फेडेक्स..
फेडेक्स तर्फे ग्राहकांना उत्सर्जनाची माहिती देण्यासाठी भारतात FedEx® सस्टेनिबिलिटी इनसाइट्स रिपोर्ट सेवा उपलब्ध
नव्या टुलमुळे ग्राहकांना त्यांच्या शिपमेंटमुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाची माहिती मिळेल व त्यांना आपल्या शाश्वततेमधील पारदर्शकता उंचावता येईल
मुंबई, १ ऑगस्ट २०२३ - फेडेक्स कॉर्प. ने (NYSE: FDX) FedEx® सस्टेनिबिलिटी इनसाइट्स हे नवे टुल (साधन) लाँच केले आहे. यामुळे भारतातील* ग्राहकांना फेडेक्स नेटवर्कमधील त्यांच्या शिपमेंटमुळे किती उत्सर्जन होते याची माहिती मिळते. पर्यायाने ग्राहकांना भविष्यात त्यांच्या शिपिंगचे योग्य नियोजन करून पृथ्वीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक निर्णय घेणे शक्य होईल.
त्यासाठी फेडेक्स डेटावर्क्सने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण क्लुड- बेस्ड डेटा इंजिनद्वारे रियल टाइम फेडेक्स नेटवर्क डेटा वापरून कार्बन उत्सर्जनाच्या माहितीचा अंदाज घेतला जातो. ग्राहकांना वैयक्तिक ट्रॅकिंगसाठी उत्सर्जनविषयक माहिती जाणून घेता येईल तसेच त्यांच्या खात्याबद्दल आजवरची माहिती एकत्र करता येईल. या टुलमध्ये दर्शवण्यात आलेल्या डेटामध्ये वाहतुकीचा प्रकार, सेवेचा प्रकार, FedEx Express® शिपमेंटसाठी पात्र देश किंवा प्रदेश यांची माहिती समाविष्ट असते.
आज सर्व प्रकारच्या व्यवसायांमध्ये शाश्वततेला धोरणात्मक महत्त्व आले आहे. FedEx® सस्टेनिबिलिटी इनसाइट्स हे टुल ग्राहकांना पुरवठा साखळीतील त्यांच्या उत्सर्जनाची जास्त चांगली माहिती देईल आणि धोरणात्मक पद्धतीने भविष्यातील शिपमेंट्सचे नियोजन करण्यासाठी पाठिंबा देईल.
‘शाश्वततेची माहिती देणं आणि या माहितीचा योग्य निर्णय घेण्यासाठी वापर करणं हे व्यावसायिक प्राधान्य बनले आहे. त्याचप्रमाणे ग्राहकही खरेदी करताना शाश्वततेला प्राधान्य देत आहेत, ’ असे FedEx Express मध्यपूर्व, भारतीय उपखंड आणि आफ्रिका कामकाज विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष कामी विश्वनाथन म्हणाले. FedEx® सस्टेनिबिलिटी इनसाइट्स आमच्या ग्राहकांना त्यांच्या शिपमेंटमुळे होणाऱ्या उत्सर्जनाची त्या त्या वेळची प्रत्यक्ष माहिती (रियल टाइम) देण्याच्या हेतूने तयार करण्यात आले असून त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्राहकांना योग्य निर्णय घेता येतील व त्यांच्या सस्टेनिबिलीटी रिपोर्टिंगमध्ये सुधारणा करता येतील.’
ही नवी सुविधा कंपनीच्या २०४० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. त्यासाठी फेडेक्स द्वारे फेडेक्स पिकअप आणि डिलीव्हरी वाहनांचे इलेक्ट्रीफिकेशन, जास्त कार्यक्षम सुविधा, इंधन आणि ताफा आणि नैसर्गिकरीत्या कार्बन कॅप्चरमध्ये गुंतवणूक यांवर भर देणार आहे. FedEx® सस्टेनिबिलिटी इनसाइट्समुळे नेटवर्कची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणखी संधी, अचूक माहिती, माहितीच्या आधारे वर्तवता येणारे अंदाज यांची मदत मिळेल.
FedEx® सस्टेनिबिलिटी इनसाइट्स आणि त्याच्या क्षमतांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांना fedex.com इथे भेट देता येईल.
FedEx® सस्टेनिबिलिटी इनसाइट्समध्ये ग्रीनहाउस गॅस उत्सर्जन (कार्बनसमान) मोजण्यासाठी वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय) ग्रीनहाउस गॅस (जीएचजी) प्रोटोकॉलनुसार आवश्यक पद्धत तसेच ग्लोबल लॉजिस्टिक्स एमिशन कौन्सिल (जीएलईसी) फ्रेमवर्क वापरले जाते. त्यामध्ये उत्सर्जनाविषयी या क्षेत्राचे मापदंड, युटिलिटीज आणि वाहतुकीशी संबंधित कामकाजाचे निकष यांचा समावेश असतो. अमेरिका आणि आणि कॅनडाबाहेरील उत्सर्जनाविषयीची माहिती यंत्रणा परस्पर सुसंगत नसल्यामुळे अपुरी असू शकते. वगळण्यात आलेल्या डेटामध्ये फ्रान्स, पोलंड आणि चीनसह विशिष्ट देश/प्रदेशांसाठी देशांतर्गत शिपमेंट माहिती यांचा व इतर काही घटकांचा समावेश आहे. शिपमेंटमध्ये काय आहे याविषयीच्या तपशीलवार डाउनलोडचा समावेश असलेले अहवाल उपलब्ध आहेत. कोणती माहिती वगळण्यात आली आहे याची माहिती वारंवार अद्ययावत केली जाते व पूर्वसूचना न देता त्यात बदल केले जाऊ शकतात.
Comments
Post a Comment