढविण्याच्या दिशेने त्यांचे प्रयत्न पुनर्निर्देशित करण्यात मदद करणे आहे. आमचं काम एग्रीगेटर्सकडून आकारले जाणारे अत्याधिक कमिशन पासुन त्यांना वाचविण्यात मदत करणे आहे, ज्यामुळे त्यांचा नफा वाढतो. आणि सरतेशेवटी, आम्ही त्यांना बिज्जो प्लॅटफॉर्मद्वारे क्रॉस-सेल आणि सेवांची देवाणघेवाण करण्यात मदत करून त्यांचा महसूल वाढवू इच्छितो.”

ते पुढे म्हणतात “बिज्जोच्या टीमचा विश्वास आहे की हे उपक्रम आणि ही भागीदारी भारतातील ट्रॅव्हल-टूरिझम आणि हॉस्पिटॅलिटी व्हॅल्यू चेनमधील लघु आणि मध्यम सेवा प्रदात्यांना, डिजिटल आणि आत्मनिर्भर भारत तयार करण्याच्या सरकारच्या पुढाकाराशी सुसंगत राहण्यासाठी मददगार होतील. येत्या 6 महिन्यांत 50k+ सेवा प्रदात्यांना ऑनबोर्ड करण्याची बिजोची योजना आहे” 

प्रदीर्घावधीत कंपनी संपूर्ण भारतातील ट्रॅव्हल-टूरिझम आणि हॉस्पिटॅलिटी व्हॅल्यू चेन मधील लघु आणि मध्यम सेवा प्रदात्यांची इकोसिस्टम एकत्र करू इच्छिते आणि त्यांना आपले व्यवसाय ऑनलाइन करण्यास सक्षम बनवू इच्छिते. शेवटी बिज्जोचा ध्येय डिजिटल मेनस्ट्रीममध्ये सामील होऊ पाहणाऱ्या आणि डिजिटायझेशनच्या लाभ घेण्याच्या इच्छुक एसएमबी व्यवसायांसाठी समाधान प्रदाता बनणे आहे.

अधिक माहितीसाठी  https://bizzo.in/ या संकेतस्थळाला भेट द्या

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..