Copy of Wing_L_color

 

 

 

 

प्रत्येक राइडसह घ्या आयुष्याचा आनंद

 

180-200 सीसीमधे होंडाने तयार केला नवा ट्रेंडलाँच केली नवी

FINAL CB 200X

 

अनोखे डिझाइन

·       ठळकदमदार आणि शहरी बाजाचं डिझाइन रायडिंगसाठी सर्वोत्तम

·       स्पोर्टी अंडर कोल आणि अपस्वेप्ट एक्झॉस्ट दर्शवतात राकटपणा

·       ताठ रायडिंग स्थितीमुळे चालकाला कोणत्याही प्रकारचा थकवा येत नाही

·       हाय- एंड मशिनप्रमाणे उंचावलेले हँडलबार्स

·       उंच व्हायजरमुळे एयरोडायनामिक्स सुधारले असून वाऱ्याला होणारा प्रतिबंध कमी झाला आहे.

·       नकल कव्हर्स आणि एलईडी विंकर्समुळे उठावदारपणा

·       लांबआरामदायीस्पोर्टी स्पिल्ट स्टेप सीटमुळे दूरवरच्या प्रवासात मिळतो आराम

·     5 वाय आकाराच्या अलॉय व्हील्समुळे खुलले रूप सौंदर्यात भर

दर्जेदार तंत्रज्ञान आणि आरामदायीपणा

·       गोल्ड अपसाइड डाउन (यूएसडी) फ्रंट फोर्क्समुळे नेमकेपणाने स्टिअरिंग होते व चांगले कुशनिंगही मिळते

·       पूर्णपणे डिजिटललिक्विड क्रिस्टल मीटर आणि गियरची स्थिती दर्शवणारा इंडिकेटकरडिजिटल घड्याळसर्व्हिसिंगची सूचना देणारा इंडिकेटर व बॅटपी व्होल्टमीटरसाख्या आधुनिक सुविधा

·       ऑल- एलईडी लायटिंग सेटअपमुळे अधिक चांगली दृश्यमानता व विश्वासार्हता मिळते

·       टफ ट्रेड पॅटर्न टायर्समुळे चांगली पकड व नियंत्रण मिळते

·       पुढच्या व मागच्या पेटल डिस्क ब्रेक्सना एबीएसची जोड दिल्यामुळे चालकाचा आत्मविश्वास वाढतो

·       मोनो- शॅक रियर सस्पेन्शनमुळे हाताळणी व आरामदायीपणा मिळतो

·       छोट्या थांब्यांसाठी इंजिन स्टॉप स्विच

·       आपत्कालीन थांबा आणि कमी दृश्यमानता असल्यास हझार्ड स्विच

·       टाकीवर किल्लीची सोय असल्यामुळे चालकाची चांगली सोय होते

  


दमदार कामगिरी

·       ताकदवान आणि प्रभावी 184 सीसी बीएसव्हीआय पीजीएम- एफआय इंजिनमुळे रायडिंगचा अनुभव जास्त दमदार

·       डायमंड प्रकारच्या स्टील फ्रेममुळे स्थैर्य लाभतेशिवाय हाताळणी वेगवान होते.

ग्राहकांसाठी खास मूल्य

CB200X वर खास 6 वर्षांचे वॉरंटी पॅकेज*

·       आकर्षक किंमतीत रू,४४,५०० रुपये एक्स- शोरूमगुरुग्राम

19 ऑगस्ट 2021 – वेगाने विकसित होत असलेल्या 180- 200 सीसी मोटरसायकल क्षेत्रात नवा ट्रेंड प्रस्थापित करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज भारतात नवी CB200X लाँच केली. अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आलेली ही गाडी दैनंदिन वापरासाठी तसेच नव्या वाटा धुंडाळण्यासाठी सर्वोत्तम आहे. नवी CB200X शहरातील धकाधकीच्या रस्त्यांवर तसेच वीकेंडला शहरापासून दूर निवांत प्रवासाला जाण्यासाठी योग्य आहे.

3 नव्या पेटंट अर्जांची जोड लाभलेली CB200X होंडाच्या नाविन्यपूर्णतेचा उत्कृष्ट नमुना असून ग्राहकांच्या अपेक्षांच्या पलीकडे जात वाहनप्रवासाचे भविष्य दर्शवणारी आहे.

या लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, होंडाच्या प्रख्यात सीबी गाडीच्या वारशापासून प्रेरणा घेत तयार करण्यात आलेली नवी मोटरसायकल लाँच करताना मला अतिशय आनंद होत आहे. भारतीय तरुणांचीत्यांच्यासारख्या शहरी मुसाफिराची बदलती जीवनशैली लक्षात घेऊन CB200X तयार करण्यात आली आहे. ही गाडी आजच्या तरुणांना नवनव्या वाटा धुंडाळण्यासाठी प्रेरणा देणारा अनुभव देते. रायडर्सचा उत्साह वाढवण्याच्या हेतून तयार करण्यात आलेली CB200X शहरातील दैनंदिन प्रवासासाठी तसेच वीकेंडला शहरापासून दूर सुट्टी घालवण्यासाठी जातानाची उत्तम साथीदार आहे.

