लज्जत महाराष्ट्राची २७ जून पासून कलर्स मराठीवर !
उघडून रेसिपींचा कप्पा, मारू खुसखुशीत गप्पा - लज्जत महाराष्ट्राची २७ जून पासून कलर्स मराठीवर !
दररोज दुपारी २.३० वा.
मुंबई २३ जून, २०२२ : उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ! असे म्हणतात ते बरोबरच आहे… कारण यज्ञामध्ये जशा समिधा स्वाहा करतात त्याचप्रमाणे या उदररुपी यज्ञात अतिशय रुचकर पदार्थांच्या समिधा आपण अर्पण करत असतो. अतिशय स्वादिष्ट, पौष्टिक, रुचकर, खमंग असे पदार्थ बनविण्यासाठी प्रत्येक गृहलक्ष्मी खुप कष्ट घेत असते. मग जेव्हा सर्व कुटूंब एकत्र येऊन गप्पाचा फड रंगवत तिच्या हातच्या पदार्थांची स्वाद चाखत असते तेव्ह ते बनवणाऱ्या हाताना समाधान लाभते. आपल्या पुरातन संस्कृती प्रिय देशात, खाणे, शिजवणे आणि खाऊ घालणे हा कुळाचार म्हणुया. कारण असं बोलल जातं, काही मैलांनंतर भाषा बदलते, पण प्रत्येक घरातील स्वयंपाक घरात चव देखील बदलते असं बोललं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ते म्हणतात ना अतिथी देवो भव. जितके प्रांत,तितके प्रकार. मुळातच मराठी माणसाला चाविच खाणं लागत आणि तश्या विविध रेसिपी आहेत. खवय्ये असे आहेत की स्वादिष्ट पदार्थ खायला त्या त्या ठिकाणी पोहचतात. पण,आता मात्र आपल्याला कुठेही जायची गरज नाही... कारण विविध प्रातांतील रुचकर रेसिपी आपण घरबसल्या शिकू शकणार आहे. आता महाराष्ट्रातील घराघरात बनतील मेजवानीचे बेत कारण कलर्स मराठी घेऊन येत आहे “लज्जत महाराष्ट्राची” नवाकोरा कार्यक्रम २७ जूनपासून सोम ते शनि दु. २.३० ते ३.३०. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरुण इनामदार करणार आहेत. खास रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत एक चविष्ट, खुमासदार शो... जिथे पाककलेसोबत आपल्या आवडत्या कलाकारांसोबत रंगणार खमंग गप्पा आणि बघायला मिळणार रेसेपिजाचा खुमासदार खेळ. तेव्हा नक्की बघा “लज्जत महाराष्ट्राची” फक्त आपल्या लाडक्या वाहिनीवर कलर्स मराठीवर.
जेवण एक प्रमुख कुळाचार आहे. रोजचे जेवण आहेच. पण विविध सण, कार्यक्रम आणि मेनू हे समीकरण असतं. साधा सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद म्हणजे अनोखी चव. गणपती बाप्पा चे मोदक असो,की कुळाचार नैवेद्य असो. मुलांसाठी फास्ट रेसिपी असो, की पथ्य पाण्याचे पदार्थ. जेवण आणि पाककौशल्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पारंपारिक पदार्थ तर आहेतच. पण इन्स्टंट रेसिपी हा हल्ली प्रचलित प्रकार आहे. पण अश्या रेसिपी आजीला ज्ञात होतीच. फक्त कालानुरूप ती विस्मृतीत गेली.ह्या शो द्वारे अश्या पुरातन, इन्स्टंट आणि पौष्टिक खाद्य पदार्थ गृहिणींना कळतील. कार्यक्रमामध्ये कलर्स मराठीवरील आवडते कलाकार म्हणजेच भाग्य दिले तू मला मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, लेक माझी दुर्गा मालिकेतील हेमांगी कवि तसेच २ जुलैपासून सुरू होणार्या आपल्या लाडक्या सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाची सूत्रसंचालक स्पृहा जोशीने देखील हजेरी लावली.आता हे कलाकार कुठकुठले पदार्थ बनवणार हे जाणून घ्या २७ जूनपासून “लज्जत महाराष्ट्राची” या कार्यक्रमामध्ये.
कार्यक्रमाबद्दल बोलताना वरुण इनामदार म्हणाले, “मला फिरण्याचं आणि खाण्याचं प्रचंड वेड आहे. जगाच्या कान्याकोपऱ्यात फिरून आल्यानंतर जेव्हा मी महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीकडे पाहतो, तेव्हा मला असं कळतं की यात तर सगळंच सामावलेलंआहे.वेगवेगळ्या लोकांनी, पदार्थांनी,आणि चवींनी सजलेला असा आपला महाराष्ट्र. जर आपल्या पाककलेच्या खजिन्यात डोकावून पाहिलं, तर जगातला प्रत्येक पदार्थ इथूनच तिकडे गेलाय असं वाटेल, इतक्या रेसिपीज इकडे आहेत. म्हणून हे चवदार चमचमीत पदार्थ तुमच्या पानात वाढण्यासाठी मी घेऊन आलोय हा चविष्ट टेस्टी असा शो लज्जत महाराष्ट्राची. आपल्या कलर्स मराठीवर.”
तेव्हा नक्की बघा “लज्जत महाराष्ट्राची” २७ जूनपासून सोम ते शनि दु. २.३० वा. फक्त आपल्या लाडक्या वाहिनीवर कलर्स मराठीवर
Comments
Post a Comment