पहिल्यांदाच एक महत्वपूर्ण भूमिका मिळाली : अभिषेक गावकर.

कोकणातलं कथानक असल्यामुळे खूपच आनंद झाला : अभिषेक गावकर

१. 'सारं काही तिच्यासाठी' ह्या मालिकेबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील ? 

- मी आधी बऱ्याच मालिकां मध्ये काम केलं आहे . 'सारं काही तिच्यासाठी' ह्या मालिकेत मला एक महत्वाची भूमिका साकारायला मिळतेय. ह्या मालिकेत एक कुटुंब दाखवलं आहे आणि त्या कुटुंबाचा मी पण एक महत्वाचा भाग आहे. मला असं वाटतं की ह्या मालिकेत जे कुटुंब दाखवले आहे प्रेक्षकांना ते आपलंच कुटुंब वाटत असेल, कारण या खोत कुटुंबात खूप साधेपणा आहे. या मालिकेत प्रत्येक पात्राच्या काही भूमिका आणि तत्व आहेत जी प्रत्येक कुटुंबात असतातच. हीच गोष्ट मला जास्त आवडली. माझ्या भूमिकेचं नाव आहे 'श्रीनिवास सावंत' आणि मला प्रेमाने सगळे ‘श्रीनू’ म्हणतात. दादा मामा म्हणजेच रघुनाथ राव (अशोक शिंदे) हे श्रीनूसाठी आदर्श आहेत कारण त्याला त्यांचा खूप आदर आहे. रघुनाथ रावांचे तत्व व विचार श्रीनूला आपलेसे वाटतात आणि तो तसाच वागतो. दादामामा आणि श्रीनू मध्ये फरक एवढाच आहे की, श्रीनू खुप बोलका आहे आणि घरात प्रत्येकाची बाजू काय आहे हे श्रीनिवासला माहिती आहे. ह्या भूमिकेसाठी मी तयारी पण खूप छान केली होती. ही पहिली मालिका अशी आहे ज्यात माझा लव्ह अँगल पण दाखवला आहे, ह्या आधीच्या मालिकांमध्ये बरेच नेगेटिव्ह आणि व्हिलन शेड्स होत्या. 

२. हे प्रोजेक्ट करायची संधी केव्हा मिळाली व तुझी ह्या कथेवर काय प्रतिक्रिया होती ?

- मला प्रोडक्शन कडून कॉल आला ऑडिशनसाठी जे स्क्रिप्ट होत ते मालवणीत होत ते बघून मला खूप आनंद झाला कारण मी कणकवलीचा असल्यामुळे माझ्यासाठी तो प्लस पॉईंट होता. पण सगळ्याच लोकांना मालवणी भाषा कळेलच असं नाही म्हणून ह्या मालिकेत काही लोकांचे डायलॉग मालवणीत केले आहेत आणि काही मराठीत. 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका कोकणातली कथा असून माझ्या मनात हा प्रोजेक्ट करायची खूप इच्छा होती व ती पूर्ण झाली.  मी वाट बघत होतो केव्हा चित्रीकरण सुरू होईल कारण कमाल कथानक, उत्तम संवाद तसेच सहकलाकार ह्या सर्व गोष्टीं मूळे आमचा हा प्रवास खूप छान सुरू आहे.  

३. तुझा सहकलाकारां सोबतचा अनुभव ? 

- आम्हाला एकत्र आता काम करून आता १- २ महिने झालेत, सगळ्यांसोबत एक छान नातं जुळलं आहे. मी, ओवी, निशी आणि डुग्गू आम्ही यंग ब्रिगेड सेट वर खूप मजा मस्ती करतो. अशोकजींची भूमिका खूप शांत आहे पण ऑफ स्क्रीन ते खूप बोलके आहेत ते सगळ्यांना बांधून ठेवतात आणि प्रेरणा देतात.

४. तुझा आता पर्यन्तचा प्रवास ? 

- मी महर्षी दयानंद कॉलेज मध्ये ग्रॅजुएशन केलं आहे. कॉलेजमध्ये असताना अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला, मी स्टोरी रायटिंग पण केलं आहे आणि ह्याच मुळे मी काही मालिकांच्या लेखकांना असिस्ट पण केलं आहे. मी बऱ्याच नाटकात काम केलं असून आतापर्यन्त पाच सिरीयल केल्या आहेत. आता पर्यंतचा प्रवास खूप सुरस राहिला आहे आणि ह्या पुढे ही अगदी खात्रीने मी सर्वतोपरी मी उत्तम काम करेन. 

तेव्हा पाहायला विसरू नका 'सारं काही तिच्यासाठी' संध्या ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..