नानावटी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल

नानावटी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील इमेजिंग व रेडिओलॉजी विभागाला प्रतिष्ठेची एनएबीएच-एमआयएस अधिमान्यता

एनएबीएच एमआयएस अधिमान्यता प्राप्त झालेले मुंबईतील एकमेव रुग्णालय ~

मुंबई17 ऑगस्ट2021नानावटी मॅक्स सुपर स्पेशिअॅलिटी हॉस्पिटल हे एनएबीएच-एमआयएस अधिमान्यता प्राप्त करणारे मुंबईतील एकमेव रुग्णालय ठरले आहेयासाठीच्या मानकांमध्ये दर्जा सुरक्षितता व्यवस्थापनदर्जेदार सेवा देणे तसेच सर्व निदानात्मक व इंटरव्हेन्शनल इमेजिंग सेवांबाबत मार्गदर्शन पुरवणे आदी घटकांचा समावेश होतो.

राष्ट्रीय रुग्णालय व आरोग्यसेवा पुरवठादार अधिमान्यता मंडळ (एनएबीएचहे भारतीय दर्जा परिषदेचे घटकमंडळआरोग्यसेवा संस्थांसाठी अधिमान्यता कार्यक्रम प्रस्थापित करण्याच्या व राबवण्याच्या उद्देशानेस्थापन करण्यात आले आहे.

नानावटी मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवा विभागाचे संचालक व इमेजिंग विभागाचे प्रमुख डॉदीपक पाटकर म्हणाले, “मुंबईत सर्वप्रथम एनएबीएच-एमआयएस प्रमाणपत्र प्राप्त करणारे रुग्णालय झाल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहेकोणत्याही क्वाटर्नरी केअर आरोग्यसेवा संस्थेसाठी रेडिओलॉजी विभाग हा मध्यवर्ती असतोआधुनिक रेडिओलॉजी आस्थापनाची व्याप्ती केवळ इमेजिंग अभ्यासापुरती मर्यादित नाहीतर ते मिनिमल इन्वेजिव इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये उपचारात्मक भूमिका निभावतेप्रगत तंत्रज्ञान व अनुभवी तज्ज्ञांची टीम यांच्यासह आम्ही आरोग्यसेवेचे मानक सर्वोत्कृष्ट राखण्यासाठी प्रयत्नशील असतो.”

नानावटी मॅक्स हॉस्पिटलचा अत्याधुनिक इमेजिंग विभाग ६४-स्लाइस कार्डिअॅक क्षमतेच्या पेट-सीटी स्कॅनरने सुसज्ज आहे आणि याद्वारे कार्डिअॅक सीटी स्कॅन पाच सेकंदांहून कमी काळात पूर्ण होतोसर्व इमेजिंग प्रणाली पिक्चर आर्कायव्हिंग अँड कम्युनिकेशन सिस्टमने (पीएसीएसजोडलेल्या आहेतत्यामुळे अचूक नोंदींसाठी आवश्यक असा उत्कृष्ट दृश्यात्मक दर्जा साध्य करणे शक्य होते.

एमआरआय विभागाकडे ३२ चॅनल्सचा रुंद बोअर आहेत्याचप्रमाणे कार्डिअॅक एमआरआयएमआर स्पेक्ट्रोस्कोपीकार्टिलेज मॅपिंग आदी अनेक प्रगत अभ्यासांतून विकसित झालेले तसेच उत्कृष्ट इमेज दर्जा साध्य करून देणारे शॉर्ट टनेल होल बॉडी ३ टेसला मशिन या विभागाकडे आहेनानावटी मॅक्स हॉस्पिटलचा इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभाग हा प्रगत एण्डोव्हस्क्युलर प्रक्रिया करणाऱ्या भारतातील काही अगदी मोजक्या केंद्रांपैकी एक आहेपेडिअॅट्रिक सॉफ्टवेअरसह होल बॉडी डेन्सिटोमेट्री करणारा हा देशातील एकमेव विभाग आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..