बजाज अलियान्झ लाइफ...

बजाज अलियान्झ लाइफने बजाज अलियान्झ लाइफ एसीई (ACE) च्या द्वारे बचत योजनेमध्ये एक विशेष नावीन्य आणले

प्रथमच असे वैशिष्ठ्य बाजारात आणले जात आहे, जे ग्राहकांना त्यांच्या जीवन ध्येयानुसार आवश्यक तेव्हा हवी तशी रोख रक्कम सानुकूलित करण्यास मदत करते.

पुणे, १७ जुलै, २०२३: भारतातील आघाडीच्या खासगी विमा कंपन्यांपैकी एक, बजाज अलियान्झ लाइफ इन्श्यूरन्सने आज बचत योजनांचा जणू एक ‘ace’ (एक्का) बाजारात आणला. बजाज अलियान्झ लाइफ ऐस (Bajaj Allianz Life ACE) ही एक नॉन लिंक्ड, पार्टीसिपेटिंग, अर्ली इन्कम जीवन विमा योजना आहे, जी ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजांप्रमाणे हवे तेव्हा रोख रक्कम उपलब्ध करून घेण्याची लवचिकता व सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने प्रदान करते. पार्टीसिपेटिंग किंवा बचत जीवन विमा योजना या ग्राहकांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत, कारण त्या सुरक्षा, लिक्विडिटी आणि परतावा अशी तीन महत्त्वाची  वैशिष्ठ्ये प्रदान करतात. बजाज अलियान्झ लाइफच्या आताच्या वर्तमान बचत योजना या वरील तिन्ही वैशिष्ठ्यांसह तर येतातच, शिवाय त्यांना नियमित उच्च परतावा आणि कंपनीने वेळोवेळी जाहीर केलेल्या बोनसचा देखील पाठिंबा असतो. आपल्या या नवीन बजाज अलियान्झ लाइफ ऐस (Bajaj Allianz Life ACE) योजनेद्वारे कंपनीने आपल्या बचत योजनांना आणि त्यांच्या फायद्यांना एक पाऊल पुढे जाऊन अजून मजबूत केले आहे. 

बजाज अलियान्झ लाइफ ऐस (Bajaj Allianz Life ACE) अशा ग्राहकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना एकापेक्षा जास्त जीवन उद्दिष्टांचे नियोजन करण्यासाठी उत्पन्न निर्माण आणि नियंत्रित करण्याची इच्छा असते. या योजनेच्या माध्यमातून आता ग्राहक एखादे अतिरिक्त उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्यासाठी मोठे उत्पन्न मिळवू शकतात किंवा एखादी मोठी मिळकत मिळावी अशा प्रकारे एकदम एकगठ्ठा रक्कम घेऊ शकतात किंवा अगदी नियमित उत्पन्न आणि एकगठ्ठा रक्कम या दोन्हीचे समतोल राखत दोन्हीचा आनंद देखील घेऊ शकतात. विशेष म्हणजे, ही योजना हे सर्व लाभ लाइफ कव्हरच्या व्यतिरिक्त प्रदान करते. या पार्टीसिपेटींग किंवा बचत जीवन विमा योजनांनी या आधी कधीही ग्राहकांना अशा पद्धतीची लवचिकता आणि आवश्यकतेनुसार हवे तसे उत्पन्न फ्लो ठरवण्याची मुभा व तसे पर्याय दिले नव्हते.

बजाज अलियान्झ लाइफ ऐस (Bajaj Allianz Life ACE) बाजारात आणताना बजाज अलियान्झ लाइफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तरुण चुघ म्हणाले, “जी पारंपरिक बचत उत्पादने आहेत त्यांना ग्राहकांसाठी अजून जास्त फायदेशीर बनवण्यासाठी पार्टीसिपेटिंग योजनेमध्ये पहिल्यांदाच अशी विशेष लवचिकता देताना मला खूप आनंद होत आहे.  हे वैशिष्ठ्य ग्राहकांना निवड करण्याची शक्ती प्रदान करते. ग्राहक आपल्या आर्थिक ध्येयांच्या अनुसार उत्पन्नाचे प्रमाण, उत्पन्न कधी मिळावे आणि किती काळापर्यंत मिळावे, कॅश फ्लो कसा हवा आहे हे सर्व स्वतः निवडू शकतात. ही सुविधा यापूर्वी उपलब्ध नव्हती.  आमच्या भूतकाळातील सातत्याने केलेल्या उत्तम कामगिरीच्या पाठिंब्यासह आम्ही या योजनेच्या माध्यमातून देत असलेल्या  लवचिकतेमुळे मला विश्वास वाटतो की, ही नवीन बचत योजना आमच्या ग्राहकांच्या आर्थिक पोर्टफोलिओमध्ये एक महत्वाचे स्थान मिळवेल.”

