मराठी सिनेमा 'फ्री हिट दणका'

सोमनाथ अवघडे देणार १६ एप्रिलला 'फ्री हिट दणका'

कोरोनानंतर तब्बल ११ महिन्यांनी चित्रपटगृह पूर्णक्षमतेने सुरु करण्याचे सरकारने ठरवले आहे. आता चित्रपटगृह सुरु होणार या बातमीनेच प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीमध्येही नवा जोश संचारला आहे. निर्माते, दिग्दर्शकांसोबत सर्वच जणं त्यांचे सिनेमे प्रदर्शित करण्याची तयारी करत असून, चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करत आहे. यात हिंदीसोबतच अनेक मराठी चित्रपटांनी त्यांच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे. 

यातच मराठी सिनेमा 'फ्री हिट दणका'ची देखील प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. या सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करत 'फ्री हिट दणका'च्या टीमने हा सिनेमा १६ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. या प्रेमाच्या महिन्याचे औचित्यसाधून या टीमने चित्रपटाच्या नायकाच्या नावाची देखील घोषणा केली आहे. अपूर्वा एस.या अभिनेत्रींसोबत नायक म्हणून फेंड्री फेम अभिनेता सोमनाथ अवघडे दिसणार आहे. फेंड्री नंतर बऱ्याच दिवसांनी सोमनाथ अभिनय करताना दिसणार आहे. सोमनाथचा या सिनेमातला लुक पाहून आणि हातात बॅट पाहून हा सिनेमा क्रिकेटच्या अवती भवती फिरणारा तर नाहीना? आणि चित्रपटाच्या नावातूनही या चित्रपटाचा क्रिकेटशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच मिळतील.मात्र सोमनाथच्या फॅन्ससाठी हा सिनेमा म्हणजे एक पर्वणीच असणार आहे. यापूर्वीच या सिनेमातील अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) ही हिट जोडी जाहीर करण्यात आली आहे. वॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या या  सिनेमाच्या पोस्टरमध्ये सर्वत्र प्रेमाचाच रंग विखुरलेला आहे. प्रेम आणि प्रेमाच्या विविध छटा पोस्टरमध्ये लक्ष वेधून घेत आहे. 

एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा सुनिल मगरे यांची असून चित्रपटाचे निर्माते अतुल रामचंद्र तरडे आणि आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे, आणि सुनिल मगरे हे आहेत. सहनिर्माता म्हणून नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी काम पाहिले आहे. संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवाद आणि गीतलेखन केले आहे.  सिनेमाला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीतबद्ध केले असून चित्रपटाचे छायाचित्रण हजरत शेख (वल्ली) यांचे आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K