शिल्पा शेट्टीच्या लावणीने जिंकली उपस्थितांची मने, तर सारा अली खान म्हणतेय ऐका दाजीबा !
झी गौरव पुरस्कार २०२४ मध्ये शिल्पा शेट्टी आणि सारा अली खान यांचा मराठी गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स.
शिल्पा शेट्टीच्या लावणीने जिंकली उपस्थितांची मने, तर सारा अली खान म्हणतेय ऐका दाजीबा !
गाजणार मराठी चित्र सोहळा, आपण आलात तर नादच खुळा !
मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी गौरव २०२४’ गौरव सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२४ सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्री ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्या अभिनेत्री म्हणजे ‘शिल्पा शेट्टी’ जी आपल्या स्टाईलसाठी नेहमी चर्चेत असते आणि दुसरी ‘सारा अली खान’. साराने 'ऐका दाजीबा' म्हणत उपस्थित पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं, तसेच 'आँख मारे' ह्या गाण्यावर केलेल्या तडकत्या फडकत्या नृत्याने मंचावर आग लावली. तर शिल्पा शेट्टी सादर केलेल्या लावणीने हा सोहळा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.
तेव्हा 'सारा अली खान' आणि 'शिल्पा शेट्टीच्या' तालावर नाचायला तयार राहा आणि त्यांचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला विसरू नका 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२४' शनिवार १६ मार्च संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर
Comments
Post a Comment