'महाशिवरात्रीच्या निमित्ताने 'महादेव'चे मोशन पोस्टर भेटीला
अंकुश चौधरी दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत
महाशिवरात्रीचे औचित्य साधत स्वामी मोशन पिक्चर्स प्रस्तुत, तेजस लोखंडे दिग्दर्शित 'महादेव' चित्रपटाचे लक्षवेधी मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. महादेवाच्या मंदिरात या चित्रपटाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी 'महादेव'मध्ये प्रमुख भूमिका साकारणारा अंकुश चौधरी, दिग्दर्शक तेजस लोखंडे, संगीतकार अमितराज, पंकज पडघन, निर्माते जान्हवी मनोज तांबे, प्रतीक्षा अमर बंग आणि माधुरी गणेश बोलकर उपस्थित होते. संदीप दंडवते लिखित या चित्रपटाचे संदीप बाबुराव काळे, अमेय संदेश नवलकर (शुभारंभ मोशन पिक्चर्स) सहनिर्माते आहेत.
मोशन पोस्टरमध्ये अंकुश चौधरीच्या हातात डमरू आणि नजरेत क्रोध दिसत असून यात महादेवाचे कोणते रूप पाहायला मिळणार आहे, हे येत्या काळात कळेल.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक तेजस लोखंडे म्हणतात, '' आजच्या शुभदिनी आम्ही या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणत असून अंकुशसारखा अष्टपैलू अभिनेता यात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या आधी कधीही न साकारलेली व्यक्तिरेखा तो या चित्रपटात साकारणार आहे. सध्या तरी चित्रपटाबद्दल जास्त काही सांगू शकणार नाही. परंतु 'महादेव'मध्ये प्रेक्षकांना फॅन्टॅसी, ऍक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे.''
Comments
Post a Comment