‘सुर्या’ चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा

 सुर्या’ चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा

समाजातील विघातक प्रवृत्ती जेव्हा वरचढ ठरते तेव्हात्याविरोधात आवाज उठवण्यासाठी एक नायक पुढे यावा लागतो. नैतिकतेचा बुरखा चढवून काही समाजकंटक चुकीच्या गोष्टी घडवून आणत असतात. त्यांच्या या कृत्याविरोधात लढा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुर्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत राहतो. त्याविरोधात लढण्याची धमक सुर्या कशाप्रकारे आणतो याची चित्तथरारक कहाणी दाखविणारा सुर्या हा मराठी चित्रपट ६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला. चित्रपटाच्या ट्रेलरची आणि गीतांची झलक यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आली. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स,  डीके निर्मित सुर्या’  या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे.

सुर्या‘ चित्रपटाच्या माध्यमातून मी कथानायकाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पदार्पणातच असा अॅक्शनने भरलेला चित्रपट मिळाल्यामुळे माझे पदार्पण दमदार होणार आहे यापेक्षा दुसरी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट माझ्यासाठी नाही’ असा आनंद प्रसाद मंगेश यांनी व्यक्त केला. अॅक्शनइमोशनड्रामा आणि रोमान्स या सगळ्याचे परिपूर्ण पॅकेज असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल’ असा विश्वास सर्व कलाकारांनी यावेळी व्यक्त केला.दिग्दर्शक हसनैन हैद्राबादवाला यांनी 'सुर्या च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शन केले असून एका उत्कृष्ट कलाकृतीचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मनोरंजनाने परिपूर्ण असा सुर्या चित्रपट प्रेक्षक उचलून धरतील असा विश्वास निर्मात्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. 

उगवला पराक्रमी सुर्या सुर्या,  मन गुंतता गुंततारापचिक रापचिक कोळीणबाईमी आहे कोल्हापूरची लवंगी मिरचीबेरंग जवानी अशी वेगवेळ्या जॉनरची पाच गाणी चित्रपटात आहेत. बाबा चव्हाणसंतोष दरेकरसंजय मिश्रादेव चौहानमंगेश ठाणगे,  प्रशांत हेडव यांनी लिहिलेल्या गीतांना देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. सुखविंदर सिंगआदर्श शिंदेनेहा राजपालराजा हसनममता शर्माकविता रामखुशबू जैन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्यउमेश जाधवराहुल संजीव यांचे आहे.

रोमान्स आणि अॅक्शनचा पुरेपूर मसाला प्रेक्षकांना सुर्या या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. अभिनेता प्रसाद मंगेश  याच्यासोबत अभिनेत्री रुचिता जाधव नायिकेच्या रूपात दिसणार आहे. या दोघांसोबत  या चित्रपटात हेमंत बिर्जेउदय टिकेकरपंकज विष्णुअरुण नलावडेगणेश यादवसंजीवनी जाधवदेवशी खांडुरीहॅरी जोशराघवेंद्र कडकोळदीपज्योती नाईकप्रताप बोऱ्हाडेप्रदीप पटवर्धनदिलीप साडविलकरजसबीर थंडी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

या चित्रपटाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केली असून सहनिर्मिती प्रसाद मंगेशचेतन मंगेश यांची आहे. कार्यकारी निर्माते संग्राम शिर्के आहेत. कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदममंगेश केदारहेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस.राव यांचे आहे. अॅक्शन डिरेक्टर अब्बास अली मोगल आणि मोझेस फर्नांडिस आहेत.

सुर्या चित्रपट ६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K