वोक्सवॅगन इंडियाला महाराष्ट्राच्या द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांमध्ये प्रचंड क्षमता..

वोक्सवॅगन इंडियाला महाराष्ट्राच्या द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांमध्ये प्रचंड क्षमता दिसत आहेत महाराष्ट्र बाजारपेठ

वोक्सवॅगन इंडियाचे मुख्यालय आणि उत्पादन कारखाने महाराष्ट्रात असल्याने, महाराष्ट्र हे वोक्सवॅगन इंडियाचे घर आहे असे नक्कीच म्हणता येईल. या ब्रँडचा उत्पादन प्लान्ट पुण्यात आणि असेम्ब्ली युनिट औरंगाबादमध्ये आहे. याशिवाय त्यांचे सेल्स व मार्केटिंग ऑफिस मुंबईमध्ये आहे.

महाराष्ट्रामध्ये ग्राहकांची प्रचंड मोठी संख्या व प्रीमियम जर्मन-इंजिनीयर्ड व सुरक्षित गाड्यांना दिली जाणारी पसंती यामुळे वोक्सवॅगन इंडियाने महाराष्ट्राला नेहमीच सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे.

महाराष्ट्रात १२ प्रमुख शहरांमध्ये या ब्रँडने १६ सेल्स व १३ सर्व्हिस टचपॉइंट्सचे मजबूत नेटवर्क उभारले आहे. वोक्सवॅगन इंडियाच्या सध्याच्या नेटवर्कमध्ये १२९ शहरांमध्ये १७२ सेल्स आणि १२९ सर्व्हिस टचपॉइंट्सचा समावेश आहे. 

वोक्सवॅगनच्या सर्व कारलाईन्सना महाराष्ट्रात खूप मागणी आहे. आमची प्रीमियम एसयूव्ही टिग्वानची सर्वाधिक विक्री मुंबईमध्ये होते.वोक्सवॅगन इंडियाच्या एकूण व्हॉल्युममध्ये महाराष्ट्र राज्याचे योगदान तब्बल १५% आहे, आणि त्यामध्ये सर्वात जास्त वाटा मुंबई व पुणे या दोन शहरांचा आहे. 

महाराष्ट्रामध्ये टिग्वान ही सर्वाधिक विकली जाणारी वोक्सवॅगन कार आहे.महाराष्ट्रातील द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांमध्ये प्रचंड वृद्धी होत असल्याचे या ब्रँडला दिसून येत आहे. ब्रँडची उत्तम कामगिरी हे ग्राहकांच्या मागण्या, आवडीनिवडी आणि गरजा यांची सखोल जाण असल्याचे फलित आहे.

महाराष्ट्रातील छोट्या शहरांमध्ये आपल्या डिस्ट्रिब्युशन नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी वोक्सवॅगन इंडियाने धोरणात्मक गुंतवणूक केली आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना वोक्सवॅगनच्या गाड्या विकत घेणे सहज शक्य होत आहे. वोक्सवॅगन गाड्यांची देखरेख, सर्व्हिसिंग तसेच इतर सर्व सेवासुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात, या गाड्यांच्या मालकीचा अनुभव अतिशय सुविधाजनक ठरावा यासाठी या कंपनीने द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांमध्ये डीलरशिप्स व सर्व्हिस सेंटर्स उभारली आहेत, त्यामुळे संभाव्य ग्राहक देखील अतिशय विश्वासाने या ब्रँडकडे पाहत आहेत.  

अधिक सुरक्षित, विश्वसनीय आणि तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत वाहने स्पर्धात्मक किमतींना उपलब्ध करवून देऊन या ब्रँडने महाराष्ट्र राज्यात आपले स्थान मजबूत करत स्वतःचा निष्ठावान ग्राहक वर्ग निर्माण केला आहे.

स्थानिक बाजारपेठेला अनुसरून मार्केटिंगचे महत्त्व जाणून वोक्सवॅगन इंडियाने प्रत्येक क्षेत्राला अनुरूप अशी कॅम्पेन्स व प्रमोशन्स राबवली आहेत. याखेरीज ही कंपनी आपल्या विविध उपक्रमांमार्फत त्या-त्या क्षेत्रांमधील ग्राहकांशी सक्रिय संपर्क साधत असते ज्यामुळे ग्राहक व ब्रँड यांच्यातील नाते व विश्वास अधिकाधिक दृढ होत जाते.

