पिट्याभाई झाले नगरसेवक

 पिट्याभाई झाले नगरसेवक

आपल्या दमदार अभिनयाने कायम चर्चेत राहणारे अभिनेते रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई लवकरच नगरसेवक म्हणून कार्यरत होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. अभिनय सोडून  पिट्याभाई  राजकारणात का सक्रिय होतायेतहा  प्रश्न तुम्हाला  ही पडला असलेच? तर  हे 'नगरसेवकपद  त्यांनी आपल्या आगामी  सिंगल या चित्रपटासाठी  स्वीकारलं आहे.  या चित्रपटात ‘नगरसेवक राजाभाऊ  सूर्यवंशी’  ही  भूमिका ते साकारणार आहेत. विशेष म्हणजे  सिंगल चित्रपटात पुण्यातील  विविध राजकीय पक्षांचे विद्यमान नगरसेवक वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. २७ ऑक्टोबरला सिंगल सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

सिंगलच्या निमित्ताने मी प्रथमच पडद्यावर एका राजकारणी व्यक्तिमत्वाची भूमिका साकारतोय. राजकारण व समाजकारणाच्या तराजूत जनतेचे हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. राजाभाऊ सूर्यवंशी या भूमिकेने मला ही वेगळी संधी दिली असून माझी ही भूमिका नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेलअसा विश्वास पिट्याभाई व्यक्त करतात.  

दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी सिंगल चित्रपटाचे दिगदर्शन केले आहे. किरण काशिनाथ कुमावतहर्षवर्धन गायकवाडशरद पाटीलअमोल कागणेगौरी सागर पाठकसिंगल हे या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडासागर पाठक आणि सतीश समुद्रे  यांची आहे. अभिजीत कवठाळकरमोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..