सीता रामाच्या पदस्पर्शाने पावन होणार झी चित्र गौरव २०२४ चा मंच !

'उषा मंगेशकर' यांना यंदाचा झी चित्र गौरव २०२४ "जीवन गौरव' पुरस्कार जाहीर

गाजणार मराठी चित्र सोहळा, आपण आलात तर नादच खुळा !

यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप अविस्मरणीय होणार आहे कारण अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला पाहता येणार आहेत. अजून एक अप्रतिम गोष्ट म्हणजे ‘मृण्मयी देशपांडे’ आणि ‘गश्मीर महाजनी’ यांनी केलेलं राम आणि सीतेवरील सादरीकरण. या दोघांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मनं तर जिंकलीच, सोबतच या पुरस्कार सोहळ्याला वेगळेच चारचाँद लावले.

या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'जीवनगौरव पुरस्कार’, ह्यावर्षी या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरल्या त्या ‘उषाताई मंगेशकर’ भारतीय संगीतातील आपल्या बहुमूल्य योगदानासाठी जगभरात आपल्या नावाबरोबरच मराठी संस्कृतीला, संगीताला मनामनापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपलं बहुमूल्य योगदान दिलं त्या म्हणजे श्रीमती. उषाताई मंगेशकर. अवघ्या सहा वर्षांच्या असताना वडिलांच्या रूपातील दीनानाथ मंगेशकर नावाचा स्वरसूर्य मावळला, सगळ्या दिशा अंधारून आल्या. आणि त्या लहानग्या वयातच आपण ठरवून टाकलंत आपल्या बहिणींच्या पावलांवर पाऊल टाकत, त्यांच्या सुरांमध्ये सूर मिसळून उभं राहायचं. लतादीदींबरोबर सिनेमाच्या चित्रीकरणाला, रेकॉर्डिंगला जाता जाता रोजच्या रियाजाने सूर भक्कम होतच होते. पण त्यावेळी सुरांबरोबर आपल्याला हाक मारली रंगरेषांनी. लता दीदी आणि आशाताई संगीत विश्वात सुरांनी रंग भरत होत्या आणि त्याचवेळी आपण कॅनव्हासवर चितारलं रंगरेषांचं गाणं.

जिथे भले भले गायक लतादीदीबरोबर गायला घाबरत होते. तिथे आपण लतादीदीबरोबर  गायलेल्या अपलम चपलम गाण्याने बॉलीवूड चित्रसृष्टीत इतिहास रचला. घरात लतादीदी आणि आशाताई अशा दोन दैवी आवाजांची स्पर्धा असतानासुद्धा त्यांना आपण कधीच स्पर्धा म्हटलं नाही, तर त्यांच्या आशीर्वादाने आपण स्वतःचं वेगळेपण सिद्ध करत पार्श्वगायन सुरू केलंत आणि मग सुरू झालं उषाताई नावाचं पर्व! आणि ह्या पर्वात लक्षवेधी ठरली महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या दादा कोंडके यांच्या सिनेमातील गाणी. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक गाण्यांना आपल्या सुरांनी रसिकांच्या ओठांवर खेळवलं. ज्यातील माळ्याच्या मळ्यामंदी आणि बोला दाजीबा ही दोन गाणी ऐकून व्ही. शांताराम यांनी आपल्याला त्यांच्या सिनेमासाठी विचारलं. आणि उघडला लोकप्रियतेचा पिंजरा! आपण ठराविक प्रकारच्या गाण्यात स्वतःला बांधून ठेवलं नाही. आणि मग अख्खा देश थिरकला मुंगडा या सुपर डुपर हिट गाण्यावर.  मुंगडा… सारखी थिरकायला लावणारी गाणी गाता गाता आणखी एका गाण्याने भक्तीसंगीतात एक वेगळा ट्रेण्ड आणला. चित्रपट होता १९७५ सालचा जय संतोषी माँ … आणि गाणं होतं, मै तो आरती उतारू रे…  सुरांवरच्या प्रभुत्वाबरोबर आणखी एका गोष्टीवर आपण प्रभुत्व गाजवलंत. मराठी बरोबर हिंदी, गुजराती, बंगाली, नेपाळी ,मणिपुरी अशा भाषांमध्ये आपण हजारो गाणी गायली.

आज वयाच्या ८८ व्या वर्षी आपण गायलेली हजारो गाणी, रेखाटलेली अप्रतिम रेखाटनं आणि अद्वितीय कंपोझिशन्स हा खरंतर प्रत्येक भारतीयांसाठी अमूल्य ठेवा आहे.  तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना. तुमच्या या कारकिर्दीला झी मराठी परिवारातर्फे मानाचा मुजरा! 

तेव्हा पाहायला विसरू नका “झी चित्र गौरव पुरस्कार २०२४ ” शनिवार  १ ६ मार्च संध्या. ७:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..