मिशलिन

मिशलिनला पॅसेंजर कार टायर विभागासाठी मिळाले भारतातील पहिले इंधन कार्यक्षम ५ स्‍टार रेटिंग 

ब्‍युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्‍सी (बीईई) कडून मिशलिन लॅटिट्यूड स्‍पोर्ट ३ आणि मिशलिन पायलट स्‍पोर्ट ४ एसयूव्‍ही ५ स्‍टार रेटिंगसह प्रमाणित 

मिशलिन ही जगातील अग्रगण्‍य सस्‍टेनेबल मोबिलिटी कंपनी भारत सरकारने नवीन सादर केलेल्‍या मान्‍यताकृत स्‍टार लेबलिंग प्रोग्रामसह भारतातील प्रवासी वाहन विभागातील पहिली टायर ब्रॅण्‍ड बनली आहे. मिशलिन लॅटिट्यूड स्‍पोर्ट ३ आणि मिशलिन पायलट स्‍पोर्ट ४ एसयूव्‍हीला ५ स्‍टार रेटिंग मिळाले आहे, ज्‍यामधून भारतीय ग्राहकांना सर्वोत्तम जागतिक शाश्‍वतपूर्ण तंत्रज्ञान व अत्‍याधुनिक उत्‍पादने देण्‍याप्रती मिशलिनची कटिबद्धता दिसून येते. नुकतेच मिशलिन त्‍यांचे मेड इन इंडिया व्‍यावसायिक वाहन टायर मिशलिन एक्‍स® मल्‍टी एनर्जी झेडसाठी ब्‍युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्‍सी (बीईई) कडून ४ स्‍टार रेटिंग मिळणारा भारतातील पहिला ब्रॅण्‍ड बनला.    

भारतीय प्रदेशासाठी बी२सी व्‍यावसायिक संचालक मनिष पांडे म्‍हणाले, ''मिशलिनमध्‍ये आमचा विश्‍वास आहे कीगतीशीलतेचे भविष्‍य असण्‍यासाठी ते मोठ्या प्रमाणात पर्यावरणास अनुकूल, सुरक्षित व उपलब्‍ध होण्‍याजोगे असले पाहिजे. नुकतेच आमच्‍या व्‍यावसायिक वाहन टायरसाठी पहिले ४-स्‍टार लेबल मिळाल्यानंतर आम्‍हाला पुन्‍हा एकदा भारतातील आमच्‍या दोन सर्वात लोकप्रिय पॅसेंजर कार टायर-लाइन्‍ससाठी भारताचे पहिले ५ स्‍टार रेटिंग मिळण्‍याचा आनंद होत आहे. आमच्‍या ब्रॅण्‍डसाठी हे पहिले ५ स्‍टार रेटिंग आमच्‍या ग्राहकांमध्‍ये अधिक आत्‍मविश्‍वास निर्माण करेल, जेथे त्‍यांना इंधन-कार्यक्षम, सुरक्षित आणि देशातील कार्बनचे प्रमाण कमी करण्‍याप्रती योगदान देणारे टायर्स निवडण्‍याची उत्तम सुविधा मिळेल. आम्‍ही आमच्‍या भारतीय ग्राहकांना भारतीय रस्‍त्‍यांवर सुरक्षित, आरामदायी व कार्यक्षम ठेवण्‍यासाठी सर्वोत्तमरित्‍या निर्माण करण्‍यात आलेले सर्वात प्रगत तंत्रज्ञान देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.''     

