‘विशू’ चा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित

'विशू'च्या आयुष्यात 'ती' येणार

- टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित -

मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित, एक आगळीवेगळी प्रेमकहाणी असलेला ‘विशू’ हा कौटुंबिक चित्रपट ८ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पोस्टरपासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता होती आणि आता नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून तोही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. गश्मीर महाजनी आणि मृण्मयी गोडबोले प्रथमच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहे. 

टिझरमध्ये निसर्गरम्य कोकण व आपल्या प्रेमाचा शोध घेणारा ‘विशू’ दिसत आहे. ‘ती’ला न भेटताही तिला मिस करणाऱ्या ‘विशू’च्या आयुष्यात ‘ती’ येणार का? याचे उत्तर मात्र ‘विशू’ पाहिल्यावरच मिळेल. गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत या चित्रपटात ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, ‘’ ही एक अनोखी प्रेमकहाणी असून इमोशनल आणि प्रॅक्टिकल अशा भिन्न विचारांच्या व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा त्यांचा प्रवास कसा होतो, हे ‘विशू’मध्ये पाहायला मिळणार आहे. गश्मीर आणि मृण्मयी हे पहिल्यांदाच एकत्र काम करत असूनही त्यांची केमिस्ट्री खूपच छान जुळून आली आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असून आपल्या गावाशी नाळ जोडणारा आहे.’’

गशमीर आणि मृण्मयी आपल्या भूमिकेविषयी म्हणतात, ‘प्रेमाचा वेगळाच ट्विस्ट यात पाहायला मिळणार आहे. दोन परस्परविरोधी व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या सहवासात येतात तेव्हा नकळत त्यांच्यातील नाते बहरत जाते आणि ते एका वेगळ्याच वळणावर येते. हा प्रवास म्हणजे ‘विशू’. कोकणात चित्रीकरण करताना खूप मजा आली. आमची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच पडद्यावर पाहायला आवडेल.’’

   श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटाचे पटकथा व संवाद ऋषिकेश कोळी यांचे असून या चित्रपटाला ऋषिकेश कामेरकर यांचे संगीत लाभले आहे तर गाण्यांचे बोल मंगेश कांगणे यांचे आहेत. ‘विशू’चे छायाचित्रण मोहित जाधव यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight