कन्साइ नेरोलॅक पेंट्सने नेरोलॅक एक्सेल मल्टि सरफेस प्रोटेक्शन शीट्स” बाजारात आणल्याची घोषणा केली 

मुंबई फेब्रुवारी 52021भारतातील आघाडीच्या पेंट कंपन्यांपैकी एक कन्साइ नेरोलॅक पेंट्स लिमिटेड (केएनपीएल)ला आपला नवीनतम चाकोरीबाह्य नवोन्मेष नेरोलॅक एक्सेल मल्टि सरफेस प्रोटेक्शन शीट्स सादर करताना अभिमान वाटत आहे. नेरोलॅक नवोन्मेषावर तसेच आपल्या उत्पादन श्रेणी व ग्राहक जागरूकता अभियानांच्या माध्यमातून रूपांतरण आणि पर्यावरणविषयक संवेदनशीलतेला प्रोत्साहित करण्यावर सातत्याने काम करत आहे. 

नेरोलॅक एक्सेल मल्टि सरफेस प्रोटेक्शन शीट्स” खऱ्या अर्थाने अनन्यसाधारण आहेत. याचे लाभ जीवाणूविरोधीविषाणूविरोधी गुणधर्मांपासून ते दुर्गंध व आर्द्रतेच्या नियंत्रणापर्यंत अनेकविध आहेत. या शीट्स घरातील विविध पृष्ठभागांवर वापरली जाऊ शकतात. कपड्यांची कपाटेस्टडी टेबल्सशू रॅक्सडोअरनॉब्जमिल्क बास्केट्सजिनेकचरापेटी अशा अनेक ठिकाणी या शीट्स घालता येतात. या शीट्स दोन सोयीस्कर आकारमानांमध्ये व दरांत उपलब्ध आहेत. ए4 आकारमानाच्या शीटची एमआरपी ८००/- रुपये आहेतर ए2 आकारमानाच्या शीटची एमआरपी २०००/- रुपये आहे. अ‍ॅमेझॉनवरील नेरोलॅक ब्रॅण्ड स्टोअरवर तसेच पेंट विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये या शीट्स उपलब्ध आहेत. 

कन्साइ नेरोलॅक पेंट्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. अनुज जैन या लाँचबद्दल म्हणाले, घरातील आयुष्याचा दर्जा सुधारू शकेल, अशा सोल्युशन्सचा ग्राहक नेहमीच शोध घेत असतात. दुर्गंधआर्द्रता आणि जंतूंच्या अस्तित्त्वामुळे घरात आरोग्य व वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. बाजारात उपलब्ध असलेली बहुतेक उत्पादने तात्पुरता उपाय करतात आणि त्यावर घरखर्चातील बराच भाग वाया जातो. नेरोलॅक एक्सेल मल्टि सरफेस प्रोटेक्शन शीट्स” या अनेक घरगुती समस्यांवर उपाय म्हणून तसेच दीर्घकाळासाठी आपल्या घरांचे आरोग्य व स्वच्छता सोयीस्कर पद्धतीने सुधारण्याच्या हेतूने डिझाइन करण्यात आल्या आहेत. भारतीय घरांना हा नवोन्मेष आवडेल आणि तो वापरला जाईलअसा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.

ग्राहकांना निरोगी व निर्जंतुक वातावरण देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नेरोलॅकने नेरोलॅक एक्सेल मल्टि सरफेस प्रोटेक्शन शीट्स” हे उत्पादन आणले आहे. निरोगी व सुंदर भवितव्यासाठी पर्यावरणाची उभारणी करण्याप्रती कंपनी कायमच बांधील आहे. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K