टीव्हीएस मोटर कंपनी
टीव्हीएस मोटर कंपनीची भारतीय सैन्यदलाशी भागिदारी, २४ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त स्त्रियांच्या मोटरसायकल रॅलीचे आयोजन
· या सात दिवसांच्या सफरीमध्ये २५ स्त्री रायडर्स टीव्हीएस रॉनिनवर सहभागी होऊन भारतीय सैन्यदलाचे प्रतिनिधीत्व करणार. नवी दिल्ली ते द्रास अशा या रॅलीची सुरुवात १८ जुलै २०२३ रोजी होणार आहे.
· १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात मिळालेल्या विजयाची २४ वर्ष साजरी करण्यासाठी या १००० किमी राइडचे आयोजन करण्यात आले असून त्याचबरोबर भारतीय सैन्यदलातील स्त्रियांच्या जिद्दीला त्यातून सलाम केला जाणार आहे.
नवी दिल्ली, २० जुलै २०२३ – २४ वा कारगिल विजय दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने भारतीय सैन्यदलाने आज स्त्रियांच्या मोटरसायकल रॅलीचे उद्घाटन केले. दुचाकी व तीनचाकी वाहनांच्या उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीव्हीएस मोटर्स या रॅलीची भागीदार आहे. स्त्रियांच्या या मोटरसायकल रॅलीला जनरल मनोज पांडे, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी प्रमुख, सैन्यदल कर्मचारी आणि सौ. अर्चना पांडे, आर्मी वाइव्ह्ज वेल्फेयर असोसिएशनच्या अध्यक्ष, श्री. विमल सम्बली, टीव्हीएस मोटर्स कंपनीतील प्रिमियम व्यवसायाचे प्रमुख यांनी नॅशनल वॉर मेमोरियल दिल्ली येथून झेंडा दाखवला.
या मोहिमेतून भारतीय सैन्यदलातील स्त्रियांच्या कणखर वृत्तीला सलाम केला जाणार आहे. मुख्यालय नॉर्दन कमांड अंतर्गत नारी शक्तीकरण वुमन मोटरसायकल रॅली नॅशनल वॉर मेमोरियल दिल्ली ते कारगिल वॉर मेमोरियल, द्रासपर्यंत (लडाख) जाणार आहे. या २५ रायडर्स टीव्हीएसच्या रॉनिन मोटरसायकलवर स्वार होतील. ही गाडी या क्षेत्रातील पहिली ‘मॉडर्न- रेट्रो’ मोटरसायकल असून टीव्हीएस मोटर कंपनीने आयुष्य #Unscripted पद्धतीने जगण्याचं धाडस असणाऱ्यांसाठी खास तयार केली आहे. आधुनिक, नव्या युगाच्या रायडर्सपासून प्रेरणा घेत आणि सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह तयार करण्यात आलेली ही २२५ सीसी मोटरसायकल या राइडसाठी अगदी योग्य आहे.
टीव्हीएस रॉनिन आकर्षक स्टाइल, तंत्रज्ञानासह बनवण्यात आली असून तिच्या रायडिंगचा अनोखा अनुभव मुक्त आयुष्य जगण्याची आवड असलेल्या शहरी रायडर्सच्या नव्या पिढीला भुरळ घालणारा आहे. ‘लिव्ह द अनस्क्रिप्टेड लाइफ’ ही या ब्रँडची विचारसरणी असून ती या मोटरसायकलच्या दमदार क्षमतेमध्येही दिसून येते. शहरातले रस्ते असो किंवा आडवाटा... ही मोटरसायकल कोणत्याही मार्गावर चांगली कामगिरी करणारी असल्यामुळे स्त्रियांच्या मोटरसायकल रॅलीसाठी अगदी योग्य आहे.
या सहकार्याविषयी टीव्हीएस मोटर कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री केएन राधाकृष्णन म्हणाले, ‘ताकद, शौर्य आणि निष्ठेचे प्रतीक असलेल्या भारतीय सैन्यदलाशी भागिदारी करणं हा आमच्यासाठी ऐतिहासिक टप्पा आहे. देशभक्ती आणि सबलीकरणाला चालना देणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देण्याची परंपरा टीव्हीएस मोटर कंपनीने जपली असून साहसाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः स्त्री रायडर्सचा उत्साह वाढवण्यासाठी कंपनी बांधील आहे. सैन्यदलाशी सहकार्य करत आम्ही परंपरेच्या चौकटी तोडण्यासाठी, नवी क्षितिजे पार करण्यासाठी व इतरांना प्रेरणा देण्यासाठी स्त्रियांना आवश्यक व्यासपीठ देवण्याचे ध्येय ठेवले आहे. या भागिदारीच्या माध्यमातून आपल्या सैन्याचे साहस व व्यावसायिक वृत्तीला सलाम केला जाणार आहे, शिवाय रायडिंगमधे असलेली बदलाची शक्ती नव्याने समोर आणली जाईल. एकत्रितपणे आम्ही सखोल प्रभाव घडवून आणण्यासाठी आणि प्रगत समाज तयार करण्यासाठी प्रयत्न करत राहू.’
याप्रसंगी टीव्हीएस मोटर्स कंपनीतील प्रिमियम व्यवसायाचे प्रमुख श्री. विमल सम्बली म्हणाले, ‘नारी शक्ती राइडसाठी भारतीय सैन्यदलाशी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. ही राइड स्त्री रायडर्सच्या धाडसी वृत्तीची दखल घेणारी आहे. टीव्हीएस कंपनीमध्ये आम्ही कायमच वैविध्यता आणि सर्वसमावेशकतेला वाव दिला आहे. ही भागीदारी लिंग समानता साध्य करण्याची आमची बांधिलकी दाखवून देणारी आहे. आयुष्य मुक्त आणि हव्या त्या पद्धतीने जगण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी टीव्हीएस रॉनिन खास तयार करण्यात आली आहे. या मॉडर्न रेट्रो मोटरसायकलवरून प्रवास करताना येणारा अनुभव त्यांच्या आयुष्याइतकाच वैविध्यपूर्ण व आनंददायी असेल. नारी शक्तीमध्ये या असामान्य स्त्री रायडर्सची निश्चयी वृत्ती आणि धाडस दिसून येईलच, शिवाय ही राइड भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या धाडसी स्त्रियांच्या कामाची दखल घेण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. टीव्हीएस रोनिनवर स्वार होत कारगिलपर्यंतच्या कठीण प्रवासाचा समावेश असलेल्या या राइडचा भाग होताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे जास्तीत जास्त स्त्रियांना रूढी- परंपरांना आव्हान देण्यास आणि आपल्या यशाचा मार्ग स्वतः आखण्यास प्रेरणा मिळेल.’
हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरचा डोंगराळ भाग व लडाख असा अंदाजे १००० किलोमीटरचा प्रवास करून ही रॅली २५-२६ जुलै २०२३ रोजी द्रास येथील कारगिल वॉर मेमोरियलजवळ पोहोचेल. रायडर्सची ही टीम कारगिल युद्धात मिळालेला विजय सादरा करेल तसेच राष्ट्राची सेवा करताना असीम त्याग केलेल्या सैनिकांना आदरांजली वाहेल.
Comments
Post a Comment