भारतातील लिंडे पीएलसीतर्फे नव्या उपक्रमाच्या माध्यमातून
ऑक्सिजन संवर्धनाविषयी जागरूकता
ऑगस्ट, 2021- भारतातील लिंडे पीएलसी या वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठादार अग्रणी कंपनीने वैद्यकीय ऑक्सिजन उपकरणांचा योग्य आणि सुरक्षित वापर करण्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी आज ‘सेव्ह ऑक्सिजन, सेव्ह लाईव्ह्ज’ या नव्या सार्वजनिक सेवा मोहिमेचा शुभारंभ केला.
नुकत्याच आलेल्या कोव्हीड-19 च्या दुसऱ्या लाटेत भारतातील रुग्णांच्या संख्येने आपत्कालीन उपचारांमधील आणि आयुष्य वाचविण्यामधील वैद्यकीय ऑक्सिजनच्या भूमिकेवर अभूतपूर्व प्रमाणात लक्ष वेधून घेतले. वैद्यकीय ऑक्सिजन उपकरणे सुयोग्य प्रकारे हाताळण्यातील तुटपुंजे ज्ञानही या निर्मित्ताने उघड झाले. परिणामी, विशेष करून वैयक्तिक वैद्यकीय ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आणि त्याचा अपव्ययही झाला.
लिंडेचे दक्षिण आशिया प्रमुख मोलोय बॅनर्जी म्हणाले, “भारताला अशा संकटाचा सामना पुढे कधीही करावा लागणार नाही अशी आम्हाला आशा आहे, तरीही भविष्यासाठी जय्यत तयारीत असणे सुनिश्चित करण्याची गरजही या संकटाने लक्षात आणून दिली आहे. ऑक्सिजन अतिशय मौल्यवान असा जीव वाचवणारा स्रोत आहे आणि या मोहिमेच्या माध्यमातून वैद्यकीय ऑक्सिजन उपकरणांचा सुयोग्य वापर व्हावा, अनपेक्षित अपव्यय टाळला जावा आणि या महासाथीच्या विरोधात जी लढाई आपण लढत आहोत त्याला पाठींबा मिळावा यासाठी जागरूकता वाढवता येईल असा विश्वास आम्हाला वाटत आहे.”
या मोहिमेअंतर्गत वैद्यकीय ऑक्सिजन उपकरणे योग्य प्रकारे कशी हाताळावीत याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी लिंडेच्या आरोग्यसेवा ग्राहकांना आणि भागीदार रुग्णालयांना विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप केले जाईल आणि त्यांच्या आरोग्यसेवा ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हा अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाईल. वैयक्तिक वैद्यकीय ऑक्सिजन उपकरणांच्या मालकांनी ऑक्सिजनच्या योग्य वापर करावा यासाठी नेहमीच वैद्यकीय व्यवसायिकांचा सल्ला घ्यावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अनावश्यक साठा करण्यापासून परावृत्त करण्यासाठी सोशल मिडीयाचाही वापर करण्यात येणार आहे.
कोव्हीड-19 महासाथीच्या विरोधात देशात जी लढाई लढली जात आहे त्यासाठी लिंडेने जे अनेक उप्रकम हाती घेतले त्याचाच हा पुढचा प्रयत्न आहे. गेल्या काही महिन्यात लिंडेने देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा आणि वितरण करण्यासाठी सक्रिय भूमिका पार पाडली. ज्या राज्यांकडे ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा होता तेथून तो ज्यांना गरज आहे अशा राज्यात पोहोचविण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्यासाठी त्यांनी सरकारसोबत काम केले.
हा संदेश भारतात सर्वत्र पोहोचावा यासाठी हा मोहिमेमध्ये वैद्यकीय संघटना आणि रुग्णालयांना भागीदार करून घेतले जाणार आहे. लोकांनी जेव्हा शक्य असेल तेव्हा लसीकरण करून घ्यावे, सार्वजनिक ठिकाणी असताना मास्क वापरावा आणि सामजिक अंतराच्या पालनासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा यासाठी लिंडे सातत्याने लोकांना प्रोत्साहन देत असते.
श्री. मोलोय बॅनर्जींचा सेव्ह ऑक्सिजन हा संदेश बघण्यासाठी पुढील संकेतस्थळावर जा - https://we.tl/t-HhZMGBt1Fl
Comments
Post a Comment