वोक्सवॅगन इंडियाने द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांमध्ये विक्री-पश्चात सेवा अतिशय सुविधाजनक पद्धतीने पुरवण्याला प्राधान्य दिले आहे त्यामुळे त्यांच्या ग्राहकांना अतिशय कार्यक्षम सेवा तातडीने उपलब्ध होतात. आपल्या सेवांचा दर्जा नेहमी उच्च राहावा यासाठी कंपनी बांधील आहे.  त्यामुळे जास्तीत जास्त लोक या ब्रँडविषयी सकारात्मक बोलतात, एकमेकांना याची शिफारस करतात, सहाजिकच गाड्यांची मागणी वाढायला मदत होते.

डिजिटलायजेशनमध्ये होत असलेल्या वाढीचा लाभ घेत वोक्सवॅगन इंडियाने द्वितीय आणि तृतीय बाजारपेठेतील संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन चॅनेल्सचा वापर केला आहे. युजर्ससाठी वापरायला अतिशय सोपी अशी वेबसाईट आणि सोशल मीडियावर ग्राहकांशी सतत संपर्कात राहून या कंपनीने आपले मूल्य प्रस्ताव अतिशय प्रभावीपणे ग्राहकांपर्यंत पोहोचवले आहेत. आजच्या डिजिटल सॅव्ही युजर्सना स्वतःसोबत जोडून ठेवण्यात या कंपनीने यश मिळवले आहे. 

वोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडिया 

वोक्सवॅगनने २००७ साली भारतात प्रवेश केला. तेव्हापासून आजतागायत या कंपनीने आपल्या ग्राहकांना उत्तम बांधणी दर्जा व सुरक्षा असलेल्या गाड्यांचा पोर्टफोलिओ व त्या चालवण्याचा उत्कृष्ट अनुभव उपलब्ध करवून दिला आहे.

टैगून (प्रीमियम मिड-साईझ एसयूव्ही), वर्टस (प्रीमियम मिड-साईझ सेडान) आणि टिग्वान यांच्यासह भारतातील सर्वात सुरक्षित उत्पादन पोर्टफोलिओ सध्या वोक्सवॅगन प्रस्तुत करत आहे. 

वोक्सवॅगनचा उत्पादन पोर्टफोलिओ भारतातील रस्त्यांची स्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे.  उदाहरणार्थ, वर्टसचा ग्राउंड क्लियरन्स तब्बल १७९ एमएम आहे, टैगूनमध्ये देखील सेडान व एसयूव्हीसाठी तितकाच ग्राउंड क्लियरन्स आहे. 

टैगून आणि वर्टस कारलाईन्समध्ये या ब्रँडने अजून प्रगत वैशिष्ट्ये नुकतीच सादर केली आहेत, यामुळे त्यांची परफॉर्मन्स लाईन (१.५ लिटर टीएसआय ईव्हीओ इंजिन) विस्तारली आहे. कंपनीने टैगून जीटी प्लस मॅन्युअल आणि टैगून जीटी डीएसजी यांच्यासोबत वर्टस जीटी प्लस मॅन्युअल आणि वर्टस जीटी डीएसजी हे व्हेरियंट्स प्रस्तुत केले आहेत. 

टैगून आणि वर्टस यांचे उत्पादन पुण्यात चाकणमधील प्लान्टमध्ये केले जाते तर टिग्वानचे असेम्बलिंग औरंगाबादमध्ये केले जाते.

टैगून आणि वर्टस यांचा लोकलायजेशन कन्टेन्ट ९५% पर्यंत आहे.

टैगूनला भारतीय ऑटोमोटिव्ह पब्लिकेशन्सकडून २० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत.  भारतात तयार करण्यात येणाऱ्या अर्थात मेड इन इंडिया टैगूनने २०२१ साली वर्ल्ड कार ऑफ द इयरमध्ये वर्ल्ड अर्बन कार कॅटेगरीमध्ये पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले होते. वर्टसला भारतीय ऑटोमोटिव्ह पब्लिकेशन्सकडून १४ पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत, सेडान ऑफ द इयर २०२२-२३ हा खिताब या कारने मिळवला आहे.

