'एकदा काय झालं!!' झेपावतोय दक्षिणेकडे..!!

'चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये इंडियन पॅनारॉमा या विभागात निवड
प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित चित्रपट 'एकदा काय झालं!!' ची चेन्नईच्या प्रतिष्ठित 'चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये निवड झाली आहे. कथा सांगणाऱ्या बाप-लेकाच्या जोडीची एक हळवी गोष्ट या चित्रपटाद्वारे मांडली आहे. चित्रपटाची इंडियन पॅनारॉमा या विभागात निवड झाली आहे.
या चित्रपटात सुमीत राघवन, मोहन आगाशे, उर्मिला कोठारे, पुष्कर श्रोत्री, मुक्ता बर्वे, सुहास जोशी अशा दिग्गज अभिनेत्यांसोबत अर्जुन पूर्णपात्रे या बालकलाकाराने प्रमुख भूमिका साकारली आहे. संदीप खरे आणि समीर सामंत यांनी सिनेमासाठी गाणी लिहिली असून त्यातलं एक गाणं शंकर महादेवन यांनी गायलं आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ गोवा सोबत मानाच्या अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली छाप पाडून हा मराठी चित्रपट आता दक्षिणेतल्या लोकांचं मन जिंकायला सज्ज झालाय.
येत्या २० डिसेंबरला दुपारी १ वाजता या चित्रपटाचा शो होणार आहे, असं फेस्टिव्हलच्या प्रदर्शित झालेल्या वेळापत्रकावरून दिसतंय. एक वेगळा विषय मांडून मराठी चित्रपटाची मान उंचावल्याबद्दल या चित्रपटाचे आणि विशेषतः डॉ. सलील कुलकर्णीचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे.

Comments
Post a Comment