केप्री ग्लोबल कॅपिटलने गुजरात टायटन्ससोबत असलेली भागीदारी..
केप्री ग्लोबल कॅपिटलने गुजरात टायटन्ससोबत असलेली भागीदारी 2024च्या हंगामासाठी वाढवली
मुंबई, 27 मार्च, 2024: केप्री ग्लोबल कॅपिटल लि. या आघाडीच्या नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपनीने आज गुजरात टायटन्ससोबत असलेली भागीदारी 2024 च्या हंगामासाठी वाढवत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या सहयोगाचे हे सलग तिसरे वर्ष आहे.
या सहयोगाचा भाग म्हणून केप्रीचा लोगो गुजरात टायटन्सच्या अधिकृत टीम जर्सीच्या उजव्या छातीच्या बाजूला ठळकपणे दिसेल. यातून या दोहोंमधील घट्ट नाते दिसून येते.
केप्री ग्लोबलचे ग्रुप सीएमओ बसंत धवन म्हणाले, "खेळांमध्ये समुदायांना एकत्र आणण्याची परिवर्तनकारी शक्ती आहे, याची आम्हाला जाणीव आहे. ही लीग भारतातील 50 कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली असून मीडिया प्लॅटफॉर्म्सचा विचार करता ही सर्वात वेगाने पोहोचलेली लीग आहे. यामुळे आम्हाला विविध उत्पन्न गट आणि भागांमधील ऑडियन्ससोबत ब्रँड जोडण्यासाठी मदत होते. गुजरात टायटन्ससोबतच्या सहयोगाचे हे तिसरे वर्ष आहे आणि या सहयोगातून आमच्या सध्याच्या आणि संभाव्य ग्राहकांशी ब्रँडची जवळीक वाढेल आणि अर्थपूर्ण संवाद साधता येईल, अशी आम्हाला खात्री आहे.
गुजरात टायटन्सचे सीओओ कर्नल अरविंद सिंग म्हणाले, "नव्या आयपीएल हंगामासाठी केप्री ग्लोबलसोबत भागीदारी कायम पुढे सुरू ठेवण्याचा आम्हाला आनंद आहे. केप्री ग्लोबलने त्यांचे आयपीएलमधील पदार्पण गुजरात टायटन्ससोबत केले आणि आमच्या विजयांमुळे ब्रँडच्या मूल्यात घातली गेलेली भर या सहयोगाच्या विस्तारीकरणातून दिसून येते. केप्री ग्लोबलसोबत दीर्घकालीन परस्परलाभदायी सहयोगाची आम्हाला अपेक्षा आहे.”
गुजरात टायटन्स ही गुजरातमधील अहमदाबाद येथील प्रोफेशनल फ्रान्चायझी क्रिकेट टीम आहे. शुभमन गिल या संघाचा कर्णधार आहे तर आशीष नेहरा प्रशिक्षक आहेत. 2023 मध्ये गुजरात टायटनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर 1 बिलियनहून अधिक व्ह्यूज साध्य केले आणि हा संघ 553 मिलियन लोकांपर्यंत पोहोचला. मागील हंगामाच्या तुलनेत सामान्यांच्या दर्शकसंख्येमध्ये (व्युव्हरशिप) 20% वाढ झाली आहे.
Comments
Post a Comment