याविषयी अधिक माहिती देत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, 180- 200 सीसी क्षेत्रात स्थिर क्रांतीचा टप्पा आणणारी CB200X ही तरुणांसाठी तयार करण्यात आलेली खास शहरी गाडी आहे. तिचे डिझाइन होंडाच्या उच्च दर्जाच्या साहसी बाइक्सवरून घेण्यात आले आहे. गाडीचे एकंदर डिझाइन रायडरला ताठ तरीही आरामात बसण्यायोग्य असून त्यामुळे शहरातील तसेच शहराबाहेरचा प्रवासही सुखद होतो. दमदार कामगिरी करणाऱ्या या गाडीचे इंजिन ताकदवान टॉर्क तसेच उच्च आरपीएम देणारी आहे. गाडीचे अनोखे नकल कव्हर्स आणि इंटिग्रेटेड एलईडी विंकर्सगोल्डन युएसडी फ्रंट फोर्क्स व इतर वैशिष्ट्यांमुळे CB200X रस्त्यावर उठून दिसतेशिवाय तिचा राकटपणा कोणालाही भुरळ घालणारा आहे. शहरी रस्ते असो किंवा इतर CB200X तुम्हाला प्रत्येक राइडसह नव्या वाटा शोधण्याची प्रेरणा देते.  

अनोखी स्टाइल आणि दर्जेदार तंत्रज्ञानासह तयार करण्यात आलेली CB200उच्च दर्जाची कामगिरी करते तसेच रायडिंगसाठी ती सर्वोत्तम आहे. विविध स्टायलिश वैशिष्ट्यांचा समावेश असलेली CB200अचूक इंजिनियरिंग आणि आक्रमक रूप यांचा संगम आहे.

वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन

CB200मधे अपस्वेप्ट एक्झॉस्ट बसवण्यात आल्यामुळे त्याचा स्पोर्टी आणि राकट लूक आणखीनच खुलून येतो. त्याचे अंडर कॉलही एकंदर रूप उठावदार करतात.

रायडरला थकवा येऊन नये म्हणून योग्य पद्धतीने बसवण्यात आलेले फूट पेग्जउंचावलेले हँडलबार्स होंडाच्या इतर उच्च दर्जाच्या गाड्यांपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेले आहेत. त्यामुळे CB200चे डिझाइन तसेच राकटपणा उठून दिसतो.

उंच व्हायसरमुळे रायडरला सहजपणे हालचाल करता येते व ते गाडीच्या एकंदर रुपाशी सुसंगत आहे. नव्या CB200मध्ये नकल कव्हर्स इंटिग्रेटेड एलईडी विंकर्ससह बसवण्यात आले असल्यामुळे जवळपासच्या नव्या वाटांवर प्रवास करताना रायडरचा आत्मविश्वास उंचावतो. यामुळए रायडर्सचे बाह्य वातावरणापासून संरक्षण होतेचशिवाय गाडीचा उठावदारपणाही उंचावतो.

लांब आणि आरामदायी स्पोर्टी स्पिल्ट सीटमुळे (613एमएम) रायडर तसेच पिलियन कायम आरामात बसू शकतात. सीटची उंची (810एमएम) रायडरचा आत्मविश्वास आणि आरामदायीपणा वाढवणारी आहे.

CB200सारखी स्टाइल आणि मजबूती इतर कुठेही पाहायला मिळणार नाही. याचे वजनला हलके स्टायलिश ५ वाय आकाराचे अलॉय व्हील्स गाडीचा एकंदर दर्जा वाढवतातशिवाय  खडकाळ भूभागावर ती हाताळणेही सोपे होते.

उच्च तंत्रज्ञान व सोयीस्करपणा

दर्जेदार अभियांत्रिकी आणि सौंदर्यासह गोल्ड अपसाइड डाउन (युएसडी) फ्रंट फोर्क्समुळे अचूक स्टिअरिंग शक्य होते व गाडीचे रूप खुलून येते.

गाडीच्या कार्यक्षमतेशी सुसंगत पूर्णपणे डिजिटल लिक्विड क्रिस्टल मीटरमुळे खूप प्रकाशमान तसेच अंधाऱ्या वातावरणात चांगली दृश्यमानता मिळते. गियरची स्थिती दर्शवणारा इंडिकेटरसर्व्हिसिंग करायची सूचना देणारा इंडिकेटर आणि बॅटरी व्होल्टमीटरसारखी महत्त्वाची माहिती 5 स्तरीय अडजस्टेबल ब्राइटनेससह स्क्रीनवर उपलब्ध होते.

