'शाब्बास सुनबाई'ला भेटायला आलीय महाराष्ट्राची लाडकी मृण्मयी देशपांडे

 'शाब्बास सुनबाई'ला भेटायला आलीय महाराष्ट्राची लाडकी मृण्मयी देशपांडे

लग्नानंतर स्वतःच्या संसारात अडकून पडल्यावर आपली स्वप्नंस्वप्नंच  राहून जातात. लग्नानंतर बऱ्याचजणी चूल आणि मूल ह्यातच अडकून राहतात. पण अशातही मार्ग काढून आपली स्वप्नं  पूर्ण करणाऱ्या प्रत्येकीची गोष्ट म्हणजे 'शाब्बास सुनबाई'. आपली स्वप्नं  न विसरता त्या स्वप्नांसाठी झटणाऱ्या  आणि  समोर येईल त्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या अशा सगळ्यांसाठीची आपल्या लाडक्या सन मराठी ह्या वाहिनीवर नुकतीच सुरु झालेली 'शाब्बास सुनबाईही  मालिका तुम्हाला नक्कीच आवडेल.

जगाच्या स्पर्धेत नेहमी पहिलं येण्यासाठी वडिलांनी घडवलेल्या संजीवनीला तिच्या स्वप्नांसाठी खऱ्या अर्थाने संघर्ष करावा लागणार आहे तिच्या लग्नानंतर. ध्यानीमनी नसताना नाशिकच्या प्रतिष्ठित येवलेकर कुटुंबात लग्न झालेल्या संजीवनीसाठी सगळी चक्र लग्नानंतर फिरली. तिच्या या संघर्षाच्या लग्नाच्या निमित्ताने संजीवनीच्या भेटीला येत आहे एक खास पाहुणी आणि ती पाहुणी म्हणजे मृण्मयी देशपांडे'. संजीवनीची गोष्ट आता संघर्षच्या वाटेवर असून मालिकेत तिच्या लग्नाची तयारी जय्यत झालेली आहे. या लग्नसोहळ्यात महाराष्ट्राची लाडकी नायिका मृण्मयी देशपांडे हजेरी लावत असून ती या लग्न सोहळ्यात नाचणार सुद्धा आहे. 'शाब्बास सुनबाईआता रंजक वळणावर आली असून लग्नानंतर संजीवनीचा नेमका कशाशी आणि कोणाशी संघर्ष करावा लागणार आहे? 'शाब्बास सुनबाईम्हणणाऱ्या अप्पा येवलेकरांचा संजीवनीला सून करण्यामागे नेमका काय हेतू आहेअप्पासाहेब खरोखरच महिला सबलीकरणाचे खंदे पुरस्कर्ते आहेत की त्यांच्या रूपात संजीवनीच्या आयुष्यात एका खलनायकाचा प्रवेश होऊ लागलाय थोडक्यातसंजीवनीच्या स्वप्नांसाठी तिचं लग्न विघ्न ठरणार की प्रवाहा विरुद्ध पोहून आपली स्वप्नं साकारण्यात संजीवनी यशस्वी होणारजाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नकानवी मालिका "शाब्बास सुनबाई". सोमवार ते शनिवार रात्री ७ वा. फक्त आपल्या सन मराठीवर.

संजीवनीच्या भूमिकेत रश्मी अनपट तर अप्पांच्या भूमिकेत मयूर खांडगे एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. ह्या मालिकेचे लेखन शार्दुल सराफ व पूर्णानंद वांढेकर यांनी केलं आहेतर दिनेश घोगळे यांनी या मालिकेचं दिग्दर्शन करत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती "सुचित्रा आदेश बांदेकर" यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.

ह्यासोबतच सन मराठी ह्या वाहिनीवर प्रेक्षकांना नात्यांनी सजलेल्या वेगवेगळ्या मालिका संध्याकाळी ७ ते रात्री १०. ३० ह्या वेळेत पाहायला मिळतील. सन मराठीवर संध्याकाळी ७.३० वाजता 'जाऊ नको दूर… बाबा!', रात्री ८ वाजता 'माझी माणसं',  ८.३० वाजता 'कन्यादान', रात्री ९ वाजता 'संत गजानन शेगावीचे', ९. ३० वाजता 'नंदिनीतसेच रात्री १० वाजता 'सुंदरीह्या मालिका दाखविल्या जातात.

सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे.


Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K