सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनची महत्त्वाकांक्षी १५वी स्‍टुडण्‍ट हेल्‍थ असेम्‍ब्‍ली पोहोचली राष्‍ट्रीय स्‍तरावर; भारतातील शहरी भागांमधील २०,००० विद्यार्थ्‍यांचा व्‍हर्च्‍युअली सहभाग

मुंबई, कोलकाता, बेंगळुरू व जयपूरमधील फाऊंडेशनच्‍या ४३४ विद्यार्थी 'हेल्‍थ मॉनिटर्स'नी आरोग्‍यदायी, उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी आवाज उठवला

मुंबई, ४ फेब्रुवारी २०२१: जागतिक कर्करोग दिनानिमित्त सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनच्‍या (एसबीएफ) प्रतिबंधात्‍मक आरोग्‍य उपक्रमाच्‍या २०,००० लाभार्थी विद्यार्थ्‍यांनी फाऊंडेशनच्‍या १५व्‍या स्‍टुडण्‍ट हेल्‍थ असेम्‍ब्‍लीमध्‍ये सहभाग घेतला. खाजगी शाळांमधील मॉडेल युनायटेड नेशन्‍सच्‍या (एमयूएन) आधारावर निर्माण करण्‍यात आलेली असेम्‍ब्‍ली पहिल्‍यांदाच व्‍हर्च्‍युअली आयोजित करण्‍यात आली आणि राष्‍ट्रीय स्‍तरावर पोहोचली. अद्वितीय व्‍यासपीठ असलेल्‍या असेम्‍ब्‍लीने एसबीएफच्‍या समर्थन व नेतृत्‍व फोरम्‍समधील (बाल परिषद व बाल पंचायत)अग्रणी विद्यार्थ्‍यांना सध्‍या सुरू असलेल्‍या महामारीसह आरोग्‍य, पोषण व मानसिक स्‍वास्‍थ्‍यासंदर्भात प्रश्‍ने प्रत्‍यक्ष धोरणकर्ते व भागधारकांना विचारण्‍याची संधी दिली. या कार्यक्रमाला प्रख्‍यात मान्‍यवरांचे पॅनेल उपस्थित होते. उपस्थित मान्‍यवर होते भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय), भारत सरकारचे उपसंचालक डॉ. कृष्‍णा मेठेकर, महाराष्‍ट्र पोलिस विभागाचे (आय.पी.एस.) डीसीपी श्री. प्रविण पाटील, शिक्षण विभाग, महाराष्‍ट्राच्‍या उपसंचालक श्रीमती संघमित्रा त्रिभुवन, सार्वजनिक आरोग्‍य विभाग, महाराष्‍ट्राच्‍या संयुक्‍त संचालक, नोडल अधिकारी डॉ. पद्मजा जोगेवर आणि एमपॉवर माइण्‍ड्सच्‍या आऊटरीच अॅण्‍ड कन्‍टेन्‍टच्‍या व्‍यवस्‍थापक श्रीमती मानसी गोखले.

या कार्यक्रमाबाबत बोलताना सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनच्‍या प्रोजेक्‍ट्सच्‍या (प्रतिबंधात्‍मक आरोग्‍य व संशोधन) उपाध्‍यक्षा त्‍शेरिंग डी. भुटिया म्‍हणाल्‍या,''स्‍टुडण्‍ट हेल्‍थ असेम्‍ब्‍ली हा सलाम बॉम्‍बे फाऊंडेशन त्‍यांचे उपक्रम राबवत असलेल्‍या सरकारी व सरकारी-अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्‍यांनी विद्यार्थ्‍यांसाठी निर्माण केलेला महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. परस्‍परसंवाद विचारशील कल्‍पनांची देवाणघेवाण करतो, ज्‍यामुळे विद्यार्थी प्रतिनिधी व सरकारी भागधारकांमध्‍ये अत्‍यावश्‍यक संवादाला चालना मिळते. परिणामत: धोरण व समुदाय पातळीवर आमूलाग्र बदल घडून येतो. अशा उपक्रमांच्‍या माध्‍यमातून प्रतिबंधात्‍मक आरोग्‍य उपक्रम विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करतो, तसेच त्‍यांचा आत्‍मविश्‍वास व स्‍वावलंबीपणाला चालना देत त्‍यांना त्‍यांच्‍या समुदायांसाठी बदलाचे स्रोत बनण्‍यामध्‍ये सक्षम करतो. या उपक्रमाच्‍या माध्यमातून विद्यार्थ्‍यांना धोरणकर्ते, मीडिया व समुदायांसोबत काम करत त्‍यांच्‍या क्षमतांचा शोध घेण्‍याची संधी मिळते.''