अंधाऱ्या वळणांवर CB200X चे एलईडी लायटिंग सेटअप (एलईडी हेडलॅम्प पोझिशन लॅम्पएलईडी विंकर्स आणि प्रसिद्ध एक्स- काराचे एलईडी टेल लॅम्प) योग्य वाट दाखवतेचशिवाय त्यांचा प्रखर प्रकाश कमी उजेड असलेल्या कोणत्याही वातावरणात फायदेशीर ठरतो.

वीकेंड ट्रेल्स किंवा नव्या वाटांवर प्रवास करणं गाडीच्या टफ ट्रेड पॅटर्न टायर्समुळे (पुढचे 110 एमएम आणि मागचे 140 एमएम) सहज शक्य होतं. या टायर्समुळे गाडीची कामगिरी उंचावते आणि रस्त्यावरची पकड अधिक मजबूत होते.

वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर प्रभावीपणे ब्रेकिंगची सोय देणाऱ्या CB200X मध्ये एबीएससह पेटल डिस्क ब्रेक्स (पुढे आणि मागे) देण्यात आले आहेत.

मोनो- शॉररियर सस्पेन्शनमुळे गाडीला चांगले स्थैर्य व नियंत्रण मिळते व पर्यायामुळे रायडिंगचा अनुभव तसेच कोपऱ्यांत वळणातानाची हाताळणी अधिक चांगली होते.

इंजिन स्टॉप स्विचमुळे गाडीचे इग्निशन बंद करणे खूप सोपे होतेतर हझार्ड स्विचमुळे कमी दृश्यमानता असलेल्या ठिकाणी रायडरची सुरक्षितता जपली जाते. इंधनाच्या टाकीवर किल्लीची जागा असल्यामुळे रायडरची सोय वाढते.

थरारक कामगिरी

नवी CB200X अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रेरणादायी डिझाइनसह बनवण्यात आली असून ती दमदार कामगिरी करते. भारत स्टेज फोरचे पालन करणारे अत्याधुनिक 184 सीसी पीजीएम- एफआय इंजिन CB200X ला ताकद देते. पीजीएम- एफआय सिस्टीममध्ये ऑनबोर्ड सेन्सर्स वापरण्यात आलेले आहेतजे योग्य प्रमाणात इंधन आणि हवेचे मिश्रण करतात व पर्यायाने गाडीची कार्यक्षमते तसेच कामगिरी सुधारते.

गाडीचे दमदार अक्सलरेशन आणि इनटेक व एक्झॉस्ट घटकांच्या पूर्ण वापरातून तयार होणारा जलद प्रतिसाद यातून मिळतो. 12.7 kW @ 8500 rpm आणि 16.1 Nm @ 6000 rpm सह CB200X चे इंजिन हाय रेव्हमध्ये स्पोर्टी पॉवर आणि समतोल मिड- रेंज टॉर्क देते.

रोलर रॉकर आर्ममुळे गाडीची पॉवर डिलीव्हरी सफाईदार होते व त्यातून घर्षण कमी होण्यास मदत होते. इंजिनला पिस्टन कूलिंग जेटची जोड देण्यात आली असून ते उष्णता प्रतिबंधक म्हणून काम करते व इंजिनची औष्णिक कार्यक्षमता वाढते. डायमंड प्रकारच्या स्टील फ्रेममुळे स्थैर्य आणि वेगवान हालचाली सुधारतात.

अत्यावश्यक विश्वासार्हता

ग्राहकांना आणखी खूष करण्यासाठी CB200X होंडाचे 6 वर्षांचे वॉरंटी पॅकेज (3 वर्षांची स्टँडर्ड 3 वर्षांची पर्यायी विस्तारित वॉरंटी*) दिले जाणार आहे.

रंग आणि किंमत

नवी CB200X पर्ल नाइटस्टार ब्लॅकमॅट सेलेनसिल्व्हर मेटॅलिक आणि स्पोर्ट्स रेड या तीन आकर्षक रंगांत उपलब्ध करण्यात आली आहे. CB200X ची किंमत रू. १,४४,५०० एक्स शोरूम गुरुग्राम आहे. आजपासून होंडातर्फे भारतातील आपल्या सर्व अधिकृत वितरकांकडे CB200X ची नोंदणी खुली केली जाणार आहे.

नवी मोटरसायकल 21 सप्टेंबर 2021 पासून होंडा टुव्हीलर नेटवर्कमध्ये येण्यास सुरुवात होईल. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी भेट द्या https://www.honda2wheelersindia.com/BookNow/.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..