भारत सरकार पायाभूत सुविधा विकासाच्‍या दिशेने सातत्‍याने प्रयत्‍न करत आहे, जेथे २०२०-२१ मध्‍ये देशातील राष्‍ट्रीय महामार्ग (एनएच) बांधकामाच्‍या गतीने प्रतिदिन ३७ किमी अंतराचा विक्रम स्‍थापित केला. हे रस्‍ते सुरक्षित, तसेच अधिक कार्यक्षम, आरामदायी व आत्‍मविश्‍वासपूर्ण बनवण्‍यासाठी टायर उद्योगाने उद्योगासाठी अधिक नवोन्‍मेष्‍कारी योगदान देण्‍याप्रती सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नांसह महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऊर्जा मंत्रालय आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी आराखड्याचा एक भाग म्हणून ग्रीन मोबिलिटीकडे सुरळीत संक्रमणासाठी २०२१ मध्ये अंतिम अधिसूचना प्रकाशित करण्यात आली होतीज्यामध्ये कार्सबसेस व ट्रक्‍सच्‍या टायर्सनी ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स (एआयएस)च्या स्टेज-१ वर आधारित बीईई शेड्यूल ३० मध्ये निर्दिष्‍ट करण्‍यात आलेल्‍या रोलिंग रेसिस्टन्स व वेट ग्रिपच्या आवश्यकतांची पूर्तता करण्‍याचा प्रस्‍ताव करण्‍यात आला. या प्रक्रियेअंतर्गतमिशलिन इंडिया हा व्यावसायिक वाहन तसेच प्रवासी कार या दोन्ही विभागांसाठी नोंदणी करणारा पहिला ब्रॅण्‍ड आहे आणि त्यानंतर मिशलिन लॅटिट्यूड स्पोर्ट ३ आणि पायलट स्पोर्ट ४ एसयूव्‍ही टायर्ससाठी भारतातील पहिले ५ स्टार रेटिंग देण्यात आले.   

भारतात विकले जाणारे सर्व टायर्स रोलिंग रेसिस्टन्स आणि वेट ग्रिप यांसारख्या महत्त्वपूर्ण कार्यक्षमता आणि सुरक्षा मानकांची पूर्तता करण्याची मागणी नवीन नियमांमध्ये केली जाईल. हे नियम अनिवार्य होतील तेव्हा सर्व राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय उत्पादक आणि ट्रकबस व प्रवासी कार टायर्सच्या आयातदारांना भारतात विकल्या जाणार्‍या टायर्सला बीईई स्टार लेबल देणे आवश्यक असेल.   

मिशलिन लॅटिट्यूड स्‍पोर्ट ३ ही मिशलिनच्‍या जागतिक लाइन-अपमधील लॅटिट्यूड ऑन-रोड एसयूव्‍ही टायर्सची तिसरी पिढी आहे. हे टायर्स विभागातील सर्वोत्तम ड्रायव्हिंग अनुभव, इंधन वापरासंदर्भात सर्वोत्तम कार्यक्षमता आणि सर्व प्रकारच्‍या प्रदेशांमध्‍ये उल्‍लेखनीय ग्रिप देण्‍यासाठी अद्वितीयरित्‍या डिझाइन करण्‍यात आले आहेत. हे टायर्स किमान रोल रेसिस्‍टन्‍ससह ओल्‍या रस्‍त्‍यांवर सर्वोत्तम रोड ग्रिप देतात, ज्‍यामधून सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता मिळते. टायरची अपवादात्‍मक डिझाइन उच्‍चस्‍तरीय आरामदायीपणा आणि ब्रेकिंग किंवा ॲक्‍सेलरेटिंगच्‍या वेळी अधिकतम टॉर्क ट्रान्‍सफर देते, ज्‍यामधून स्टिअरिंगवरील नियंत्रणाची अधिक खात्री मिळते.  

