प्रसिद्ध गायक 'आदर्श शिंदे' यांचं 'आपलीच हवा' गाणं प्रदर्शित

प्रसिद्ध गायक 'आदर्श शिंदे' यांचं 'आपलीच हवा' गाणं प्रदर्शित, अवघ्या काही तासातच गाणं तुफान व्हायरल !

'मिलीनीयर' म्हणून ओळख असणा-या 'प्रशांत नाकती'च्या मराठी गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलयं. त्याने लिहीलेली, गायलेली सर्व गाणी अवघ्या काही तासातच हीट होतात. सोशल मिडीयावर त्याच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. प्रशांतची 'पोरी तुझ्या नादानं, माझी बायगो, लाजरान साजरा मुखडा, मी नादखुळा, आपली यारी  अशी एकाहून एक भन्नाट गाणी तुफान व्हायरल झाली. प्रेमकहाणी सोबत सामाजिक विषय देखील त्यांच्या गाण्यात दिसून येतात.  

सध्या महाराष्ट्रात निवडणूकांचे वारे वाहत आहेत त्याच पार्श्वभूमीवर 'नादखुळा म्युझिक' रेकॉर्ड लेबल प्रस्तुत, निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मीत 'आपलीच हवा' गाणं नुकतचं रीलीज झालं. या गाण्यात ग्रामीण भागातील निवडणूकीचं हुबेहूब दर्शन घडवलं आहे. आपलीच हवा या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार प्रशांत नाकती आहे. तर गायक आदर्श शिंदे आणि गायिका सोनाली सोनावणे हीने हे गाणं गाऊन या गाण्याला चार चांद लावले आहेत. या गाण्यात संजना पंडीत, विशाल फाले, निक शिंदे, रितेश कांबळे, सचिन कांबळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या सोशल मिडीयावर सर्वत्र 'आपलीच हवा' गाण्याची चर्चा आहे.

आपलीच हवा या गाण्याविषयी प्रशांत नाकती सांगतो, "सध्या महाराष्ट्रात निवडणूकांचा माहोल आहे. या निवडणूकांमध्ये तरूण वर्ग फक्त प्रचार करताना दिसतो. पण जेव्हा उमेदवार पदाची वेळ येते, तिथे कोणतीच तरूण मंडळी दिसत नाही. आपल्या भारतात निम्याहून अधिक युवा आहेत. मग आपला तरूण वर्ग उमेदवारीसाठी पुढे का येत नाही? त्यांच्यात क्षमता आहे तर ते राजकारणात का उतरत नाही? हाताच्या बोटावर मोजण्या इतपत तरूण नेते या देशात आहेत. 'आपलीच हवा' हे गाणं लिहीताना माझ्या डोक्यात हे सर्व विषय होते. आणि मी ते गाण्यामार्फत मांडले."

पुढे तो सांगतो, "महाराष्ट्राचा बुलंद आवाज असणारे आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे. त्यांची साथ गायिका सोनाली सोनावणे हीने दिली आहे. याआधी आदर्श दादाने गायलेली 'मी नादखुळा'आणि 'आपली यारी' ही दोन गाणी सुपरहीट झाली. तसंच दादासोबतचं हे तिसरं गाणं आहे. त्यामुळे मी फार उत्सुक आहे."

गाण्याच्या चित्रीकरणाविषयी प्रशांत सांगतो, "गाण्याचं चित्रीकरण हे नाशिकमधील मोहाडी या गावात झालं आहे. तर गाण्यातील काही दृश्यं आम्ही जानोरी गावात शुट केली आहेत. जिथे आम्ही आधी माझी बायगो या गाण्याचं शुट केलं होतं. रोहीत जाधव आणि त्याच्या टीमने सर्व व्यवस्था केली होती. नाशिकमध्ये शुटं करताना खूप मजा आली. काही कलाकार आम्ही गावातलेच घेतलेत. त्यामुळे या गाण्याला गावरान लुक मिळाला आहे. दोन दिवसाच्या शुटींगला तीन दिवस लागले. परंतु शुट करतानाता अनुभव खूप भारी होता."

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight