स्पृहा जोशी, सागर देशमुख यांची जोडी गाजवणार छोटा पडदा

'सुख कळले' लवकरच कलर्स मराठीवर 

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना  घेऊन अवतरत आहेत. 'इंद्रायणी'नंतर आता लवकरच “सुख कळले” ही आणखी एक  नवीन मालिका कलर्स मराठी घेऊन येत आहे. नुकताच या मालिकेचा टीजर  प्रदर्शित झाला असून “ सुख कळले”च्या पहिल्याच टीजरने प्रेक्षक खूप सुखावले आहेत. याचे कारण रसिकांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी पुन्हा कलर्स मराठीवर झळकणार आहे. तसंच स्पृहा बरोबर गुणी आणि चोखंदळ अभिनेता सागर देशमुख असणार आहे. 

सध्या तरी ही मालिका कधी सुरु होणार, हे गुलदस्त्यात असले तरी या पहिल्याच सुंदर टीजरने रसिकांना सुखद धक्का दिला असून प्रेक्षकांच्या  भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.  स्पृहा जोशी आणि सागर देशमुख हे दोन्ही तगडे कलाकार प्रथमच एकत्र येत असून ही दमदार जोडी लोकांच्या पसंतीस उतरते आहे. “सुख कळले” ही एक वास्तवदर्शी मालिका असून स्पृहा- सागर आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवायला पुन्हा  एकदा सज्ज झाले आहेत. 

प्रोमोमधील तरल भावस्पर्शी क्षण या दोघांमधील नाते अधोरेखित करत आहे. त्यामुळे ही एक मध्यमवर्गीय कुटुंबाची हृदयस्पर्शी कहाणी असून जी प्रेक्षकांना तुफान भावते आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..