‘आली आली गं भागाबाई’ गाणं आलं भेटीला

आली आली गं भागाबाई’ गाणं आलं भेटीला

एखाद्या गीताची जादू अथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख  निर्माण करून देत असते. अनेक  चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले  जात  असल्याचे आपण बघतो. असंच  एक जोरदार  गीत आगामी एकदा येऊन तर बघा’ या धमाल  चित्रपटातून आपल्या  भेटीला आलं  आहे.  

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित एकदा येऊन तर बघा या चित्रपटात आली आली गं भागाबाई’ हे पारंपरिक गीत नव्या ढंगात सादर केलं आहेनुकतंच हे गीत प्रदर्शित झालं असून या गीताला प्रेक्षक पसंतीची पावती मिळाली आहे.  हे गीत रोहन प्रधान यांनी गायलं आहे.  मंदार चोळकर यांच्या गीतलेखनाला रोहन-रोहन यांचं संगीत लाभलं आहे.  या गीतातून  चित्रपटातील सर्व कलाकारांचा ढिंच्याक अंदाज पहायला मिळतोय. या गीताची आणि चित्रपटाच्या कथेची गंमत चित्रपट पाहिल्यानंतरच उलगडेल. चित्रपटाच्या गीताचे हक्क सारेगम कडे आहेत. 

२४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटरराजेशकुमार मोहंती,दिपक क्रिशन चौधरीसेजल दिपक पेंटर यांचीअसून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभनसत्यनारायण मूरथीडॉ.झारा खादर यांची आहे.गिरीश कुलकर्णी,सयाजी शिंदेभाऊ कदमविशाखा सुभेदार,  तेजस्विनी पंडितपॅडी कांबळेओंकार भोजने,प्रसाद खांडेकर,  राजेंद्र शिसातकर,  नम्रता संभेराववनिता खरातशशिकांत केरकररोहित माने,सुशील इनामदार आदि चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..