पेटीएम कॅशबॅक
महाराष्ट्रातील पेटीएम युजर्सना वीज बिलदेयकांच्या पेमेण्ट्सवर मिळू शकते जवळपास ५० रूपयांची खात्रीदायी कॅशबॅक आणि आकर्षक ऑफर्सचा लाभ
- ही ऑफर टाटा पॉवर मुंबई, अदाणी इलेक्ट्रिसिटी, बेस्ट आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या वीज बिलदेयकांच्या पेमेण्ट्सवर लागू आहे
- युजर्सना पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, डेबिट व क्रेडिट कार्डस् किंवा नेट बँकिंग या त्यांच्या पसंतीच्या पेमेण्ट मोडमधून निवड करण्याची सुविधा
भारताचे आघाडीचे डिजिटल पेमेण्ट्स व फायनान्शियल सर्विसेस व्यासपीठ पेटीएमने आज घोषणा केली आहे की, महाराष्ट्रातील युजर्सना ॲपवर त्यांचे वीज बिलदेयक भरल्यास खात्रीदायी कॅशबॅक मिळू शकते. पेटीएमवर वीज बिलदेयकाच्या पहिल्या पेमेण्ट्वर युजर्सना जवळपास ५० रूपयांपर्यंत खात्रीदायी कॅशबॅक मिळेल. तसेच विद्यमान युजर्सना प्रत्येक बिलदेयक पेमेण्टवर खात्रीदायी रिवॉर्ड व जवळपास १०,००० कॅशबॅक पॉइण्ट्स मिळतील, जे अव्वल ब्रॅण्ड्सकडील अद्वितीय डील्स व गिफ्ट वाऊचर्ससाठी रिडिम करता येऊ शकतील.
ही कॅशबॅक ऑफर महाराष्ट्रातील टाटा पॉवर मुंबई, अदाणी इलेक्ट्रिसिटी, बेस्ट आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड या सर्व प्रमुख वीज वितरण कंपन्यांच्या बिलदेयक पेमेण्ट्सवर लागू आहे,
पेटीएम ॲपच्या माध्यमातून वीज बिलदेयकाचे पेमेण्ट भरण्यासाठी एक मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो. युजर्सनी त्यांचे राज्य व सर्विस प्रदाता निवडून त्यांचे बिल क्रमांक किंवा ग्राहक क्रमांक प्रविष्ट करावे आणि त्यानंतर ते पेमेण्ट करू शकतात. पेटीएम युजर्सना पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, डेबिट व क्रेडिट कार्डस् किंवा नेट बँकिंग अशा त्यांच्या पसंतीच्या पेटीएम मोडमधून निवड करण्याची सुविधा देते. पेमेण्ट त्वरित होते आणि युजर्सना बिल पेमेण्ट पूर्ण झाल्यानंतर पावती मिळते. पेटीएम एसएमएस आणि इन-ॲप नोटिफिकेशन्सच्या माध्यमातून पेमेण्ट्ससाठी देय तारखेबाबत देखील आठवण करून देते.
पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले, ''देशामधील बहुतेक प्रत्येक घरासाठी वीज बिल हा दरमहा भरणा करावा लागणारा खर्च आहे. आमचा विश्वास आहे की, वीज बिलदेयक भरण्यासाठी पेटीएम ॲपचा एकसंधीपणा व सुलभता, तसेच खात्रीदायी कॅशबॅक लहान शहरे व नगरांमधील युजर्सना युटिलिटी बिले भरण्यासाठी डिजिटल पेमेण्ट्सचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करेल.''
पेटीएमने प्रत्येक कुटुंबाला सेवा देण्यासाठी देशभरातील ७० हून अधिक विद्युत मंडळांसोबत सहयोग केला आहे. पेटीएम युजर्स त्यांच्या घरांमधूनच आरामात मोबाइल रिचार्ज करू शकतात, त्यांचे क्रेडिट कार्ड बिल भरू शकतात, सिलिंडर्स बुक करू शकतात आणि इतर अनेक नियमित पेमेण्ट्स देखील करू शकतात. या सर्व सुविधा भारतभरातील नागरिकांना सेवा देण्यासाठी भारताच्या अव्वल तंत्रज्ञान विचारवंतांनी निर्माण केलेल्या जलद, सुरक्षित, विश्वसनीय व लाभदायी अनुभवासह मिळतात.
Comments
Post a Comment