*छबीलदास नाबाद 100!*

*वास्तु अभिवादन सोहळा*

एखादी संस्था नव्हे तर एखाद्या शाळेची वास्तू जेव्हा शंभराव्या वर्षात पदार्पण करते तेव्हा त्या शाळेला त्या वास्तूला तेथील आजी / माजी शिक्षक, विद्यार्थी, हितचिंतक समाजाला होणारा आनंद हा केवळ शब्दातील आहे.

याच आनंदात सहभागी होण्याचं "याची देही याची डोळा" पाहण्याचे सौभाग्य छबिलदास वासीयांना मिळणार आहे. 'जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट' संचालित दादरची छबिलदास शाळा नुकतीच शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. याचे औचित्य साधून संस्थेने मंगळवार दिनांक १२ मार्च २०२४ रोजी सायंकाळी सहा (६:००) वाजता एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष स्थान माननीय अध्यक्ष डॉ. श्री. उल्हास कोल्हटकर भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध अभिनेते माननीय श्री बाळ धुरी व कळसुत्री बाहुल्यांचे निर्मितीकार माननीय श्री. रामदास पाध्ये यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या सोहळ्यानिमित्त आनंदाची पर्वणी म्हणजे संस्थेतील कला शिक्षकांच्या चित्रांचे प्रदर्शन तसेच 'छबिलदास कल्चर सेंटर'चे उद्घाटन व समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या व्यक्तिगत व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारी 'छबिलदास वॉल' यांचे आयोजन व उद्घाटन संपन्न होणार आहे. या सोळास उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय शैलेंद्र साळवी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..