अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदमुंबई आयोजित शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

नाट्य परिषदेच्या शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेत नाशिक’ शाखेची अ डील’ एकांकिका प्रथम

मुंबई- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखातंर्गत एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. नाशिक शाखेची 'अ डिलएकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. अमरावती शाखेच्या 'मधूमोहया एकांकिकेस निर्मितीचे उत्कृष्ट तर इचलकरंजी शाखेच्या 'हा वास कुठून येतोया एकांकिकेस उत्तम तर अहमदनगर शाखेच्या 'जाहला सोहळा अनुपमया एकांकिकेस उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

 

पारितोषिक वितरण नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त श्री. शशी प्रभूविश्वस्त श्री. अशोक हांडेनाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामलेअभिनेत्री व नियामक मंडळ सदस्य निलम शिर्के-सामंतसेन्सॉर बोर्ड अध्यक्ष श्री. विजय गोखलेअभिनेत्री सविता मालपेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अनेक कलावंत व नाट्य परिषदेचे नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते.

 

स्पर्धेत लेखन व दिग्दर्शनाचे सर्वोत्कृष्ट पारितोषिक नाशिक शाखेचे आनंद जाधव यांना उत्कृष्ट दिग्दर्शन दीपक नांदगावकरअमरावती शाखा यांना तर उत्तम दिग्दर्शक पारितोषिक इचलकरंजी शाखेचे अनिरूद्ध दांडेकर यांना मिळाले.  सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक विश्वंभर पईरवाल व पूजा पुरकरनाशिक यांना तर उत्कृष्ट अभिनयासाठी हर्षद ससाणे व वैष्णवी राजभूरेअमरावती यांना तर उत्तम अभिनयासाठी प्रतीक हुंदारे व मानसी कुलकर्णीइचलकरंजी यांना पारितोषिक देण्यात आले. तर अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र सौरभ कुलकर्णी अहमदनगरअशोक किल्लेदार सोलापूरॲड. दीपक शर्मा अहमदनगरअभिषेक लोले इचलकरंजीविजयालक्ष्मी कोकणे सोलापूरअपर्णा जोशीसोलापूर यांना देण्यात आले.

 

नेपथ्यसाठी सर्वोत्कृष्ट निखिल शिंदे इचलकरंजीउत्कृष्ट नेपथ्य रोहित जाधव नाशिकउत्तम नेपथ्य अमोल खोलेअहमदनगर यांना तर प्रकाशयोजनेसाठी उत्तम पारितोषिक अनिरुद्ध दांडेकर इचलकरंजीउत्कृष्ट पारितोषिक ॲड.चंद्रशेखर डोरलेअमरावती तर सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना पारितोषिक कृतार्थ कंसारानाशिक यांना देण्यात आले. पार्श्वसंगीत उत्तम पारितोषिक प्रवीण लायकर इचलकरंजीउत्कृष्ट पारितोषिक मिलिंद कहाळे अमरावती तर पार्श्वसंगीत सर्वोत्कृष्ट पारितोषिक ओम देशमुखनाशिक यांना देण्यात आले. याप्रसंगी नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे म्हणालेमहाराष्ट्रातील हौशीप्रायोगिक रंगभूमीवर काम करणारे कलावंत खूप मेहनतीने काम करतात. मुंबई येथील व्यावसायिक रंगभूमीवर काम करताना कलावंतांच्या निवासाची व्यवस्था मुंबईत होत नाही. याकरिता परिषदेच्या माध्यमातून निवास व्यवस्थेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

 

नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी सांगितले कीनाट्य परिषदेच्या शाखा सक्षम करण्यासाठी नवनवीन योजना राबविण्यात येणार आहेत. एकांकिका हे माध्यम व्यावसायिक नाट्यक्षेत्रात पदार्पण करण्याचे उत्तम माध्यम आहे. नाट्यकलानाट्यशास्त्र शिकविणे कामी नाट्य परिषद नाट्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांनी शाखातंर्गत एकांकिका स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवायचे असेल तर बालनाट्यएकांकिका व कला क्षेत्रातील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. या स्पर्धेत २५ शाखांनी भाग घेतला होता. यास्पर्धेचे परिक्षण श्री. प्रदीप मुळ्ये डॉ. अनील बांदिवडेकरश्री. देवेंद्र पेमशीतल तळपदेशीतल करदेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कोषाध्यक्ष श्री. सतीश लोटके यांनी केले तर आभार स्पर्धा प्रमुख शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..