यंदा जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त सलाम बॉम्बे फाऊंडेशनचा संसाधनांचा अभाव असलेल्या मुलांना व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी निपुण फोटोपत्रकारांसोबत सहयोग
मुंबई, १९ ऑगस्ट: सलाम बॉम्बे फाऊंडेशनने (एसबीएफ) सध्याच्या कोविड काळादरम्यान जगाला सेवा वाहिलेल्या फोटोपत्रकार या फ्रण्टलाइन योद्धांना जागतिक छायाचित्रण दिन समर्पित केला. याप्रसंगी प्रदर्शन, वेबिनार व मास्टरक्लासच्या माध्यमातून व्यवसाय म्हणून फोटोपत्रकारितेच्या क्षमतेवर भर देण्यात आला.
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त मेन्टॉर्स म्हणून पाच प्रतिष्ठित फोटोपत्रकारांनी योग्यरित्या फोटो कॅप्चर करण्याच्या आणि त्याबाबत फोटो संग्रह करण्याच्या टेक्निकल पैलूंबाबत वर्कशॉप्सची शृंखला आयोजित केली. पोर्ट्रेट्स, स्कायलाइट, लँडस्केप आणि ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोग्राफी अशी विविध तंत्रे व वैशिष्ट्यांबाबत ज्ञान देण्यात आले. विद्यार्थ्यांना फोटोपत्रकारांच्या कामाच्या शैलीबाबत देखील ओळख करून देण्यात आली. दि इकॉनॉमिक टाइम्सचे नितीन सोनावणे, मातृभूमीचे (मल्याळम) प्रविण कजरोलकर, असोसिएटेड प्रेसचे रजनीश काकडे, लोकमतचे दत्ता खेडेकर आणि हिंदुस्तान टाइम्सचे प्रफुल गांगुर्डे हे मेन्टॉर्स होते. विद्यार्थ्यांच्या मोबाइल्सवर क्लिक करण्यासोबत तयार करण्यात आलेल्या ३० फोटो संग्रहांची निष्पत्ती शिक्षण विभाग, त्रिवेणी संगम बीएमसी शाळा इमारत, करी रोड येथे प्रत्यक्ष दाखवण्यात आली. 'एक्स्पोज: न्यू स्टोरीज थ्रू ए लेन्स' या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बीएमसी शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी श्री. राजा तडवी आणि बीएमसीच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या दोशी उपस्थित होत्या. तसेच बीएमसी शिक्षण विभागामधील कला विभागाचे प्रमुख श्री. दिनकर पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले.
१९ ऑगस्ट रोजी असलेल्या वेबिनारमध्ये बीएमसी शिक्षण विभागामधील कला विभागाचे प्रमुख श्री. दिनकर पवार हे प्रमुख वक्ते होते. पॅनलिस्ट्सनी पॅनेल चर्चेदरम्यान संसाधनांचा अभाव असलेल्या तरूणांसाठी करिअर म्हणून फोटो पत्रकारितेवर भर देण्याबाबत चर्चा केली. पॅनलिस्ट्समध्ये प्रख्यात फोटोग्राफर श्री. रितेश उत्तमचंदानी, मुंबईतील सोफिया पॉलिटेक्निकच्या व्हिजिटिंग फॅकल्टी श्रीमती. जीरू मुल्लाह आणि डॉक्युमेण्टरी फोटोग्राफर श्री. इंद्रजीत खांबे हे होते. प्रत्येकाने त्यांचे वैयक्तिक व व्यावसायिक अनुभव सांगितले. वेबिनारनंतर प्रख्यात मिड-डे फोटोग्राफर आशिष राणे यांनी मास्टरक्लास घेतले.
या उपक्रमाबाबत बोलताना सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या प्रोजेक्ट्सच्या (आर्ट्स अॅण्ड मीडिया) उपाध्यक्षा श्रीमती राजश्री कदम म्हणाल्या,''कोविड-१९ चा संस्थात्मक कार्यक्रम, ज्ञान देणारे वर्कशॉप्स व सेमिनार्सवर परिणाम झाला असला तरी एसबीएफ या स्थितीवर मात करत अध्ययनाशी अनुकूल वातावरण निर्माण करण्याप्रती कटिबद्ध आहे. व्हर्च्युअल प्रदर्शन, वर्कशॉप्स व यासारख्या मास्टरक्लासच्या माध्यमातून आम्ही सिद्धांतासह व्यावहारिक ज्ञान देण्यामध्ये आणि आमच्या विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलो आहोत. त्यांना असलेल्या विशेषाधिकारांना डावलण्याचे कोणतेच कारण नाही.''
मीडिया अकॅडमीमध्ये महापालिका शाळांमधील वंचित विद्यार्थ्यांना पत्रकारिता, फोटोग्राफी, प्रिंट प्रॉडक्शन, डिजिटल प्रॉडक्शन आणि क्रिएटिव्ह डिझाइनमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. यामुळे त्यांना सॉफ्ट-स्किल्स, लेखन व वैयक्तिक कौशल्ये विकसित करण्यास, तसेच त्यांचा आत्मविश्वास व स्वयं-प्रतिमा सुधारण्यास मदत होते. अकॅडमी विद्यार्थ्यांना मीडिया संबंधित करिअर्सची माहिती देखील देते आणि त्यांची कौशल्ये दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ देते.
Comments
Post a Comment