‘आदिवासी’ स्वातंत्र्याचा हुंकार हिंदी चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर 

जंगलीरानटीउघडेनागडे लोक म्हणजे आदिवासी की निसर्गाशी तादात्म्य पावलेलेस्वच्छंदी व स्वतंत्र वृत्तीचे आणि आधुनिक जगाच्या संपर्कामुळे भ्रष्ट न झालेले लोक म्हणजे आदिवासीआदिवासीं संदर्भात सभ्य समाजात भीतीयुक्त औत्सुक्य असते. जगभरात ५००० पेक्षा जास्त आणि भारतात जवळपास ६४५ आदिवासी जमाती आहेत. असे असले तरीही नागरीसभ्य समाजाला आदिवासींबद्दल फार ढोबळ माहिती असते असेच म्हणावे लागेल. नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासीअसे सामान्यपणे म्हणता येईल. सर्वसाधारणपणे जंगलातदुर्गम दऱ्याखोऱ्यांत सुसंस्कृत समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात ते तुरळक वस्ती करून राहतात. आदिवासी संस्कृतीची घडणइतर संस्कृतींच्या संपर्कावाचून स्वतंत्र रीतीने झाली आहे. त्यांच्यातील संस्कृती परिवर्तनाचा वेग फारच मंद आहे. असे सारे अभ्यासाने म्हणता येईल. मात्र ज्या देशामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी नाहीअन्नावाचून माणसे तडफडून मरतातनिवाऱ्याची सोय नाहीतर दोन हातांना रोजगार नाहीअशा देशामध्ये कितीही वेळा प्रजासत्ताक दिवस साजरे करूनलोकशाही कल्याण राज्याचे नगारे वाजवले तरी अन्नपाणीवस्त्रनिवारारोजगारशिक्षणाविना तडफडणारे अगणित लोक आम्ही स्वतंत्र आहोतआमच्या हातात सत्ता आहेअसे कधीही म्हणणार नाहीत. आदिवासी जमात हा जगभरात असाच शोषित अन्यायग्रस्त समाज आहे.

गरीब शेतमजूर आणि आदिवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओ ने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल ही नक्षलवाद्यांची विचारसरणी आहे. भारतीय गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार देशात वीस हजार सशस्त्र नक्षलवादी व पन्नास हजार सक्रिय कार्यकर्ते असून त्यांचे लक्षावधी समर्थक आहेत. हा प्रश्न फक्त गंभीरच नसून एकूणच सर्वनाश करण्यास कारणीभूत ठरू शकतो हे कळण्यासाठी एवढे आकडे पुरेसे आहेत. माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा हक्क नाकारून कायमच्या गुलामीवर शिक्का मारण्यात येत आहे. भारतातल्या  कोटी आदिवासींची ही शोकांतिका आहे. या  कोटी लोकांनी आपली राजकीय ताकद वेळीच ओळखण्याची वेळ आली आहे. आदिवासी जर सकारात्मक विचाराने लढला तर जगभरातील राजकारणाचे समीकरण नक्कीच बदलेल. हे सर्व इथे मांडण्याचे कारण याच विषयाला केंद्रीभूत ठेवून 'आई श्री भगवतीदेवी प्रॉडक्शन्स'ने आपल्या पहिल्या वहिल्या हिंदी चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचे नाव आदिवासी असून 'इन सर्च ऑफ बिरसाही या चित्रपटाची टॅग लाईन आहे.  प्रॉडक्शन्सने नुकतेच या हिंदी चित्रपटाचा मुहूर्त करताना चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले. पोस्टर मधील 'वो आखरी ७२ घंटे' ही गर्भित इशारा देणारी ओळ या चित्रपटाची कहाणी वेगळीच काहीतरी असल्याची भावना निर्माण करीत आहे.

शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाव्दारे तसेच अजय देवगण यांच्या तानाजी’ चित्रपटाव्दारे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेला अभिनेता कैलास वाघमारे आणि ‘ व्हिसल ब्लोईंग सूट ’ ( Whistle blowing suit ) या चित्रपटातून मराठी चित्रपटात दमदार पदार्पण करीत असलेली अभिनेत्री विशाखा कशाळकर हे दोघे आदिवासी या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या कसलेल्या कलाकारांसोबतच केशव देवरेअक्षय भोसलेप्रियम गोंदकरअमित काटकरशशांक खेडेकरअमोल मोरेसागर पेंढारीविजय हिबारेमंदार इथापेअनिकेत कदमअभय देसाईआशिष पवाररुपेश कदमअनिकेत परबधीरज सांगोरेप्राची कांबळेशंकर यशवंत मेस्त्रीसंतोष पांग्रडकरविजय चव्हाणगुरू मर्गजकपिल आडोळेआशिष कटारेअनिल घोगरेमनोज कदम यांच्यासह चंदन सुत्रे हा अभिनेता बिरसा मुंडाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या हिंदी चित्रपटाची कथा- पटकथा-संवाद आणि दिग्दर्शन ज्ञानेश्वर मर्गज यांचे असून संगीत- परिक्षीत भातखंडेकलादिग्दर्शन - मुकुंद मोरेसंकलन - अनिल थोरात, या चित्रपटाच्या शीर्षकाचे आकर्षक सुलेखन प्रविण गोविंद मर्गज यांनी केले आहे.

निर्माता-दिग्दर्शक ज्ञानेश्वर मर्गज यांच्या 'आई श्री भगवती देवी प्रॉडक्शन्स निर्मित आदिवासी या हिंदी चित्रपटाची व्याप्ती आणि आवाका वेगळेपणाने भारलेला नक्कीच आहे. मे २०२२  मध्ये रिलीज होणारा हा चित्रपट नक्कीच लक्षवेधी ठरेल अशी अपेक्षा आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..