प्रीमियम मिडसाईझ सेडान विभागात २०% हिस्सेदारी मिळवत वोक्सवॅगन वर्टसने आपले यश सिद्ध केले आहे. 

गेल्या वर्षीपेक्षा जास्त वृद्धी साध्य करत २०२३ मध्ये ५० हजारांहून जास्त युनिट्सची विक्री नोंदवण्याची कंपनीची योजना आहे. 

सध्या ग्राहकांमध्ये ऑटोमॅटिक टू मॅन्युअल ट्रान्समिशन प्रिफरन्स रेशो ६०:४० आहे.

वोक्सवॅगनमध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. त्यांच्या टैगून आणि वर्टस या मॉडेल्सना ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राममध्ये (जीएनसीएपी) वयस्क व लहान वयाच्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ५-स्टार रेटिंग मिळाले यावरून ही बाब सिद्ध होते. आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी वाहने उपलब्ध करवून देण्याची वोक्सवॅगनची अढळ निष्ठा या रेटिंग्समधून दिसून येते.

विक्री-पश्चात सेवा दर्जेदार असाव्यात यासाठी हा ब्रँड लक्षणीय प्रयत्न करतो.  त्यांनी ४एव्हर केयर पॅकेज स्टॅंडर्ड म्हणून सादर केले आहे, यामध्ये ४ वर्षांची स्टॅंडर्ड वॉरंटी, ४ वर्षांचा रोडसाईड असिस्टंस आणि ३ मोफत सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. विश्वास व पारदर्शकता यामध्ये सुधारणा करण्यासाठी ब्रँडने सर्व्हिस कॅम सुविधा सुरु केली आहे, यामध्ये ग्राहकांना ज्या गोष्टींची दुरुस्ती आवश्यक आहे त्यांचा व्हिडिओ पाठवला जातो व दुरुस्ती करण्याआधी पूर्वसंमती घेतली जाते. सर्व्हिस कॉस्ट कॅल्क्युलेटरवर ग्राहक मेन्टेनन्सचा खर्च किती येईल ते तपासू शकतात.

वोक्सवॅगन गाड्यांच्या मालकीचा अनुभव ग्राहकांसाठी जास्तीत जास्त आनंददायी व सुविधाजनक असावा यासाठी ब्रँडमार्फत केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे एकूण ओनरशिप खर्चात २५% ची घट झाली आहे. आज एका वोक्सवॅगनच्या सर्व्हिस मेन्टेनन्सचा खर्च प्रति किलोमीटर ०.३९ रुपये म्हणजे प्रति १५००० किलोमीटरसाठी ५८५० रुपये आहे. हा खऱ्या अर्थाने परवडण्याजोगा ओनरशिप अनुभव आहे.

पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा एक भाग म्हणून वोक्सवॅगन इंडियाने आपल्या संपूर्ण नेटवर्कमध्ये १००% ड्राय वॉश सुविधा उपलब्ध करवून दिली आहे.

दास वेलऑटो (डीडब्ल्यूए) हा वोक्सवॅगन ब्रँडचा भारतातील प्री-ओन्ड गाड्यांचा व्यवसाय आहे. यामध्ये मल्टी-ब्रँड खरेदी, विक्री, एक्स्चेंज आणि अपग्रेड या सुविधा दिल्या जातात. महामारीनंतर व्यक्तिगत मोबिलिटीमध्ये वाढ झाल्यामुळे वापरलेल्या गाडयांच्या बाजारपेठेत तेजी आली आहे.  संघटित प्री-ओन्ड कार व्यवसाय म्हणून डीडब्ल्यूए प्लॅटफॉर्मवर इव्हॅल्युएटर ऍप देखील आहे ज्याच्या सहाय्याने ग्राहक आपल्या कारचे मूल्यांकन करून तिची अंदाजे रीसेल किंमत जाणून घेऊ शकतात.

दास वेलऑटो. बिझनेस भारतातील आघाडीच्या ५ ओईएम कंपन्यांमध्ये गणला जात असून २०२३ मध्ये याठिकाणी जवळपास ३०००० गाड्या विकल्या जातील. या व्यवसायाने यंदाच्या वर्षभरात मागील वर्षीपेक्षा २०% जास्त वृद्धी साध्य केलेली असेल. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..