नात्यातल्या गोडव्याची मजेशीर नोकझोक

सारखं काहीतरी होतंय!

आपलं आयुष्य म्हणजे सुग्रास व्यंजनांनी भरलेलं ताट.. त्यात प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली व प्रत्येक पदार्थाला आपली वेगळी चव असते. तशीच आपल्या हृदयात आपल्या माणसांचीआपल्या नात्यांची, बदलत्या काळानुसार नातेसंबंधांची परिभाषा बदलत असते. अशा बदलांना कधी प्रेमानंकधी रागानंकधी हक्कानं आपलंसं करायचं असतं. नात्यातल्या याच गोडव्याची आणि थोडया तिखटपणाची मजेशीर नोकझोक घेऊन गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'सारखं काहीतरी होतंय'! हे धमाल विनोदी नाटक येत्या २५ मार्चला रंगभूमीवर दाखल होतंय. प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांची ३६ वर्षांनी एकत्र आलेली सुपरहिट जोडी या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत पहायला मिळणार आहे. या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन संकर्षण कर्‍हाडे यांचे आहे.

सारखं काहीतरी होत’! ही घराघरातील गोष्ट आहे. घराघरात आईवडील आपल्या मुलांना मनापासूनस्वतःच्या आवडीनिवडीपरिस्थितीत्रास सगळ बाजूला ठेऊन आनंदाच्या आणि सुखाच्या वातावरणात वाढवण्याचा प्रयत्न करत असतातच. पण मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचा आयुष्य जगण्याचा आणि आयुष्याकडे बघण्याच्या एक वेगळा दृष्टिकोन तयार झालेला असतो. जो दृष्टिकोन स्वाभाविकपणे आईवडिलांच्या दृष्टिकोनापेक्षा भिन्न असतो. ह्या भिन्नतेचा एकमेकांशी वागण्यावर आणि प्रामुख्याने आपापसातल्या संवादावर कायम परिणाम होत असतो. यावर उपाय म्हणून दोन्ही पिढ्या आपापल्या पद्धतीने आणि पॉईंट ऑफ व्ह्यू’ ने मार्ग काढण्याच्या प्रयत्न करत असतात. आणि घरात सारखं काहीतरी घडत असतं, हीच ह्या नाटकाची गोष्ट आहे.

नात्यातील गमती-जमतीदोन पिढ्यांच्या विचारांतील विसंगतीकरिअर आणि प्रेम यांचा सुरेख मिलाफ करत गुंफलेली कथा प्रत्येक घराची असून प्रत्येकजण या कथेशी एकरूप होईल, असा विश्वास निर्माते-अभिनेते प्रशांत दामले व्यक्त करतात. रुसवे-फुगवे यात नात्याची खरी मजा दडली आहे. आमच्या केमिस्ट्रीमधून हीच मजा प्रेक्षकांना घेता येईल, असं अभिनेत्री वर्षा उसगांवकर सांगतात. दिग्दर्शकीय पदार्पणातच दोन दिग्गजांसोबत काम करण्याचा आनंद आणि नाटकाची धमाल मेजवानी याचं समाधान लेखक-दिग्दर्शक संकर्षण कर्‍हाडे व्यक्त करतात.

प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांच्यासोबत या नाटकात पूर्णिमा अहिरे-केंडे, सिद्धी घैसास, राजसिंह देशमुख आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत.

शुक्रवार २५ मार्चला दुपारी ४.३० वा. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाटयगृह, बोरीवली येथे  रंगणार आहे. शनिवार २६ मार्चला रात्रौ ८.३०वा. विष्णुदास भावे, वाशी, तर रविवार २७ मार्चला सायं ७.३० वा. सावित्रीबाई फुले नाटयगृह, डोंबिवली येथे प्रयोग होणार आहे. सोमवार २८ मार्चला रात्रौ ८.३० गडकरी रंगायतन ठाणे आणि मंगळवार दुपारी ४.३० वा दीनानाथ विलेपार्ले या नाटयगृहातही शुभारंभाचे प्रयोग रंगणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..