झी टॉकीजची गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना

स्वरलता... तुला दंडवत कार्यक्रम होणार सादर

संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर म्हणजे लता मंगेशकर.... जातपातधर्मभाषाप्रांत अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणारी 'स्वरयात्रा’ नुकतीच विसावली. मात्र त्यांच्या स्वरांचं अक्षय्य चांदणं आपल्यावर सदैव बरसणार आहे. त्यांच्या गाण्यांचा, आठवणींचा अमूल्य ठेवा आपल्यासमोर रिता करत ‘स्वरलता... तुला दंडवत’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमातून त्यांना भावपूर्ण स्वरांजली अर्पण करण्यात येणार आहे. झी टॉकीज प्रस्तुत या सांगीतिक कार्यक्रमाचा आस्वाद रविवार २७ मार्चला दुपारी १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. झी टॉकीजवर घेता येईल.

निवेदिका अभिनेत्री स्पृहा जोशी या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या सांगीतिक प्रवासाची तसेच त्यांच्या असंख्य अज्ञात पैलूंची माहिती करून देणार आहेत. गायिका सावनी रविंद्रकार्तिकी गायकवाड, प्रियंका बर्वे, प्रीती वॉरियर आणि संगीतकार मंदार आपटे यांच्या स्वरसाजाने ही मैफल रंगणार आहे. या विशेष सांगीतिक कार्यक्रमात लतादिदींच्या आठवणी आणि गाणी यांचा सुरेल संगम प्रेक्षकांना पहायला मिळेल.

लतादिदी यांचे सूरविश्व इतकं अथांग आहे कीयावर अनेक पिढया पोसल्या गेल्या आणि भविष्यातही जातील. झी टॉकीज वर सादर होणारा स्वरलता... तुला दंडवत हा त्यांच्या स्मरणरंजनाचा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय भेट असेल हे नक्की.

 स्वरलता... तुला दंडवत या सांगीतिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण रविवार २७ मार्चला दुपारी १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. झी टॉकीजवर होणार आहे.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..