प्रवीण तरडेंचा विनोदी अंदाज

 प्रवीण तरडेंचा विनोदी अंदाज

वैविध्यपूर्ण भूमिकांमधून लेखक, अभिनेता प्रवीण तरडेंनी त्यांची स्वतःची वेगळी शैली निर्माण केली आहे. नेहमीच दमदार भूमिकांमध्ये दिसणारे प्रवीण तरडे प्रथमच एका विनोदी भूमिकेत आपल्याला पहायला मिळणार आहेत. 'दिनिशा फिल्म्सनिर्मित आणीबाणी या मराठी चित्रपटात त्यांचा हा विनोदी अंदाज पहायला मिळणार आहे. हा चित्रपट २८ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणीबाणी सारखा संवेदनशील विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखक अरविंद जगताप यांच्या सोबतीने दाखवलं आहे.

प्रत्येक गावांत एक अवलिया असतो. गावातल्या अनेक छोटया मोठया गोष्टींची बित्तंमबातमी त्याच्याकडे असते. अनेकदा गावात घडणाऱ्या चांगल्यावाईट घडामोडींनाही तोच जबाबदार असतो. सगळ्यांशी जवळीक असलेल्या पैलवान केशवची मजेशीर व्यक्त्तिरेखा प्रवीण तरडे साकारत आहेत. पहाता क्षणी हसू येईल अशी केशभूषा आणि वेशभूषा तरडेंनी यात केली आहे.  नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून त्याची मिश्किल छबी आपल्याला पहायला मिळते आहे.    

आपल्या या नव्या भूमिकेविषयी बोलताना प्रवीण तरडे म्हणालेया भूमिकेने मला आजवर न मिळालेली व्यक्तिरेखा साकारण्‍याची संधी दिली. आणीबाणी मध्‍ये उत्तम कलाकार व टीमसोबत काम करण्‍याचा अनुभव खूप छान होता.

कृष्णा जगतापयोगेश शिंदेसचिन जगतापअमोल महाडिक आणीबाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरनअवधूत गुप्तेआदर्श शिंदेसायली पंकजगणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजीआदित्य पटाईतपंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. छायांकन मंगेश गाडेकरसंकलन प्रमोद कहारनृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत.

आणीबाणी चित्रपट २८ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..