मिशलिन पायलट स्‍पोर्ट ४ एसयूव्‍ही टायर अमर्यादित ड्रायव्हिंग आनंद, सर्वोत्तम लांबचे अंतर, प्रभावी ब्रेकिंग कार्यक्षमता आणि गतीशील हाताळणी देण्‍यासाठी विकसित करण्‍यात आलेला उच्‍च-कार्यक्षम, प्रिमिअम एसयूव्‍ही टायर आहे. पायलट स्‍पोर्ट ४ एसयूव्‍ही टायर्स सुक्‍या व ओल्‍या रस्‍त्‍यांवर ब्रेकिंगदरम्‍यान लहान ब्रेकिंग अंतरांसह सहकारी टायर्सना मागे टाकतात. तसेच हा टायर सर्वोत्तम रोल रेसिस्‍टन्‍स देतो, ज्‍यामधून सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता व सुरक्षिततेची खात्री मिळते.   

स्टार लेबलिंगसाठी मापदंड:  

एआयएस टायर्सची विविध पैलूंवर स्टार लेबलिंग चाचणी करतेजसे की रोलिंग रेसिस्टन्स कोएफिशिएण्‍ट चाचणी आणि वेट ग्रिप इंडेक्स चाचणी. रोलिंग रेसिस्टन्स कोएफिशिएण्‍ट चाचणी टायरच्या लोडच्या रोलिंग गुणोत्तरावर केली जाते. याउलटवेट ग्रिप इंडेक्स चाचणी कॅन्डिडेट टायरची कार्यक्षमता आणि मानक संदर्भ चाचणी टायरची कामगिरी यांच्यातील गुणोत्तराच्या मापदंडांवर केली जाते. प्रत्येक चाचणीने प्रत्येक स्टार रेटिंग बॅण्‍डसाठी किमान थ्रेशोल्ड पूर्ण करणे आवश्यक आहे. ५ स्टार श्रेणीची किमान मर्यादा ० किग्रॅ/टन आणि कमाल मर्यादा ८ किग्रॅ/टन आहे. 

इंधन बचत आणि ५-स्टार महत्त्वाचा प्रभाव: 

५ स्टार उत्पादन इतर कमी स्टार-रेट केलेल्या टायरच्या तुलनेत सरासरी ९.५ टक्‍के  कमी इंधन वापरते, जे ग्‍लोबल वार्मिंगसाठी कारणीभूत घटक ग्रीनहाऊस गॅसचे उत्‍सर्जन कमी करते. तुम्‍ही कमी स्‍टार-रेट केलेल्‍या टायरच्‍या तुलनेत ५-स्‍टार उत्‍पादन खरेदी करता तेव्‍हा सरासरी जवळपास ७५० किग्रॅ कमी कार्बन डायऑक्‍साइड उत्‍सर्जन होते. जगभरात इंधनाच्या किंमती अस्थिर असल्यामुळे ग्राहक ५-स्‍टार रेटेड टायर्स खरेदी करत मोठ्या प्रमाणात पैशांची बचत करू शकतात. मोठ्या प्रमाणात पैशाची बचत करू शकतात.  

अस्‍वीकरण (*):  

  • मिशलिन ५ स्टार रेटेड टायर विरुद्ध वन स्टार रेटेड टायरच्या तुलनेत एका स्टार बॅण्‍डचे सरासरी आरआरटी मूल्य विचारात घेण्‍यात आले आहे. 
  • कार्बन डायऑक्‍साइड कपात आणि इंधन बचत मूल्‍ये मिशलिन अंतर्गत सिम्‍युलेशनवर आधारित आहेत, जे ऑडी ए८ सारख्‍या लक्‍झरी एसयूव्‍हींसह संयोजित 'वर्ल्‍डवाइड हार्मोनाइज्‍ड लाइट वेईकल्‍स टेस्‍ट प्रोसिजर'चा वापर करते. सिम्‍युलेशनसाठी सरासरी वाहन वजन २७०० किग्रॅ गृहीत धरले आहे.  
  • ४०,००० किमी पेक्षा जास्त अंतरासाठी इंधनाचा वापर आणि कार्बन डायऑक्‍साइड उत्सर्जन कमी होण्याचा अंदाज आहे. वाहन व ड्रायव्हिंगच्या परिस्थितीनुसार परिणाम बदलू शकतो.   

Comments