बजाज अलियान्झ लाइफ ऐस (Bajaj Allianz Life ACE) ची ठळक वैशिष्ठ्ये:

बजाज अलियान्झ लाइफ ऐस (Bajaj Allianz Life ACE) आपल्या ‘डायनामिक इन्कम ऑप्शन’ या प्रमुख वैशिष्ठ्याबरोबर लवचिकता प्रदान करते. यानुसार, ग्राहक त्यांच्या जीवनाच्या ध्येयांच्या दृष्टीने पॉलिसीच्या सुरुवातीला इच्छित उत्पन्न, उत्पन्न चालू करण्याचे वर्ष, उत्पन्नाचा कालावधी, मॅच्युरीटीचे लाभ आणि अजून बरेच काही निवडू शकतात. लाइफ कव्हर बरोबरच ग्राहक आपल्या वेगवेगळ्या आर्थिक गरजा फक्त एकाच योजनेच्या माध्यमातून पूर्ण करु शकतील याची हे वैशिष्ठ्य हमी देते. 

बजाज अलियान्झ लाइफ ऐस (Bajaj Allianz Life ACE) चे आणखी एक  एक अनोखे वैशिष्ठ्य म्हणजे ‘अर्ली ऑर डिफर्ड इन्कम ऑप्शन’. हे वैशिष्ठ्य ग्राहकांना पॉलिसीच्या अगदी सुरुवातीपासूनच उत्पन्न मिळवायला सक्षम करते किंवा त्यांना त्यांच्या सोयीनुसार उत्पन्न मिळण्याची सुरुवात ५ वर्षांपर्यंत पुढे ढकलण्याचा ही पर्याय देते.  हे प्रिमियम भरल्याच्या पहिल्या महिन्याच्या शेवटापासून मिळू शकते किंवा त्यांच्या आर्थिक गरजांनुसार एखाद्या विशिष्ट काळासाठी स्थगित करून त्यांनंतर मिळू शकते. ही योजना ग्राहकांना त्यांच्या उत्पन्नाचा कालावधी कमीतकमी १० वर्षे पासून ते ग्राहकाच्या वयाच्या १०० व्या वर्षापर्यंत निवडण्याची परवानगी देते. 

याशिवाय, बजाज अलियान्झ लाइफ ऐस (Bajaj Allianz Life ACE) गोल प्रोटेक्शन बेनिफिट (ध्येय संरक्षण लाभ) देखील प्रदान करते. पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला पॉलिसीधारकाचे निधन झाले तरीही पॉलिसीच्या मुदती दरम्यान उत्पन्न मिळत राहते.  

बजाज अलियान्झ लाइफ ऐस (Bajaj Allianz Life ACE) महिलांना अतिरिक्त उत्पन्न लाभ देते. यामुळे महिला आता सुरक्षा, लिक्विडिटी, परतावा आणि लवचिकता या वैशिष्ठ्यांचा तर लाभ घेऊच शकतात त्याशिवाय, त्या बजाज अलियान्झ लाइफ ऐस (Bajaj Allianz Life ACE) सोबत आपल्या आयुष्यातील उद्दिष्टांचे नियोजन करत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्न देखील मिळेल. 

बजाज अलियान्झ लाइफ ऐस (Bajaj Allianz Life ACE) चे वेगळेपण काय?

पॉलिसी चालू करताना सुरुवातीला उत्पन्न आणि मॅच्युरिटीच्या लाभांना ग्राहकांना आपल्या सोयीनुसार विशेष पद्धतीने समायोजित करता येते.

मुदत आणि प्रिमियम पेमेंट व उत्पन्न या दोन्हीची रक्कम निवडण्याची लवचिकता 

लाइफ कव्हरच्या सोबत त्याशिवाय वयाच्या १०० व्या वर्षापर्यंत आयुष्यभर उत्पन्न देते. 

उत्पन्न अगदी लवकरात लवकर म्हणजे पॉलिसीच्या पहिल्या महिन्या पासूनच घेता येण्याची मुभा.  

एक ते पाच वर्षांपर्यंत ठराविक काळासाठी उत्पन्न स्थगित करून ते मिळण्याचा काळ पुढे ढकलण्याचा पर्याय. 

पॉलिसी धारकाचे दुर्दैवी निधन झाले तरीही पॉलिसीच्या नॉमिनीला आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी गोल प्रोटेक्शन बेनिफिट (ध्येय संरक्षण लाभ) हे वैशिष्ठ्य डेथ बेनिफिट, प्रिमियमवर माफी, विना थांबता उत्पन्न आणि मॅच्युरिटी लाभ याची हमी देते.

महिला पॉलिसीधारकांना अतिरिक्त उत्पन्न लाभ 

या उत्पादनाच्या अटी आणि नियमांबद्दल अधिक माहितीसाठी https://www.bajajallianzlife.com/  संकेत स्थळाला भेट द्या.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..