नानावटी मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल आणि ऑर्किड्स - द इंटरनॅशनल स्कूल्स यांनी सुरू केले
व्यापक लसीकरण अभियान : चला, पुन्हा जगू या
मुंबई महानगर क्षेत्रातील २ लाखांहून अधिक रहिवाशांचे लसीकरण करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
मुंबई, २७ ऑगस्ट, २०२१ : नानावटी मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलतर्फे ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलच्या सहयोगाने २६ ऑगस्ट रोजी व्यापक लसीकरण अभियानाची सुरुवात करण्यात आली. ‘चला, पुन्हा जगू या’ (लेट्स लिव्ह अगेन) अभियानांतर्गत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथील १० केंद्रांच्या माध्यमातून २ लाखांहून अधिक रहिवाशांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
या अभियानाचा भाग म्हणून, नानावटी मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलने ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलच्या प्रमुख शाखा आणि इतर कम्युनिटी सेंटर्सना मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या स्थानिक व आरोग्य प्रशासनाच्या सहकार्याने सुसज्ज लसीकरण केंद्रांमध्ये परिवर्तीत केले आहे. या केंद्रांमध्ये लाभार्थींना कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सिन लस घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या खासगी लसीकरणकर्त्यांमध्ये नानावटी हॉस्पिटलचा समावेश आहे. त्यांनी ५०० ठिकाणी लसीकरण अभियान राबविले असून ७ लाखांहून अधिक लाभार्थींनी लस घेतली आहे.
हे पाऊल उचलण्यामागची संकल्पना समजावून सांगता नानावटी मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख मंगला डेंबी म्हणाल्या, “कोव्हिड-१९ च्या महामारीचा शेवट करण्यासाठी सर्वांना वेळेवर लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. नागरी आणि आरोग्य प्रशासनाच्या मार्गदर्शनांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘चला, पुन्हा जगू या’ अभियानांतर्गत सर्वांचे सुरक्षित आणि परिणामकारक लसीकरण करण्यात येईल. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, फक्त लस महामारीचा अंत करणार नसून, लसीकरण या महामारीचा शेवट करेल. आवश्यक सुरक्षा उपाययोजनांसह व्यापक प्रमाणावर करण्यात येणारे लसीकरण कोव्हिड-१९ च्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाचे आहे.
या उपक्रमाबद्दल माहिती देताना ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक अंमलबजावणी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव सिंग म्हणाले, “ही महामारी थांबविण्यासाठी प्रत्येकाने आपापली भूमिका बजावली पाहिजे. सार्वजनिक खासगी भागीदारी, संशोधक, उत्पादक, सरकारे, सार्वजनिक वितरण यंत्रणा, आरोग्यसेवा कर्मचारी यांनी त्यांची भूमिका व्यवस्थित पार पाडली आहे आणि आपल्या हितासाठी भूमिका बजावून त्यात योगदान देण्याची आपली पाळी आहे. महामारी थांबविण्यास मदत करण्यासाठी लस घेणे हा एक महत्त्वाचा मार्ग आहेच, पण त्याचबरोबर मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे ही इतर प्रकारची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे.”
Comments
Post a Comment