गोदरेज इंटेरियोच्या ‘होमस्केप्स’ अहवाल..

गोदरेज इंटेरियोच्या होमस्केप्स अहवालात उलगडला करियरमधल्या संधी स्वीकारत सक्षम झालेल्या स्त्रीचा प्रवास

या अभ्यास अहवालाची महिला दिन विशेष आवृत्ती सादर६९ टक्के स्त्रियांच्या मते पाहुण्यांशी गप्पा मारताना करियरमधल्या कामगिरीबद्दल बोलण्यातून त्यांना मिळतो सर्वात जास्त अभिमान

मुंबई६ मार्च २०२४ – वेगाने बदलत असलेल्या आधुनिक भारतात प्रत्येक नागरिक कशाप्रकारे घरात आपले अस्तित्व तयार करतो याची उत्सुकतापूर्ण माहिती गोदरेज इंटेरियोच्या होमस्केप्स या अभ्यास अहवालात मांडण्यात आली आहे. गोदरेज इंटेरियो  गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसचा व्यवसाय आहे. या अहवालासाठी करण्यात आलेल्या संशोधनात कशाप्रकारे गृह सजावटीतून झळकणारे व्यक्तिमत्त्व आणि मूल्यांतून घर व वैयक्तिक विकासाचा सखोल संबंध असतो याचे पैलू उलगडण्यात आले आहेत.

इतक्या वर्षांत भारतातील स्त्रियांच्या भूमिकेत उल्लेखनीय बदल झाले असून तिचे रूपांतर पारंपरिक गृहिणीपासून सक्षम घर चालवणारीमध्ये झाले असल्याचे अनारॉकने नुकत्याच केलेल्या या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालनुसार त्यात सहभागी झालेल्यामालमत्तेची खरेदी करणाऱ्या ४७ टक्के स्त्रिया २५- ३५ वर्ष वयोगटातील आहे. महिला दिनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या गोदरेज इंटेरियोने तयार केलेल्या या होमस्केप्स स्त्रियांच्या मानसिकतेमधले बदल टिपण्यात आले आहेत. त्यांच्या आयुष्यात वैयक्तिक स्पेसला असलेले महत्त्व आणि त्याचा त्यांचा विकासकरियरमधील वाढत्या आकांक्षा व सक्षमता असलेला संबंध या अहवालात मांडण्यात आला आहे. या अहवालानुसार ४२ टक्के स्त्रियांनी घरी वर्कस्टेशन तयार केले असून हे प्रमाण असे वर्कस्टेशन करणाऱ्या ३६ टक्के पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. त्याशिवाय ६९ टक्के स्त्रियांनी त्यांच्या करियरमधली प्रगती हा पाहुण्यांशी गप्पा मारताना अभिमानास्पद विषय असल्याचे सांगितले. पुरुषांमध्ये हे प्रमाण त्यापेक्षा कमी म्हणजेच ६४ टक्के आहे. यावरून करियरच्या वाढत्या आकांक्षा आणि देशातील स्त्रियांची वाढती सक्षमता दिसून येते.

या ट्रेंडविषयी गोदरेज इंटेरियोचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख स्वप्नील नगरकर म्हणाले, होमस्केप्स अहवालात व्यक्तीतिचे कुटुंब व तिचे घर यांच्यातील सखोल नाते उलगडण्यात आले आहे. हा अहवाल स्त्रियांच्या आयुष्याचात्यांच्या अस्तित्वाचा मोठा भाग असलेल्या घराविषयीच्या त्यांच्या भावना दर्शवणारा आहे. या सर्वेक्षणातील माहितीनुसार सामाजिक- आर्थिक प्रगतीमुळे स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवण्याचीआपल्या एकटीच्या खांद्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी टाकणाऱ्या सामाजिक परंपरेला आव्हान देण्याची आणि घरातील सक्षम निर्णयकर्ती म्हणून स्वतःचे स्थान तयार करण्याची क्षमता मिळाली आहे. गोदरेज इंटेरियोला आधुनिक भारतीय स्त्रीच्या जीवनशैलीला साजेसे फर्निचर तयार करण्याचा अभिमान वाटतो. आमचे फर्निचर आजच्या स्त्रीचे घर व जीवनशैलीमध्ये सहज सामावणारे, स्टाइल व व्यवहार्यतेचे प्रतीक आहे.

त्याशिवाय या अभ्यास अहवालात असेही नमूद करण्यात आले आहेकी पारंपरिक पद्धतीनुसार भारतीय स्त्रीवर असलेल्या घरगुती जबाबदाऱ्यांमध्येही आमूलाग्र बदल झाले आहेत. तिची निर्णयक्षमता व आर्थिक स्वातंत्र्य विकसित झाले आहे. या सर्वेक्षणासाठी मिळवण्यात आलेल्या माहितीनुसार ५९ टक्के स्त्रियांना आधुनिक स्वयंपाकघराची रचना सर्वांना एकत्रितपणे स्वयंपाक करण्याची व जेवण्याची प्रेरणा देणारी असल्याचे सांगितले. पूर्वीचे पारंपरिकएका बाजूला असणारेस्त्रीची जबाबदारी मानले जाणारे स्वयंपाकघर आता पूर्णपणे बदलले आहे. जास्तीत जास्त स्त्रिया शिक्षण घेऊन नोकरी करत असल्यामुळे त्या घरातील उत्पन्नात मोठा वाटा उचलत आहेत. त्यामुळे कुटुंबाची समीकरणे बदलली आहेत. उदा. होमस्केप्स संशोधनानुसार पूर्वी जेवणाच्या टेबलावर दिसून येणारी उतरती रचना आता दिसून येत नाही. आता कुटुंबातील कोणताही सदस्य कुठेही बसू शकतो.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight