फेरेरो इंडिया तर्फे प्रथमच किंडर शोको-बॉन्स क्रिस्पी: या बाँडिंग चा आनंद वाढवणार्‍या चविष्ट ट्रीटची सुरुवात

फेरेरो इंडिया तर्फे प्रथमच किंडर शोको-बॉन्स क्रिस्पी: या बाँडिंग चा आनंद वाढवणार्‍या चविष्ट ट्रीटची सुरुवात

भारतातील वैविध्य जपण्याच्या उद्देशाने किंडर तर्फे तीन ब्रॅन्ड एन्डॉसर्स बरोबर भागीदारी: भारतील नटी करिश्मा कपूर, सुभश्री गांगुली आणि इन्फ्लुएन्सर स्नेहा रेड्डी याचा समावेश

भारत, १० ऑक्टोबर २०२३-  फेरेरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फेरेरो ग्रुप हा जगभरांतील आघाडीचा चॉकलेट आणि कन्फेक्शनरी उत्पादनांचे उत्पादन करणारा ग्रुप असून कंपनी कडून ‘ किंडर शोको बॉन्स क्रिस्पी’ ची सुरुवात करत असल्याची घोषणा करण्यात आली.   या नवीन उत्पादना मुळे फेरेरो इंडिया ने आता स्वीट पॅकेज्ड फूड्स कॅटेगरी मध्ये प्रवेश केला आहे.  या नाविन्यपूर्ण उत्पादनाची सुरुवात त्यांच्या किंडर ब्रॅन्ड अंतर्गत किंडर शोको बॉन्स क्रिस्पी या चविष्ट चॉकलेट ट्रिट चे डिझाईन हे आनंद आणि शेअरिंग ला द्विगुणित करण्याच्या दृष्टीने करण्यात आले आहे.

किंडर शोको-बॉन्स क्रिस्पी मध्ये दुधाने युक्त आणि कोको क्रीम हे क्रिस्पी वेफर मध्ये बुडवलेले आणि कोको स्प्रिंकल्स चे अनोखे मिश्रण आहे यामुळे आपल्याला  विविध प्रकारच्या चवींचा अनुभव मिळून लोकांच्या विविध चवींची आणि टेक्स्चरची आवड पूर्ण होते.

 किंडर शोको-बॉन्स क्रिस्पी ही एक छोटी गोळी असून प्रथमच ही मिठाई ‘शेअरेबल पॅक्स’ मध्ये सुरु करण्यात आली असून पॅक ची किंमत रु ४० पासून पुढे या किंमतीत सुरु होते, आणि आता ती ४ आणि १२ नगांच्या पॅक मध्ये उपलब्ध होणार आहे.   

किंडर शोको बॉन्स क्रिस्पीच्या माध्यमातून कंपनी आता भारतीय बाजारपेठेत आणखी एक पाऊल पुढे टाकू इच्छित असून याकरता किंडरच्या उत्पादनांवरील ग्राहकांचे प्रेम वृध्दिंगत करण्यावर भर देत आहे.  या उत्पादन शृंखलेतील वाढ फेरेरोच्या भारतातील वेगाने वाढणार्‍या स्नॅकिंग विभागात प्रवेश केला आहे.  वाढत्या संधीचा लाभ घेत ब्रॅन्ड ने पालकांसाठी आता लहान मुलांशी जोडण्याचा अनोखा उपाय देण्यावर भर दिला आहे. 

ग्राहकांना नाविन्यपूर्ण उत्पादने देण्याची परंपरा सुरु ठेवत किंडर शोको बॉन्स क्रिस्पी चे उत्पादन हे महाराष्ट्रातील बारामती येथील उत्पादन केंद्रात होणार असून यांतील ९८ टक्क्यांहून अधिक घटक हे स्थानिक स्तरावरुन घेतलेले आहेत.  केंद्रातील अद्ययावत असे हे आरॲन्डडी केंद्र आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असून प्रत्येक घटकाची गुणवत्ता चाचणी जसे घटकांचे मिश्रण, कच्च्या मालाची खरेदी, पॅकेजिंग आणि उत्पादनाची चाचणी ही केली जाते.  उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांमधील पोषक गुणधर्म टिकून रहावेत यासाठी फेरेरो कडून एकंदरीत गुणवत्ता आणि तपासणीतील सर्वोत्कृष्ट मानकांचा अवलंब केला जातो.

या प्रसंगी बोलतांना फेरेरो इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक रुडॉल्फ सिक्वेरा यांनी सांगितले “ फेरेरो साठी जगभरांतील बाजारपेठांपैकी भारतातील बाजारपेठ ही एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे आणि ही वाढ म्हणजेफेरेरो च्या ट्रॉपिकल पोर्टफोलिओ च्या बांधणीवरील लक्ष्याला अधोरेखित करत आहे.  किंडरची उत्पादनश्रेणी वाढवतांना आम्ही खूपच उत्साही आहोत आणि किंडर शाको बॉन्स क्रिस्पी हे नाविन्यपूर्ण उत्पादन आता खरोखरच संपूर्णत: मेड इन इंडिया आहे.” 

किंडर ब्रॅन्ड्सच्या भारतीय उपखंडाच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख एमेडियोॲरागोना यांनी सांगितले “ आनंद, काळजी, आधुनिकता आणि समतोल अशा गुणांना मूर्तरुप देणारा ब्रॅन्ड म्हणून किंडर ने नेहमी परिवारांच्या समृध्द अनुभवाच्या निर्मितीत आघाडी मिळवली आहे.  किंडर शेको बॉन्स क्रिस्पी आता या परंपरेत आणखी भर घालत असून  पालक आणि मुलांमधील पारिवारीक बंध समृध्द करण्यावर आम्ही भर देत आहोत.”

ब्रॅन्डचा प्रसार संपूर्ण भारतात व्हावा यासाठी प्रथमच किंडर शोको बॉन्स क्रिस्पी ने प्रतिथयश सेलिब्रिटीज/मदर इन्फ्लुएन्सर्स असलेल्या भारतीय कलाकार करिश्मा कपूर, सुभश्री गांगुली आणि दक्षिण भारतातील प्रसिध्द इन्फ्लुएन्सर स्नेहा रेड्डी बरोबर भागीदारी केली आहे.  

किंडर शोको बॉन्स क्रिस्पी चा प्रसार हा अतिशय सक्षम अशा ३६० अंशातील मार्केटिंग संभाषण मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. टिव्ही सह डिजिटल अस्तित्व सक्षम करण्यासाठी ब्रॅन्ड कडून मास मिडिया ॲप्रोचही अवलंबला जाणार आहे.

हे उत्पादन संपूर्ण भारतातील आऊटलेट्स मध्ये उपलब्ध असून  आधुनिक ट्रेड आणि परंपरागत स्टोअर्स मध्ये ही उपलब्ध असणार आहे.  या सह मॉडर्न ट्रेड आणि ईकॉमर्स चॅनल्स वरही टेस्ट इमप्रिंटिंग मोहिमा ही सुरु करण्यात येणार आहे.  ग्राहक आता हे उत्पादन ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, ब्लिंकइट, बिग बास्केट इत्यादी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स वरुनही खरेदी करु शकतील. 

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..