चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय

चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय

'सिंधूताई माझी माई - चिंधी बनली सिंधू' ! 

१५ आँक्टोबरपासून संध्या.७ वा.आपल्या कलर्स मराठीवर 

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३: कलर्स मराठीवरील 'सिंधुताई माझी माई’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. ‘सिंधूताई माझी माई - चिंधी बनली सिंधू’ नवीन अध्यायामध्ये सिंधुताईंच्या हृदयस्पर्शी आणि असामान्य अश्या जीवन प्रवासाचा उलगडा होणार आहे. सिंधुताई म्हणजे एक विलक्षण चैतन्य असलेली असामान्य स्त्री.  आपण आजपर्यंत चिंधीचे जीवन, तिची धडपड आणि गरजूंना मदत करण्याची तिची अटळ बांधिलकी पाहिली. आता मात्र चिंधीने सिंधू बनण्याचा विलक्षण प्रवास सुरु होणार आहे. सिंधूच्या जीवनातील अनेक आव्हाने, कठीण प्रसंग, हलाखीची परिस्तिथी आणि यामधून मार्ग काढत त्यांनी सिंधू बनण्याचा प्रवास कसा पार केला हे सगळं आत्मा हेलावून ठेवणारं आणि मन सुन्न करुन जाणार आहे. त्यांचा हा खडतर प्रवास आणि त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला हे सारं बघणं प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं आणि प्रेरणा देणारं ठरणार आहे. 'सिंधुताई माझी माई' मालिकेच्या उत्तम कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. आणि याच उद्दिष्टाला पुढे नेत आणखी भावनिक दृष्ट्या कथानक सादर करण्याचा प्रयत्न मालिकेचा असणार आहे. तेव्हा नक्की बघा सिंधुताई माझी माई - १५ ऑक्टोबरपासून संध्या. ७ वा आपल्या कलर्स मराठी वर.

मालिकेत सिंधूची भूमिका साकारणारी शिवानी सोनार म्हणाली, "या भूमिकेसाठी मी माईंनी लिहीलेलं पुस्तक वाचलं. माईंना भेटणं माझ्या नशिबात नव्हतं  पण जी माणसं त्यांना भेटली आणि माझ्या मित्रमंडळीपैकी ज्यांना भेटण्याचा योग आला त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकत मी या भूमिकेसाठी तयारी केली होती आणि अजूनही करत आहे. शूट सुरु झाल्यानंतर, मी शहरात वाढलेली मुलगी आहे तर गावाकडची कामं, गावाकडे राहणं याची कुठे तरी तयारी नव्हती पण आता मी ह्या वातावरणाला जुळवून घेण्याचा प्रयत्न करते आहे. ह्या भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे त्याचबरोबर एक मोठी जबाबदारी असल्यामुळे कुठे तरी थोडा नर्व्हसनेस आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी १०० टक्के केला आहे. माझ्या आधीच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं त्याचप्रमाणे या भूमिकेसाठी ही देतील याची मला खात्री आहे. माईंची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न मी आणि आमची संपूर्ण टीम करत आहोत. मालिकेचे दिग्दर्शक, कलाकार या सर्वांचा मला पाठिंबा आहे. लवकरच सिंधू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि प्रेक्षकांना आवडेल अशी मी आशा करते."

करुणा आणि आशेने भरलेल्या सिंधूताईंच्या उल्लेखनीय कथेची ही मोहक निरंतरता नक्की बघा ‘सिंधुताई माझी माई - चिंधी बनली सिंधू’ १५ ऑक्टोबरपासून संध्या. ७ वा आपल्या कलर्स मराठी वर.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..