छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांत पोहचविण्याचा मानस - दिग्पाल लांजेकर

शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे शिवभक्तांसाठी उत्साहाचा दिवस असतो. श्री शिवनेरी स्मारक समितीपुणे यांच्या वतीने शिवनेरी येथे श्री शिवजयंती उत्सव अत्यंत पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. यंदाही हा उत्सव मोठया दिमाखात साजरा करण्यात आला. सकाळी ७ वा. किल्ले शिवनेरीवर श्री शिवाईदेवीच्या महापूजेने उत्सवास सुरुवात झाली. यावेळी किल्ले शिवनेरीवर उत्साहाचं वातावरण आणि शिवभक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. या सोहळयासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून 'फर्जंद', 'फत्तेशिकस्तआणि 'पावनखिंडया चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शन करणारे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते श्री शिवाईदेवीची महापूजा करण्यात आली. यासोबतच खासदार डॉ.विनय सहस्रबुद्धे (अध्यक्ष: भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदभारत सरकार), आचार्य शाहीर हेमंतराजे पु.मावळे (अध्यक्ष: श्री शिवनेरी स्मारक समितीपुणे) आदि मान्यवरही याप्रसंगी उपस्थित होते.

लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या आगामी 'शेर शिवराज’ चित्रपटाची घोषणा याप्रसंगी केली. शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत महाराजांचा इतिहास घराघरांत पोहचविण्याचा मानस बोलून दाखवितानाच व्यवसायापलीकडे जाऊन आता ही चळवळ झाली असून चित्रपटाच्या माध्यमातून तिचा अधिकाधिक प्रसार हेच माझे ध्येय असल्याचे दिग्पाल लांजेकर यावेळी म्हणाले. 'शेर शिवराज' चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणीराजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडेतसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांनी केली आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या तर मृणाल कुलकर्णी राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत.

श्री शिवाईदेवीची महापूजा, चांदीच्या शिवपालखीतून महाराजांची सवाद्य छबिना मिरवणूक, शिवजन्म स्थळी शिवपाळणा व सुंठवडा वाटप, ध्वजारोहण, शिवकुंजात महाराजांच्या व राजमातांच्या पुतळ्याचे पूजन, शाहिरी दरबार शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे सेवाव्रती यांचा शाहिरी कार्यक्रम, राजमाता जिजामाता पुरस्कार वितरण, अभिवादन सभा, अशा नानाविध कार्यक्रमांनी शिवजयंतीचा हा सोहळा रंगला.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..