कार्यक्रमामध्‍ये 'हेल्‍थ मॉनिटर्स'नी विचारलेली प्रश्‍ने त्‍यांच्‍या सामुदायिक पोहोचचा भाग म्‍हणून आयोजित करण्‍यात आलेल्‍या सर्वेक्षणामधून मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे विचारण्‍यात आली. 'हेल्‍थ मॉनिटर्स'हे तरूण विद्यार्थी अॅम्‍बेसेडर्स आहेत, जे एसबीएफचा शालेय आधारित आरोग्‍य व पोषणावरील प्रकल्‍प 'प्रोजेक्‍ट खाना'चा भाग आहेत. महापालिका शाळांमधील मुलांचा पौष्टिक दर्जा सुधारण्‍याच्‍या मनसुब्‍यासह हा उपक्रम विद्यार्थ्‍यांना योग्‍य पोषणाचे महत्त्व सांगण्‍यासोबत त्‍यांच्‍या समुदायांमध्‍ये आरोग्‍यदायी पद्धतींचे अॅम्‍बेसेडर्स बनण्‍यास प्रोत्‍साहित करतो. या अग्रणी विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या सहका-यांमध्‍ये योग्‍य पोषणाचे महत्त्व, किफायतशीर व सुलभपणे उपलब्‍ध होणा-या घटकांमधून संतुलित आहारासाठी पाककला, जंक फूडचे प्रतिकूल परिणाम, पोषणामध्‍ये स्‍वच्‍छतेची भूमिका आणि शारीरिक व्‍यायामाचे लक्षणीय महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण करण्‍यास प्रोत्‍साहित केले जाते.

तसेच, फाऊंडेशनचा प्रतिबंधात्‍मक आरोग्‍य उपक्रम सध्‍या सुरू असलेल्‍या महामारीदरम्‍यान देखील त्‍यांच्‍या लाभार्थी विद्यार्थ्‍यांपर्यंत सक्रियपणे पोहोचला आहे आणि त्‍यांनाऑनलाइन सत्रांच्‍या माध्‍यमातून रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवणारे खाद्यपदार्थ, मायक्रो-गीन्‍स व किचन गार्डनिंगच्‍या महत्त्वाबाबत माहिती सांगत आहे.

२००७ पासून एसबीएफचे बाल पंचायत व बाल परिषद सारखे फोरम्‍स अनुदानित शाळेमधील विद्यार्थ्‍यांना त्‍यांचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍यावर परिणाम करणा-या विविध समस्‍यांविरोधात आवाज उठवण्‍याची आणि योग्‍य कारवाई करण्‍याची संधी देत आले आहेत. या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून फाऊंडेशनच्‍या शालेय प्रतिबंधात्‍मक आरोग्‍य उपक्रमांचे भाग असलेले विद्यार्थी सहकारी सल्‍लागारांचे नेटवर्क विकसित करतात आणि त्‍यांच्‍या समुदायांमध्‍ये परिवर्तनासाठी धोरणांची माहिती सांगतात. बाल पंचायतमधील निवडक शालेय सदस्‍य दरवर्षी धोरणकर्त्‍यांची पूर्तता करणारी बाल परिषद स्थापित करतात. धोरणकर्त्‍यांमध्‍ये विविध विभागांमधील वरिष्‍ठ सरकारी अधिका-यांचा समावेश असतो. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K