ग्रीनसेल मोबिलिटी
प्रवास करताना महिलांसाठी सुरक्षितता तर
पुरुषांसाठी आराम सर्वात महत्त्वाचा
ü वक्तशीरपणाचे सेवांशी संबंधित पैलू आणि थांब्यावर असलेल्या सुविधा यासुद्धा प्रवासी महिलांसाठी महत्त्वाच्या आहेत
मुंबई, 22 जून 2022 : ग्रीनसेल मोबिलिटीच्या न्यूगो या फ्लॅगशिप आंतर-शहर इलेक्ट्रिक प्रवासी बोगी ब्रँडने केलेल्या सर्वेक्षणानुसार प्रवासाचा पर्याय निवडताना महिला सुरक्षितता या पैलूला सर्वाधिक महत्त्व देतात तर पुरुष आरामदायीपणाला प्राधान्य देतात. कंटार या जागतिक पातळीवरील आघाडीच्या इनसाइट्स व कन्सल्टिंग कंपनीच्या भागीदारीने केलेले हे सर्वेक्षण हा अशा प्रकारचा पहिलाच मुलाखतींवर आधारित अभ्यास आहे. यात भारतातील 10 शहरांमधील 2800 प्रतिसादकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. या सर्वेक्षणात विविध प्रकारच्या बस प्रवासी सेगमेंटचा समावेश करण्यात आला आहे - प्रीमिअम एसी, परवडण्याजोग्या एसी, नॉन-एसी आणि या सर्वेक्षणासाठी गुणात्मक व संख्यात्मक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.महिलांसाठी सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे आणि ड्रॉप पॉइंट म्हणजेच बस थांबा त्यांच्या ठिकाणाच्या जवळ असणे महिलांसाठी (26%) महत्त्वाचे आहे, हा घटक पुरुषांसाठी तुलनेने कमी (22%) महत्त्वाचा आहे. या अभ्यासात असेही आढळून आले आहे की, प्रवासी महिलांकडून आरामदायी इंटिरिअर असलेल्या प्रीमिअम बसला प्राधान्य देण्यात आले आहे आणि केबिनमध्ये येणारा आवाज नसावा, अशी अपेक्षा करण्यात आली आहे. म्हणजे ही सेवा देणाऱ्या प्रीमिअम बस ब्रँड्सना महिलांनी प्राधान्य दिले आहे. तिकीट आरक्षणासंदर्भातही महिलांचे मत वेगळे आहे. ऑफलाइन तिकीट घेण्याला महिलांनी (45%) प्राधान्य दिले आहे तर पुरुषांमध्ये हे प्रमाण कमी (35%) आहे.
या अभ्यासात असेही आढळून आले की, पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून आंतर-शहर प्रवास विकसित होत आहे, पण सेवा पुरवठ्याच्या दृष्टीने त्यात अजून सुविधा अपेक्षित आहे. आंतर-शहर बस ऑपरेटर निवडताना वक्तशीरपणा, स्वच्छता, थांबे, खानपान सेवा य सेवा पुरुष व महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे.
या विविध पैलूंपैकी वक्तशीरपणा/वेळेत गाडी सुटणे, प्रवासाला लागणारा प्रत्यक्ष कालावधी आणि अपेक्षित कालावधी आणि थांब्यांवर मिळणाऱ्या सुविधा पुरुषांच्या तुलनेने महिलांसाठी अधिक महत्त्वाच्या आहेत.
या अभ्यासात महिला प्रवाशांची प्रोफाइलली समजून आली आहे. दक्षिणेतील उच्चभ्रू महिलांचे प्रमाण (40% एनसीसी ए) उत्तरेतील (28% एनसीसी ए) आणि पश्चिमेच्या (23 एनसीसी ए) महिलांच्या तुलनेने अधिक आहे. पश्चिम भागात पगारदार महिलांचे प्रमाण अधिक (42%) आहे. त्या तुलनेने उत्तरेकडील महिलांचे प्रमाण 17% तर दक्षिणेतील महिलांचे प्रमाण 18% आहे.
प्रवाशांच्या या गटाला हाताळण्यासाठी न्यूगो भारतीय ग्राहकांना जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव उपलब्ध करून देत प्रवासी वाहतूक क्षेत्राचे नवप्रवर्तक आहेत. या सेवेबद्दल प्रतिक्रिया देताना ग्रीनसेल मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक अगरवाल म्हणाले, “न्यूगो आंतर-शहर बस प्रवास क्षेत्र इलेक्ट्रिक बस आणत आहे. या बस भारतीय प्रवाशांना, विशेषतः महिला प्रवाशांना सुरक्षित, अखंडित प्रवासी अनुभव देऊ करतील. न्यूगो हा ग्राहककेंद्री ब्रँड असून न्यूगो कोचेस भारतातील 75 शहरांमध्ये उपलब्ध असतील. इंदूर-भोपाळ हा त्याचा पहिला प्रवासी मार्ग लवकरच सुरू होईल.”
ही एक वैशिष्टपूर्ण सेवा असून, न्यूगो बसमध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान असेल आणि कस्टमर लाउंज, अॅप बुकिंग, लाइव्ह ट्रॅकिंग आणि अखंडित ग्राहक अनुभव उपलब्ध करून देण्यात येईल.
Comments
Post a Comment