ब्लू डार्ट जाहीर करत आहे राखी एक्स्प्रेस ऑफर
ब्लू डार्ट जाहीर करत आहे राखी एक्स्प्रेस ऑफर मुंबई , 1 ऑगस्ट , 2023: ब्लू डार्ट या भारतातील आघाडीची एक्स्प्रेस लॉजिस्टिक्स सर्व्हिस प्रोव्हायडरने तसेच डीएचएल ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीने , यंदाच्या सणासुदीच्या काळात भावंडांमधील नात्यांचे बंध जोपासण्यासाठी , आपली वार्षिक राखी एक्स्प्रेस ऑफर पुन्हा आणत असल्याची घोषणा केली आहे . या ऑफरद्वारे ग्राहक राख्या आणि भेटवस्तू सवलतीच्या दरात पाठवू शकतील . देशभरात कोठेही 0.50 किलोग्रॅम वजनाचे पार्सल 250 रुपयांत पाठवण्याची सवलत ब्लू डार्ट ग्राहकांना देत आहे . शिवाय , 0.50 ते 20 किलो वजनाच्या आंतरराष्ट्रीय शिपमेंट्सच्या मालवाहतुकीवरही ग्राहकांना 50 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे . ही ऑफर 31 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू आहे . सण साजरा करण्याचा एक भाग म्हणून , या ऑफर कालावधीत देशांतर्गत राखी पाठवणाऱ्या ग्राहकांना ...