अंकुश चौधरी बनला प्रस्तुतकर्ता 'बैदा'नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल
अंकुश चौधरी बनला प्रस्तुतकर्ता
'बैदा'नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल
अंकुश चौधरी... मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार. स्टाईल आयकॉन म्हणूनही अंकुशकडे पाहिले जाते. यापूर्वी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेच. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता अंकुश एका नवीन भूमिकेतून आपल्या समोर येत आहे. संदीप पोपट दंडवते लिखित, दिग्दर्शित 'बैदा' नाटकाचा प्रस्तुतकर्ता असून येत्या १६ मार्चपासून हे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. नाट्य मल्हार निर्मित या दोन अंकी नाटकात उन्नती कांबळे, अक्षय काळकुटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्वतःसाठी कुटुंबासाठीची लढा... अशी टॅगलाईन असलेले हे नाटक कौटुंबिक आहे.
आपल्या या नवीन भूमिकेबद्दल अंकुश चौधरी म्हणतात, '' बऱ्याच दिवसापासून एखादे चांगले नाटक प्रस्तुत करावे अशी इच्छा होती. याचदरम्यान संदीप दंडवते लिखित, दिग्दर्शित 'बैदा' हे नाटक पाहाण्यात आले. उत्तम सादरीकरण, अतिशय चांगला विषय आहे. त्यामुळे हे जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे, असे मला मनापासून वाटले. म्हणून मी या नाटकाचा भाग झालो. या नाटकाच्या माध्यमातून मी प्रथमच प्रस्तुतकर्ता म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.''
Comments
Post a Comment