FedEx Expressचा ‘सर्वोत्कृष्ट कार्गो एअरलाइन ऑपरेटर’
‘नॅशनल लॉजिस्टिक्स एक्सलन्स ॲवॉर्ड्स’तर्फे FedEx Expressचा ‘सर्वोत्कृष्ट कार्गो एअरलाइन ऑपरेटर’ म्हणून गौरव
भारत, २४ जून, २०२२ - FedEx Corp. (NYSE: FDX) ची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी असलेल्या FedEx Express हिला ‘नॅशनल लॉजिस्टिक्स एक्सलन्स ॲवॉर्ड्स’तर्फे ‘सर्वोत्कृष्ट कार्गो एअरलाइन ऑपरेटर’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग या खात्यांचे केंद्रिय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार कंपनीला नुकताच प्रदान करण्यात आला.
‘द नॅशनल लॉजिस्टिक्स एक्सलन्स ॲवॉर्ड्स’ हा पुरस्कार लॉजिस्टिक्स क्षेत्रात नावीन्यता आणणाऱ्या आणि परिवर्तन घडवणाऱ्या कंपन्यांना भारत सरकारतर्फे देण्यात येतो. खंबीर आणि कार्यक्षम पुरवठा साखळी निर्माण करणाऱ्या, कोविड साथीच्या काळात आव्हानांवर मात करणाऱ्या आणि भारतातील व्यापार वाढीत योगदान देणाऱ्या सर्वोत्कृष्ट कंपन्यांना या पुरस्काराच्या माध्यमातून यंदा गौरविण्यात आले.
FedEx Expressचे भारतीय कामकाज विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट महंमद सायेघ म्हणाले, “आमची कार्यान्वयीन उत्कृष्टता, आमच्या ग्राहकांचे समाधानकारक अनुभव आणि आम्ही घडवीत असलेले डिजिटल परिवर्तन यांकरीता ‘नॅशनल लॉजिस्टिक्स एक्सलन्स ॲवॉर्ड्स’मध्ये आम्हाला ‘सर्वोत्कृष्ट कार्गो एअरलाइन ऑपरेटर’ म्हणून पुरस्कार देण्यात आला, हा आमचा मोठाच गौरव आहे. या प्रतिष्ठित सन्मानासाठी आणि सततच्या पाठिंब्याबद्दल आम्ही भारत सरकारचे मनापासून आभार मानू इच्छितो.”
“चांगल्या काळात आणि तीव्र गरज असण्याच्याही काळात आम्ही जगाला जोडून ठेवतो, हेच आमचे FedExमध्ये काम आहे आणि यातच आमची खरी ओळख आहे. FedEx Expressच्या टीमने कोविड साथीच्या काळात व्यावसायिक व मदतीचे कार्य सुरू ठेवले आणि त्याही पलिकडे जाऊन आपले अस्तित्व दाखवून दिले. मी हा पुरस्कार या संपूर्ण टीमला समर्पित करू इच्छितो,” असेही महंमद सायेघ यांनी म्हटले.
Comments
Post a Comment