मराठी क्रिकेट लीग दिमाखात संपन्न

शेलार मामा फॉउंडेशनचा पुढाकार

 

मराठी चित्रपटसृष्टीतील नृत्यकलाकारांसाठी आयोजित ‘मराठी क्रिकेट लीग’ नुकतीच दिमाखात संपन्न झाली. स्वातंत्र्यदिनी ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडलेल्या या लीग मध्ये नृत्यदिग्दर्शक आणि नृत्यकलाकारांच्या १३ संघांचा समावेश होता. ‘शेलार मामा फॉउंडेशन’ च्या सहकार्याने रंगलेल्या या स्पर्धेत नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे यांचा संघ विजयी ठरला तर नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांचा संघ उपविजेता ठरला.

कोविड काळानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या लीगसाठी निर्माती श्रेया योगेश कदम यांची उपस्थिती सर्व कलाकारांना मार्गदर्शक राहिली. अभिनेता सुशांत शेलार यांचे मोलाचे सहकार्य या स्पर्धेला लाभले. या कठीण काळात या सर्व नर्तकांना मदतीचा हात मिळावा यासाठीसुद्धा शेलार मामा फॉउंडेशनने पुढाकार घेतला. गरजू नृत्यकलाकारांसाठी रेशन कीट उपलब्ध करून देण्यात आले.

केवळ कोरोना काळापुरती ही मदत नसून ‘मराठी क्रिकेट लीग कमिटी’ नृत्यकलाकारांना नेहमीच सहकार्य करीत राहील. तसेच त्यांच्या चांगल्या वाईट प्रसंगात सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी खात्री अभिनेता सुशांत शेलार यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO