'मायलेक'ची पहिली झलक भेटीला

'मायलेक'ची पहिली झलक भेटीला

आई मुलीचे नाते हे सर्वात जवळचे, खास असते. कधी त्या घनिष्ट मैत्रिणी असतात, तर कधीकधी त्यांच्यात रुसवे फुगवेही असतात. त्यातही मजा असते. याच गोड नात्याची गोष्ट सांगणारा 'मायलेक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या टिझरची पहिली झलक प्रदर्शित झाली आहे. सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्यातील सुदृढ नाते या टीझरमध्ये दिसत आहे. यात आईला जितके मुलीचे कौतुक आहे, तितकेच कौतुक, विश्वास मुलीलाही तिच्या आईबद्दल आहे. या चित्रपट उमेश कामतही प्रमुख भूमिकेत आहे. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत, प्रियांका तन्वर दिग्दर्शित 'मायलेक' चित्रपट येत्या १९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून सोनाली खरे या चित्रपटाची निर्माती आहे. तर कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत.   

दिग्दर्शिका प्रियांका तन्वर म्हणतात, '' आई आणि मुलीचे नाते अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. यात धमाल, मजामस्ती, हसू आणि आसू, दुरावा अशा एखाद्या नात्यातील सगळ्या भावना आहेत. मुळात आई आणि मुलीचे नाते खूप नाजूक असते. या चित्रपटाची खासियत म्हणजे यात खऱ्या मायलेकी असल्याने त्यांच्यातील नैसर्गिक केमिस्ट्री पडद्यावर दाखवणे मला अधिकच सोप्पे झाले. सोनाली एक उत्तम अभिनेत्री आहेच. तिचा हा गुण सनायामध्येही आला आहे. तिचा हा पहिला चित्रपट आहे, असे कुठेही जाणवत नाही. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी आहे, परंतु प्रत्येक आईमुलीने हा चित्रपट आवर्जून पाहावा.''

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..